Quotes by Vrishali Gotkhindikar in Bitesapp read free

Vrishali Gotkhindikar

Vrishali Gotkhindikar

@jayvrishaligmailcom
(3.3k)

🟠 नाचणी हलवा 🟠

🟠नाचणी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात समाविष्ट केल्यास भूक शांत होते
नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामध्ये 100 ग्रॅम मध्ये साधारण 364 मिलीग्राम कॅल्शियम असते.
उन्हाळ्याच्या दिवसात ही तब्येतीसाठी अतिशय थंड असते

🟠 साहित्य

नाचणीचे पीठ एक वाटी वाटी
गुळ अर्धा वाटी
(साखर सुद्धा वापरू शकता पाऊण वाटी साखर लागेल
आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता )
तूप एक मोठा चमचा
एक वाटी नारळाचे घट्ट दूध
इथे साधे दूध देखील वापरता येते
पण नारळाच्या दूधाचा स्वाद छान लागतो
बदाम काप सजावटी साठी
वेलदोडे पुड

🟠कृती

प्रथम नाचणीचे पीठ पॅनमध्ये घालून कोरडेच भाजून घ्या
आता हळुहळू पाऊण चमचा तूप घालत मंद आचेवर भाजत रहा
पीठ भाजल्याचा खमंग वास आल्यावर
व पिठाचा रंग बदलून तपकिरी झाल्यावर
त्यात दूध घालून हलवत रहा

🟠थोडया वेळातच मिश्रण आळत येईल
परत त्यात नारळाचे दूध घालून हलवत रहा
पाच मिनीटात पिठ चांगले शिजेल
आता यात गुळ घाला
मिश्रण पातळ होईल ते घट्ट होईपर्यंत हलवत रहा

🟠मिश्रण पॅनच्या कडा सोडू लागले उरलेले तूप घालून हलवून घ्या व गॅस बंद करा
(यामुळें हलव्याला चकाकी येईल)
शेवटी वेलदोडे पुड घालून घ्या
वरती बारीक बदाम काप घाला
पौष्टिक असा नाचणीचा हलवा तयार आहे

🟠गरम गरम खायला घ्या
अथवा थंडगार करुन खायला सुद्धा चांगला लागतो 😋

Read More

#comfortfood

अगदी केव्हाही कधीही पाच मिनिटात होणारा
पोटभरू चविष्ट प्रकार

तांदळाची उकड...

साहित्य
एक वाटी आंबट ताक
दीड वाटी तांदुळ पीठ
फोडणीचे साहित्य
हळद
तीन चार सोललेल्या लसूण कुड्या
एक मिरची
चार पाच कढीलिंब पाने
कोथींबीर
कृती
प्रथम तेलाची मोहरी हिंग घालून फोडणी करून
त्यात लसूण, मिरची, कढीलिंब खमंग परतून घ्या
लगेच त्यावर एक वाटी ताक घालून हलवून घ्या
अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून
ताकाला उकळी येऊ दे
उकळी आल्यावर गॅस बारीक करुन हळूहळू तांदुळ पीठी लावावी
मिश्रण व्यवस्थीत एकसारखे झाल्यावर झाकण ठेवून चांगली वाफ आणावी
उकडी वर तुप घालुन गरम खायला घ्यावी

Read More

♦️खसखस साटोरी

♦️मध्यंतरी कोणार्क ट्रिप वर गेलो होतो तिथे खसखस खुप स्वस्त मिळाली
अगदी शंभर रुपये पाव कीलो 😊
तिथं जवळचं अफूची राने आहेत
अफूची बोंडे म्हणजे खसखस
आपण खसखस फार वापरत नाही..
कधीतरी अनारसे साठी
कधीं खीर इतकेच
इतकी स्वस्त खसखस म्हणल्यावर मोह पडलाच विकत घेण्याचा 😃
आता खसखस चे वेगळे प्रकार करणे आलेच ओघाने
खसखस वडी ..
खीर आणि बरेच काही
त्यात हा एक प्रकार करून पाहिला छान झाला होता

♦️साहित्य
एक वाटी मैदा
मीठ चवीप्रमाणे
अर्धी वाटी खसखस
अर्धी वाटी बारीक केलेली साखर
वेलदोडे पुड चवीनुसार
पाव वाटी तुपाचे मोहन

♦️कृती
प्रथम मैद्यात मीठ घालून
कडक तुपाचे मोहन घातले व पीठ घट्ट भिजवून झाकून ठेवलें

खसखस मंद आचेवर भाजून घेतली
गार झाल्यावर त्यात वेलदोडे पुड आणि बारीक केलेली साखर मिसळली
व आतले सारण तयार केले
भिजवलेल्या पिठाचे दोन गोळे करून
पुरीप्रमाणे लाटून
मधल्या भागात सारण भरले
हाताने थोडे दाबून सारण पुरीवर पसरून घेतले

♦️हलक्या हाताने जितक्या जमतील तितक्या पातळ पोळ्या लाटल्या
तूप सोडून खमंग भाजुन घेतल्या
एकदम खुसखुशीत झाल्या 😊

Read More

मेरा मन तेरा प्यासा

epost thumb

तांदुळ पिठाची धिरडी

तांदुळ पीठाची धिरडी नेहेमीच केली जातात
पण या कृतीत थोडा वेगळा बदल आहे
ज्यामुळे ही धिरडी कुरकुरीत आणि वेगळ्या चवीची होतात
साहित्य

दोन वाट्या तांदुळ पीठी
पाऊण वाटी रवा
दोन मिरच्या बारीक चिरुन
एक मोठा कांदा बारीक चिरून
मीठ चवीनुसार
दोन वाट्या ताक (ताजे असल्यास उत्तम)
ताजे ताक केले की मी पहिल्याच दिवशी ही धिरडी करते
कृती
तांदुळ पीठी व रवा ताकात भिजवावा
त्यात बारीक मिरची बारीक कांदा व मीठ घालून
हे भिजवलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे
धिरडी घालताना पीठ थोडे पातळसर असावे तव्यावर तेल टाकून मध्यम आचेवर झाकण न ठेवता धिरडी घालावी
छान चविष्ट होतात

सोबत
चिंचेची पातळ चटणी
मुळगा पुडी तेल घालून

Read More

..*..ती *..

.......जेव्हा माझा निरोप घेते ती संध्याकाळी ....
.....ओठाने म्हणते .मला ती .."बाय ..बाय '...!!
....माझ्या मात्र काळजात ...
.होत असत ....हाय ..!!.....हाय ..!!
.रस्त्याच्या ..त्या ..कडेपर्यंत ..
..मी तिची ऐटबाज "चाल "..निरखत राहतो !
"..आता भेटेल उद्या ती पुन्हा .."...
असे .."नाराज " मनाला समजावत ..रहातो ..!!
..फिरून .पुन्हा एकदा ..ती "एक नजर "..माझ्यावर टाकते ..
..तिला माहित असते ..कि "माझी नजर '..तिलाच पहात असते ..!!
..वळणावर ..वळताना ..मात्र ..ती "एक मोहक "..हास्याचा तुकडा ..
,,फेकते ..माझ्याकडे ..!!
..आणी ..मग पुन्हा ..होतात .माझ्या हृदयाचे ."तुकडे ...तुकडे ..!!!.....

Read More

VALENTINE .."डे '..

....अचानक फोन करुन मला तू बोलावलस...!
.तुला भेटायला "अधीर "मीही धावत ,..पळत...
...नेहेमीच्या ठिकाणी हजर ..!!...
..माझ्या" आवडीच्या साडीत "..सुंदर ..सजुन ..आलेल्या ..
..तुला पाहताच ..माझा जीव..हुरहुरला .....
.."का ग ? ..काही विशेष "?
..अरे विसरलास न ..?आज" Vallentine" ..डे ..नाही का ..?
.."काय ' आणलेस.."गिफ्ट " ..मला ..???"
.तुझा असा "पवित्रा "...पाहून मी एकदम "अवाकच"..
माझ्या तर..ध्यानी ..मनी पण..नाही हा" प्रकार .."!
...."जा ...तुझे माझ्यावर ..प्रेमच नाही .."
तुझ रुसून बसण ..आणि माझ्याशी "अबोला "..धरण !!
...कधी ..समजणार ग तुला ..?
माझ्या "डोळ्यातल "..तुझ्या विषयीच .."प्रेम "....
ते सांगायला ..तो "कुठलातरी ..."डे"..कशाला हवा ग ??
..आणि माझ्या ..प्रेमाची "अमूल्य "..गिफ्ट ..!
...ती..तर" कायमचीच "..तुझ्या ..सोबतच आहे न ..????

Read More

#मटार_एक्स्प्रेस

🟢हिरवा मटार..
🟢हिरवा रस्सा....
🟢मटार रस्सा

🟢साहित्य
हिरवे मटार पांव किलो
तीन चार हिरव्या मिरच्या
सात आठ दाणे काळी मिरी
फोडणीचे साहित्य
ओले खोबरे एक वाटी
कोथिंबीर थोडे किसलेले आले मीठ चवीप्रमाणे

🟢 कृती
प्रथम ओले खोबरे मिरच्या व कोथिंबीर आले यांचे बारीक वाटण करून घ्यावे

🟢कढईत नेहेमीप्रमाणे मोहरी व हिंग घालून फोडणी करून
त्यात थोडे काळी मिरीचे दाणे घालावे
नंतर ओले मटार दाणे त्यात टाकून
झाकण ठेवून वाफ आणावी

🟢एक दोन वाफा आल्यावर त्यात साधारण चार वाट्या पाणी घालणे
याला एक चांगली उकळी येऊ द्यावी
नंतर मंद आचेवर ठेवून त्यात तयार केलेल वाटण घालावे
व परत उकळी येऊ द्यावी

🟢नंतर आवडीप्रमाणे मीठ घालून
गरम गरम खायला घ्यावे
सोबत खरपुस भाजलेले पाव आणि लिंबू घ्यावे
काळी मिरी मुळे तिखटपणा येतो
आवडत नसल्यास नाही घातली तरी चालते

🟢टीप ..
मटार चा हिरवा रंग व विशिष्ट चव टिकून रहावी यासाठी
फोडणीत हळद तसेच वाटणात कांदा लसूण घालण्याचा मोह टाळावा😃

Read More
epost thumb

“स्वप्न .

तुझ्या प्रितीच बिलोरी स्वप्न
जेव्हा पासून पडू लागले ..
मीच झालो एक “आरस्पानी “आरसा
तुझे रूप मिरवणारा ..
असे म्हणतात स्वप्ने रात्री पडतात
पण इथे तर ..
दिवसा पण तु माझ्या
स्वप्नात येतेयस् ..!!!

.वृषाली ..

Read More

सुरळीची वडी उर्फ खांडवी

epost thumb