रिकामा फ्लॅट
दुपारी तीन वाजता
दरवाजा उघडतो मी
आणि आत शिरतो
हवा स्थिर आहे
टेबलावर धूळ
फ्रिजमध्ये शांतता
गुंजन करत आहे
आणि खिडकीतून येणारा प्रकाश
मला एकटेपणाची आठवण करून देतो
मी खुर्चीवर बसतो
काहीच न बोलता
फक्त ऐकतो
माझ्या श्वासाची लय
मोजतो आहे...
शांत, संथ ; स्वतःची लय
रिकाम्या फ्लॅटमध्ये
हे रिकामेपण
मला बाहेरच्या गर्दीपेक्षा
जास्त जवळचे वाटते
इथे काहीही नसते
पण तरीही
सर्व काही असते
फक्त मी
आणि माझा श्वास
आणि हा क्षण
जो पूर्णपणे माझा आहे
वर्तमान इथेच आहे
शांततेच्या या निवाऱ्यात
मी जिवंत आहे
फक्त याच श्वासाने.
© - अजय भुजबळ परभणीकर