🟠वांग्याचे काप
वांग्याची भाजी न खाणाऱ्या लोकांना हे काप मात्र नक्कीच आवडतात😋
🟠साहित्य
तीन चार जांभळी अथवा हिरवी वांगी
तिखट,मीठ,हळद, हिंग
रवा
🟠कृती
प्रथम वांग्याचे मध्यम जाड काप करून घ्यावेत
हे काप मीठ घातलेल्या पाण्यात टाकावेत
म्हणजे काळे पडणार नाहीत
जितके काप असतील त्या अंदाजाने रवा घ्यावा
साधारण चार मध्यम वांग्याच्या कापाना दीड वाटी रवा लागेल
त्यात चवीप्रमाणे मीठ तिखट हळद व हिंग घालून घ्यावा
हे मिश्रण एकजीव करून घ्यावे
या मिश्रणात प्रत्येक काप दोन्ही बाजूंनी चांगला बुडवून घ्यावा
दोन्हीं बाजूंनी रवा चांगला लागला गेला पाहिजे
यानंतर सपाट तवा तापत ठेवून
त्यावर तेल सोडावे
व त्यावर हे काप शेजारी शेजारी रचुन
खमंग भाजुन घ्यावे
एक बाजु झाली की ती उलटून
परत चारी बाजूंनी तेल सोडून भाजावे
हे काप छान कुरकुरीत होतात
असेच बटाटा, लाल भोपळा, आर्वी, कच्ची केळी याचेही काप करता येतात
स्नॅक्स साठी पदार्थ म्हणुन करता येतात
सोबत टॉमेटो 🍅 सॉस देता येतो
अथवा जेवणात पोळी पराठा यासोबत ही छान लागतात
सोबत कलरफुल सॅलड