Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🍁 फीरनी

🍁कमी साहित्यात झटपट तयार होणारा चविष्ट आणि सोपा पदार्थ..
🍁साहित्य
दोन मोठे चमचे तांदुळ
अर्धा लिटर फुलक्रीम दुध
साखर आवडीनुसार
केशर, वेलची पावडर
बदाम काप
चार बदाम भिजवून साले काढून

🍁कृती
प्रथम तांदुळ धुवून घ्यावेत व पसरुन ठेवून कोरडे करून घ्यावेत
नंतर ते कोरडेच खमंग भाजून एक वाटी दुधात भिजत ठेवावेत
चार बदाम भिजवून साले काढून घ्यावेत

🍁 दोन तासांनी मिक्सर मध्ये प्रथम बदाम वाटुन घ्यावेत
त्यावर दूधात भिजवलेले तांदूळ घालून रवाळ पेस्ट करून घ्यावी

🍁अर्धा लिटर दूध उकळायला ठेवावे
दुध उकळले की तांदळाची पेस्ट हळूहळू दूधात घालावी
सतत हलवत रहावे जेणेकरून गाठी होणार नाहीत

🍁पंधरा ते वीस मिनिटात तांदुळ छान शिजतात
आवडीनुसार साखर घालावी
शेवटीं केशर, वेलदोडे पावडर
व बदाम काप घालावे

🍁दोन मिनिटे परत चांगले हलवून गॅस बंद करावा
ही फिरनी बाऊल मध्ये घालून फ्रिज मध्ये थंड करायला ठेवावी
थंडगार खावी फार चविष्ट लागते 😋

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112035916
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now