Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🌿 कढीलिंब चटणी 🌿

🌿 साहित्य
पाच ते सहा डहाळी कढीलिंब
पाव वाटी तीळ
पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
पाव वाटी कोरडे खोबर कीस
चमचाभर जीरे
चार पाच लसूण पाकळ्या
तिखट
मीठ चवीनुसार

🌿 कृती
कढीलिंब पाने थोडया तेलात कुरकुरत करून घ्यावी
त्यात कोरडे खोबरे कीस भाजून घ्यावा
कढीलिंब, कोरडे ,खोबरे ,कीस शेंगदाणे मिक्सर च्या भांड्यात घालून
त्यात बारीक तुकडे केलेला लसूण
तिखट मीठ जिरे घालून भरड चटणी करावी

🌿 ही चटणी जास्त बारीक वाटून त्यांची पावडर करू नये
🌿 भरड वाटली असता चवीला जास्त चांगली लागते
फायबर चा ही लाभ होतो
व खाताना त्यात घातलेल्या प्रत्येक घटकाची चव जाणवते

🌿 ही चटणी
कोरडी
दही घालून
अथवा तेल घालून
कशीही छान लागते
पोळी भाकरी डोसा इडली वडे कोणत्याही पदार्था सोबत चांगलीं लागते
पंधरा दिवस चांगली टिकते

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112029841
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now