• “केकावली”
“मातृमहिमा”
पिता जरी विटे,विटो न जननी कुपुत्री विटे
दयामृद साद्रधी न कुल कज्जले त्या किटे ।
प्रसादपट झाकिती परि परा गुरुचे थिटे
म्हणुनी म्हणती भले “न ऋण जन्मदेचे फिटे ।।
अर्थ:-- पण देवा,बाप जरी कारंट्या पोराला विटला,
तरी विटो.परंतु आई मात्र कधीही विटात नाही.
कुळाच्या किर्तीला काळ्या काजळी प्रमाणे त्या
पोरा मुळे दयामृताचा ओलावा जिच्या अंतरंगात
निरंतर आहे अशी ती माऊली कधीही रागाने किंवा
तिरस्काराने गढूळ होत नाही.जन्मदाता,विद्यादाता
ज्ञानदाता,मोक्षदाता,इतर गुरुचे कृपा वस्त्र ( त्याच्या
बाळाला)झाकते खरे पण एकंदरीत ते अपुरेच पडते.
(आईचे कृपा वस्त्र मात्र बाळाला भरपूर पुरेसे असते)
याच कारणास्तव सज्जन म्हणतात की”जन्मदात्या
माऊलीचे रीण कधीही फाटत नाही.
(कुल काज्जल:- कुळाची काजळी,कुळाचा कलंक)दयामृत साद्रधी:-दायाच्या रसाने चिंब झालेले आहेजिचे मन. प्रसादपट :-, दयेचे वस्त्र,कृपेचे पांघरूण)