The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
नमो देव्यै महा देव्यै । शिवायै सततं नम:।नम:प्रकृती भद्राय नियाता प्रणता स्मम ।। -Sudhakar Katekar
"श्रीसुक्त" "फलश्रुती" पद्मानने पद्मऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे | तन्मेभजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ।।१।। अर्थ:-हे कमलनायने,कमल वदने,कमलस्वरूप,कमलावर बसलेल्या लक्ष्मी माते,मला ऐश्वर्य,सुख दे. अश्वदायै गोदायै धनदायै महाधने | धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे ।।२।। "अर्थ:- तू मला,गजधन,अश्वधन,गोधन,संपत्ती,असे विविध प्रकारचे ऐश्वर्य प्रदान कर,आणि माझे मनोरथ पूर्ण कर. पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि | विश्वप्रिये विष्णु्मनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ।।३।। अर्थ:-हे महालक्ष्मी, तू कमलासना,कमल नेत्री असून,या जगतावर तुझी माया आहे.तुझी चरण कमले मी भक्ती भावाने पूजीन. पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् | प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ।।४।। अर्थ:-हे जगन्माते,तू माझ्या वंशात,मुले, नातवंडे,धन,अन्न, हत्ती,घोडे रथ इत्यादी विपुल वैभव देऊन सुखी कर व मला भरपूर आयुष्य दे. धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः | धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु ते।।५।।| अर्थ:--अग्नी,वायू,सूर्य,अष्टवसु,इंद्,बृहस्पती वरुण या सर्व देवता, धन,धान्य समृद्धी देणाऱ्या असल्याने,त्यांचे शक्ती सामर्थ्य तू मला सदैव मिळवून दे. वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा | सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ।।६।। सदैव लक्ष्मीच्या सान्निध्यात राहणाऱ्या गरुडराजा ,मी यज्ञात तयार केलेला सोमरस तू प्राशन कर,त्याच प्रमाणे यज्ञ समारंभ चालविणाऱ्या ऋत्विजांनी मला,समृद्धी,सुख,स्थैर्यासाठी सोमरस प्रसाद द्यावा. न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः | भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ।।७।। अर्थ:-पूर्व पुण्याई असलेल्या भक्तांनी श्रीसूक्ताचा सदैव पाठ करावा.या पठनाने व लक्ष्मीच्या आराधनेने,भक्ताला क्रोध,मत्सर,लोभ, दुर्बुद्धी हे अवगुण कधीही निर्माण होत नाही. सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे | भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ।।८।। हे कमलवासींनी महालक्ष्मी माते,तू शुभ्र वस्त्रधारी आहेस,तुझ्या हाती,सुंदर कमळ, गंध व पुष्प माळांनी तू विष्णूला अति प्रिय आहेस.तू भक्तांचे मनोगत जाणतेस, त्रिलोकाला ऐश्वर्य संपन्न बनवतेस,म्हणून सहा ऐश्वर्य असलेल्या लक्ष्मी माते माझ्यावर कृपा करून माझ्या घरी निरंतर राहा. विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियाम् | लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ।।९।। अर्थ:-हे विष्णुपत्नी,महालक्ष्मी तू क्षमाशील आहेस आणि विष्णूला प्रियही आहेस,तू स्वतः च स्वयं प्रकाशी तुला माझे शताधिक नमस्कार. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि | तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।१०।। अर्थ:-त्या सुप्रसिद्ध महालक्ष्मीच्या प्रभावाची आम्हाला जाणीव आहे.त्या विष्णुपत्नीचेआम्ही निरंतर ध्यान करतो. महालक्ष्मीने आम्हाला सुबुद्धी द्यावी. आनंद:कर्दम:श्रीद:चिक्लित इति विश्रुता: । ऋषयश्च श्रीय: पुत्रा:श्रीर्देवीर्देवता माता:।।११।। अर्थ:-आनंद,कर्दम, श्रीद,चिक्लित हे लक्ष्मीचे सुपुत्र प्रसिद्ध आहेत,ते या श्रीसूक्ताचे प्रथम उदगाते व ऋषी आहेत. या ऋषींनी श्री लक्ष्मीसह माझ्यावर सदैव प्रसन्न असावे. ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदमृत्यव:। भयशोकामानास्तापा नश्यन्तु मम् सर्वदा ।।१२।। अर्थ:-कर्ज,रोग,दारिद्रय, पाप, अपमृत्यु,भीती,शोक,मानसिक पीडा या महालक्ष्मीच्या कृपेने दूर जावोत. श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते | धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।१३।। अर्थ:--हे लक्ष्मी माते,मी तुझी उपासना नेहमी करीत आहे.म्हणून मला विपुल धन,विजय,आरोग्य,ऐश्वार्य,सुपुत्र, सदगुणी संतती,व मित्र व दीर्घ आयुष्य दे अशी माझी नम्र प्रार्थना. (श्रीसूक्ताची सविस्तर pdf करीत आहे.) (पाहिजे असल्यास वाटस्अप वर पठवतो)
. "श्रीसुक्त" "ऋचा १६" यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् | सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ||१६|| अर्थ:--य:जो,श्रीकाम: संपत्तीची इच्छा करणारा असेल,स:तो शुचि--शरीराची स्नानादि मार्गानी स्वच्छता करून,स्वच्छ होऊन,प्रयत:-मन स्वच्छ ठेऊन,स्थिर करून, भुत्वा:-वर सांगितल्या प्रमाणे,शरीर व मन यांची शुचिता संपादन करून,अन्वहम:-दररोज,आज्यम:-धृत,तूप ते जुहूयात:- हवन करावे,तुपाचा आहुती द्याव्यात,(अर्थातच आज्याहुती द्याव्यात हे सांगितल्यामुळे वैश्वदेव विधीने अग्नी संस्कार करून त्यांच्या आहुती द्याव्यात हे ओघानेच सिद्ध झाले) तसेच पंचदशर्रच च:-पंधरा ऋचा असणारे हे श्रीसूक्त,सततम--निरंतर,जपत:--जप करावा (श्री सुक्ताचा सतत रोज जप करावा आणि प्रत्येक दिवशी श्रीसूक्तानेच आज्याहुति देऊन हवन करावे,जर संपत्तीची इच्छा असेल तर, असा आशय) श्रीसुक्तात जी भौतिक ऐश्वर्याची प्रार्थना केली आहे त्याचा संबंध मनाशी आहे म्हणून या मंत्रात'शुचि:'आणि 'प्रयत:' या दोन पदांनी रहस्य विशद केले आहे. पंधरा ऋचा असणाऱ्या या श्रीसूक्ताचा सतत जप करावा हे सांगून द्रव्ययज्ञाबरोबर जपयज्ञहि व्हावयास हवा हे सांगितले आहे.फल प्राप्ती कर्त्याच्या मनोभूमीवर अवलंबून आहे म्हणून ज्या प्रमाणात उपसकाची मनोभूमी विशुद्ध होईल,त्या प्रमाणात त्याला फळ मिळेलच. "तस्मान्मंत्रं जपेद्योगी यत:शुद्धेन्द्रियक्रिय:। या ठिकाणी श्रीसूक्त समाप्त झाले.
"श्रीसूक्त" "ऋचा१५" तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान्विन्देयं पुरुषानहम् ||१५|| अर्थ:- हे जातवेद;- हे अग्ने,त्वम-तू मे:-माझ्या गृहे-घरी,ताम:-,या त्रिभुवन प्रसिद्ध अशा आणि अनपगामिनीम:- माझ्या घरी आल्यावर इतरत्र कुठे न जाणारी, लक्ष्मीम-अशा लक्ष्मीला,आवह म्हणजे बोलाव.ज्या लक्ष्मीच्या निमित्ताने हिरण्यम-सुवर्ण,प्रभुतम-विपुल,गाव:दूध देणाऱ्या गायी,दास्य-परिचारिका,अश्वान- उत्तम गतीशील घोडे आणि पुरुषान-सेवक,हितचिंतक,मित्र वगैरे अहम-मी विन्देयम-प्राप्त करू शकेन. हा श्री सुक्तातील शेवटचा मंत्र आहे,हिरण्यवर्णाम"या मंत्राने सुरू झालेल्या श्री सुक्ताचा या मंत्राने उपसंहार केला आहे.उपसंहारात विषयाचे सारांशरूपाने पुन:संकलन विषय दाढर्यासाठी करतात.उप संहारामुळे ग्रंथातील समग्र विषय एकाच वेळी डोळ्यासमोर उभा राहतो,त्या मुळे त्याचे स्मरण चिरकाल राहते आणि सततअनुसंधानास या स्मरणाची फार मदत होते. लक्ष्मीची उपासना जसजशी अधिक प्रगाढ होईल तसतशी उपासका मध्ये ही चुंबकीय शक्ती जागृत होइल. साधनेच्या अमर्याद क्षेत्रात एकदा पदार्पण केले की सिद्धीच्या मधुर फुलांचा नजराणा साक्षात आदिमाता जगज्जननी भूतधात्री विश्वम्भरा महालक्ष्मी कडून गौरवपूर्वक अर्पिण्यात येतो आणि साधक कृतार्थ होतो.
।"श्रीसूक्त" "ऋचा १४" आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् | सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१४||> अर्थ:--हे अग्ने,त्वम-तू,मे-माझ्या,गृहे-घरी आर्द्राम-पूर्वी सांगितल्या प्रमाणे अभिषेक जलाने आर्द्र किंवा अपार करुणेने जिचे हृदय आर्द्र म्हणजे द्राविभूत झाले आहे अशा,य:करिणीम:- जिच्या हातात सदैव धर्मदंड आहे अशा आणि यष्टीम-दंडस्वरूप असलेल्या, सुवर्णाम-सोन्याप्रमाणे जिची कांती आहे अशा,हेममालिनीम--सुवर्णपुष्पांची माला धारण करणाऱ्या सुर्याम:-सुर्याप्रमाणे चराचराला प्रकाश पुरविणाऱ्या आशा,लक्ष्मीम म्हणजे लक्ष्मीला आवह- बोलाव. या मंत्रात लक्ष्मी ही दंडधारीणी आहे असे ऋषी सांगत आहेत,ऐश्वर्याबरोबरच त्या ऐश्वर्याचे नियंत्रण करण्याची जर संयमशक्ति नसेल तर ते ऐश्वर्य घातक ठरेल.ती आसुरी संपत्ती मानावी लागेल. म्हणून यष्टीम शब्दाने संकेत केला आहे. ऐश्वर्याला दैवी गुणांचे तेजोवलाय प्राप्त होत असते.अशी दैवी गुणांनी चराचराला संतृप्त करणारी भाग्यलक्ष्मी,माझ्या कडे यावी,माझ्या वंशात अक्षय राहावी असा महत्वपूर्ण आशय या मंत्रात प्रकट झाला आहे.
"सर्व विघ्न हर तस्मै श्री गणाधिपतये नमः"
"श्रीसूक्त" "ऋचा १३" आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१३||> अर्थ:--हे अग्ने, तू, मे-माझ्या गृहे -घरी आद्राम-जिच्या शरीरातून एकप्रकारचा स्निग्ध व आल्हाददायक गंध दरवळतो आहे आशा,किंवा जिचे शरीर अभिषेक जलाने आर्द्र झाले आहे अशा. पुष्करिणीम-गजशुंडेणे जिच्यावर सतत जलाभिषेक होत आहे अशा.पुष्कर शब्दाचा अर्थ गजशुंडाग्र,हत्तीची सोंड असा आहे.पुष्टीम-शक्तीशालिनी अशा,आणि पिङ्गलाम-पिङ्गट वर्णाच्या पद्मामालिनीम:-कामलमाला धारण करणाऱ्या चंद्राम:-चंद्राप्रमाणे आल्हाददायक असणाऱ्या, हिरण्मयीम-सुवर्णमय असणारी अशी जी लक्ष्मी त्या लक्ष्मीम-लक्ष्मीला आवह-बोलाव गजशुंडेने जिच्यावर अभिषेक होत आहे अशा,लक्ष्मीला बोलवण्याबद्दल अग्नीला उद्देशून प्रार्थना केली आहे. तेंव्हा लक्ष्मी आणि गजांत लक्ष्मी यांचा परस्पर संबंध लक्षात घेता,अशी लक्ष्मी माझ्या घरी येउदे की जिच्यामुळे गजांत लक्ष्मीचे वैभव मला अक्षय प्राप्त होईल असा सूचक आशय या मंत्रात सांगितला आहे. गजांत लक्ष्मी ज्याला प्राप्त होईल त्याच्या पायाशी ऋद्धि--सिद्धी सदैव लोळण घेत असतात.कौपिनधारी योगी याच गजांत लक्ष्मीचा आधारावर त्रैलोक्यातील ऐश्वर्याला तृणासमान लेखू शकतो. दिवाधिदेव शङ्कराचे ऐश्वर्य हे गजांत लक्ष्मीचेच आहे म्हणून सर्व देवांचा महादेव या मंत्रात याच विश्वाभिलषित लक्ष्मीला ऋषीने आवाहन केले आहे.
"श्रीसूक्त" "ऋचा १२" आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे | नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ||१२||> अर्थ:--आप-,जल,जलाभिमानी देवता असा या ठिकाणी अभिप्रेत अर्थ आहे. हे जलदेवतांनो,तुमच्या कडून नेहमी स्निग्ध,स्नेहयुक्त अशीच कार्ये, सृजन्तु-- निर्माण होवोत.तुम्ही नेहमी स्नेहयुक्त अशीच कार्ये करा असा आशय. हे चिक्लीत! हाही कर्दमाप्रमाणेच लक्ष्मीचा आणखी एक पुत्र आहे.हे चीक्लीत नावाच्या श्री पुत्रा, मे-माझ्या गृही-घरी,वस च- राहा आणि मातरम, श्रीयम--तुझी माता लक्ष्मी हिला, मे कुले:-माझ्या कुलांत, निवासय:-राहण्यास सांग.कर्दम,तू आणि लक्ष्मी ही सर्व माझ्या घरी निरंतर राहोत.हा आशय. जलांना उद्देशून या मंत्रात प्रार्थना केली आहे,मोठी रहस्य पूर्ण आहे. पाणी ज्या विशिष्ट शक्ती मूळे निर्माण होते ती शक्तीच जलाची अधिष्टात्री देवता मानली आहे. या शक्तींना परमाणु शक्ती असे म्हणतात.या परमाणुशक्तीवर एकदा का प्रभुत्व प्राप्त झाले की,या शक्तीचे जे कार्य ते स्वतःला अनुकूल करून घेता येते. श्रीमदभागावतात समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली त्यात ही लक्ष्मी"सागरोद्भवा" असे सांगितले आहे.खुद्द लक्ष्मीचीच उत्पत्ती पाण्यातून झाली असल्यामुळे या मंत्रात जलशक्तींना उद्देशून प्रार्थना केली आहे. म्हणून या आद्यशक्तीला, जलशक्तीला या मंत्रात आवाहन करून तिला आपल्या कुलात सैदैव राहण्याबद्दल तिचा पुत्र चिक्लीत याला प्रार्थना केली आहे.
"श्रीसूक्त" "ऋचा११" कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||> अर्थ:-कर्दमेन;-कर्दम नावाच्या सुपुत्राने (लक्ष्मी) प्रजा:प्रजापती,पुत्रवती,भुता:-झाली,प्रजा या शब्दाचा अर्थ अपत्य असा आहे.कर्दम हा लक्ष्मीचा पुत्र आहे. व हा पुत्र तिचा अत्यंत प्रिय आहे.म्हणून हे कर्दम!हे श्री पुत्रा, कर्दमा!तू मायि:- माझ्या घरी,संभव:-राहा.केवळ तूच राहा असे नव्हे तर, पद्ममालिनीम :-कमल पुष्पांची माला धारण करणाऱ्या जगज्जननी आदिमाता अशा तुझ्या, मातरम:-आईलाही,मे माझ्या,कुले:-वंशात,वासय:-निवास करण्यास सांग. तुझ्या आईचे वास्तव्य माझ्या वंशात सदैव राहो असे कर.तूच माझ्या इथे राहिलास की,तुझी आई आपोआपच माझे घरी येईल."माझे घराण्यात कायमचे वास्तव्य करण्यास तू जर सांगितलंस तर तुझ्यावरील प्रितीने ती जगन्माता माझ्या कुलात सैदैव राहिहा आशय. केवळ लक्ष्मी नव्हे तर लक्ष्मी पुत्रही आपल्या कुलांत निरंतर राहावा ही इच्छा मोठी मार्मिक आहे. केवळ ऐश्वर्य असले आणि त्या ऐश्वर्याचा उपभोग घेणारा परिवार नसेल तर तर त्या ऐश्वर्याचा काय उपयोग? कित्येक माणसांच्या घरी गडगंज संपत्ती असते पण त्याचा उपभोग घेणारा परिवार मुळीच नसतो.आशा माणसांना संपत्ती असूनही संपत्तीचा आनंद कसा वाटणार.?म्हणून संपत्ती बरोबर तिचे योग्य असे विणतर व्हावयास हवे.ज्या घरात ऐश्वर्य आहे पण उचित वितरण नाही त्या घरात ऐश्वर्य असूनही ऐश्वर्याची कळा दिसत नाही. या साठीच भारतीय ऋषी मुनींनी धनार्जना बरोबरच धनवितरणाचाही संदेश दिला आहे. " आधायुरिन्द्रियारमो मोघं पार्थ स जिवति" केवळ स्वात:च उपभोग घेणाऱ्या व्यक्तींची अशी निंदा केली आहे. संपत्तीविषयक धारणा ही त्यागावरच अधिष्ठित आहे.
"गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर: ।गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः" "इंदुकोटि स्तोत्रम्" इंदुकोटि तेजकीर्ण सिंधुभक्तवत्सलं । नंदनात्रिसूनुदत्त इंदिराक्ष श्रीगुरुं । गंधमाल्य अक्षतादि वृंददेववंदितं । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥१॥ मायापाश अंधकार छायादूत भास्करं । आयताक्षि पाहि श्रिया वल्लभेश नायकं । सेव्य भक्त वृंदवरद भूयोभूयो नमाम्यहं ॥वंदयामि०॥२॥ चितजादि वर्ग षट्कमत्तवारणांकुशं । तत्त्वासार शोभितात्म दतश्रीयवल्लभं । उत्तमावतारभूतकर्तृभक्तवत्सलं ॥वंदयामि०॥३॥ व्योम आप वायुतेजभूमिकर्तृमीश्वरं । कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनं । कामितार्तदातृभक्त कामधेनु श्रीगुरुं ॥वंदयामि०॥४॥ पुंडरीक अयताक्ष कुंडलें दूतेजसं । चंडदुरितखंडनार्थ श्रीगुरुं । दंडधारि मंडलीक मौलिमार्तण्डभासिताननं ॥वंदयामि०॥५॥ वेदशास्त्रस्तुत्य पाद आदिमूर्ति श्रीगुरुं । नादकलातीत कल्पपाद पादे सेव्ययं । सेव्यभक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं ॥वंदयामि०॥६॥ अष्टयोगतत्त्वनिष्ठ तुष्टज्ञान वारिधिं । कृष्णावेणितीरवारपंचनद्यसंगमं । कष्टदैन्य दूरभक्त तुष्टकामदायकं ॥वंदयामि०॥७॥ नारसिंह सरस्वतीश नाममष्ट मौक्तिकं । हारकृत्य शारदेन गंगाधराख्यात्मजं । धारणीक देवदीक्ष गुरुमूर्ति तोषितं । परमात्मानंदश्रिया पुत्रपौत्रदायकं ॥वंदयामि०॥८॥ नारसिंह सरस्वती अष्टकंच यः पठेत् । घोरसंसारसिंधुतारणाख्य साधनं । सारज्ञान दीर्घंआयुरारोग्यादि संपदा । चारुवर्ग काम्यलाभ वारंवार यज्जपेन् ॥वंदयामि०॥९॥
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser