Quotes by Vrishali Gotkhindikar in Bitesapp read free

Vrishali Gotkhindikar

Vrishali Gotkhindikar

@jayvrishaligmailcom
(5.2m)

बडा नटखट है

epost thumb

🌿मोड आलेली नाचणी आणि मिश्र डाळ डोसे 🌿

🌿साहित्य
एक वाटी नाचणी
मूग मसूर उडीद डाळ एक वाटी

🌿कृती

एक वाटी नाचणी
रात्री भिजवून ठेवणे
सकाळी तिला मोड आणण्यास एका चाळणीत ठेवणे
ही चाळणी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर झाकून ठेवणे
दोन दिवसात छान दरदरीत मोड येतात

उडीद, मूग, मसूर सर्व मिळून एक वाटीभर सकाळी भिजत ठेवणे
संध्याकाळी या डाळी आणि मोड आलेली नाचणी बारीक वाटून एकत्र करून ठेवणे

रात्र भर ठेवले की सकाळी पीठ छान फुगून येते
चांगले हलवून मीठ घालून डोसे घालणे

मोड आलेली नाचणी
सर्व डाळी
शिवाय आंबवलेले मिश्रण यामुळे
हा डोसा पौष्टिक व चवदार होतो
आपल्या आवडीच्या चटणी अथवा भाजी सोबत खायला घेणे

Read More

Remembering.

Shammi kapoor Ji ❤️

epost thumb

गुलाबी पेरूचे पंचामृत

श्रावण महिन्यात अथवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात जेवणात पंचामृताचे फार महत्व असते
कोणत्याही फळाचे पंचामृत करता येते
पानात वाढलेले पंचामृत पानाची शोभा वाढवत असते

साहित्य..
एक मोठा गुलाबी पेरू
दोन मुठभाजलेले शेंगदाणे
मुठभर भाजलेले तीळ
कढीलिंब,बडीशेप
जीरे मोहरी हिंग मेथी
एका लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
तेवढाच गुळ
मीठ, तिखट, हळद ,काळा मसाला
दोन सुक्या मिरच्या

कृती
गुलाबी पेरूच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या

सुके खोबरे काप तळून घेतले
एक मूठ दाण्याचे आणि भाजक्या तिळाचे कूट केले
एक मुठ दाणे अखंड ठेवले
जीरे ,मोहरी ,हिंग ,मेथी , सुक्या मिरच्या घालून फोडणी केली
कढीलिंब त्यात खरपुस तळून
पेरूच्या फोडी घातल्या
वेगळे ठेवलेले दाणे आणि तळलेले खोबरे काप घातले
झाकण ठेवून एक वाफ आली की
फोडी बुडतील ईतके पाणी घालून परत झाकण ठेवले
एक उकळी आली की आवडीनुसार तिखट ,मीठ, हळद, काळा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ , बडीशेप घातली
दाण्याचे आणि तिळाचे कुट घालून एकसारखे करून घेतले
शेवटी एक झाकण ठेवून वाफ आणली
चवीष्ट चमचमीत पेरुचे पंचामृत तयार आहे
पोळी ,पुरी, भात, धिरडी कशासोबत ही मस्त लागते
नुसते सुध्दा टॉक,😋 लागते
तोंडाला चव आणते 😊😊

Read More

सैनिक हो तुमच्यसाठी.. चित्रपट पाहू रे किती वाट. संगीत दत्ता डावजेकर गायीका आशा भोसले..
माझा एक प्रयत्न 🙏

epost thumb

रुक जा ए हवा

epost thumb

कविता
तुझे तुच...

epost thumb

#गोडाधोडाचे_पदार्थ

भोपळ 🍈घारगे

🍈साहित्य
दोन वाटी लाल भोपळा किस
एक मोठा चमचा तूप
एक वाटी कणीक
अर्धी वाटी तांदुळ पीठी
एक वाटी गूळ
सुंठ पावडर अथवा वेलदोडे पावडर
खसखस

🍈कृती

🍈प्रथम भोपळा कीस तुपावर परतून घ्यावा
थोडा मऊ झल्यावर त्यात गूळ घालून शिजवून घ्यावे
गार झाल्यावर सुंठ पावडर अथवा वेलदोडे पावडर घालुन चांगले एकत्रित करावे

🍈या मिश्रणात कणीक व तांदूळ पिठी घालून मिसळून घ्यावे
चवीला थोडे मीठ घालावे

🍈हा भिजवलेला गोळा मऊसर असावा
लागल्यास थोडे दूध भिजवताना वापरावे
हा गोळा तीन ते चार तास झाकून ठेवावा

🍈घारगे करताना कढईत तेल चांगलें तापवून
नंतर आच मंद ठेवावी

🍈भिजवलेल्या पिठाचे लहान गोळे करून
हातावर अथवा पोळपाटावर थापावे
(अजिबात लाटू नये )
वरती खसखस लावून मंद आचेवर तळावे

🍈वरून चांगले टमटमित फुगलेले आणि आतून मऊ लुसलुशीत चवदार घारगे तयार होतात

🍈नुसते अथवा साजुक तुपासोबत छान लागतात 🙂

Read More

जा जा जा मेरे बचपन

epost thumb

अख्खा मसुर

अख्खा मसूर कोल्हापूरचा अत्यंत लोकप्रिय प्रकार😊
कोल्हापूर मध्ये याची अनेक हॉटेल आहेत
आता बाकी शहरात पण हा प्रकार फेमस झालाय
अनेक पद्धतीने हा प्रकार बनवला जातो
वेगवेगळे मसाले वापरून... अनेक प्रकारची वाटणे लावुन 😊..
ही माझी पद्धत सोपी चविष्ट आणि चमचमीत 😊😋

साहित्य
एक वाटी मसुर
एक कांदा बारीक चिरून
आले लसुण बारीक करून
एक 🍅 टॉमेटो बारीक चिरून
कोल्हापुरी कांदा लसुण चटणी
(ही कोल्हापुरी मसाल्याची खासियत आहे ❤️)
तिखट मीठ चवीनुसार
कसुरी मेथी
कोथिंबीर
क्रीम.. आवडीनुसार

कृती
प्रथम मसुर कमी पाण्यात शिजवून घ्यावी
मसुरचा आकार सलग अख्खा राहिला पाहिजे
तेलात हिंग मोहरी फोडणी करुन
कांदा छान मऊ आणि गुलाबीसर करून घ्यावा
त्यावर आले लसूण घालून
जरा परतून
त्यावर दोन चमचे तिखट आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालावी
थोडे परतून टोमॅटोच्या फोडी घालाव्यात
त्या मऊ झाल्या की शिजलेली मसुर घालून
चवी प्रमाणे मीठ, कसुरी मेथी व बारीक कोथींबीर घालावी
झाकणं ठेवून चांगलीं वाफ आणावी
चमचमीत अख्खा मसूर वर
क्रीम ची सजावट करावी 😊
पोळी भात पराठा यासोबत खावे

Read More