“नाते
तुझे माझे नाते जणु गवताचे पाते
हिरवे हिरवे गार ..
आणी” स्वच्छंदी” फार .!!
तुझे माझे नाते
जणु फुलाचा दरवळ
पसरे परिमळ चोहीकडे !!
तुझे माझे नाते
साऱ्या जगाला दाविता
वाढतो ग “मान “मिरविता “!!
तुझे माझे नाते
फक्त तुझ्या माझ्या साठी
कशाला सांगाव्या जनी त्यांच्या “गोष्टी “
...........वृषाली ..