🟠क्रिस्पी उडीद वडा
🟠साहित्य
एक वाटी उडीद डाळ
थोडीशी मूग डाळ
एक कांदा
दोन मिरच्या
थोडे जिरे
एक डहाळी कढीलिंब
🟠कृती
रात्री उडीद व मूग डाळ एकत्र भिजत घालणे
सकाळी कमी पाण्यात सरबरीत वाटून घेणे
वाटुन झाल्यावर चमच्याने चांगले फेसून घेणे
म्हणजे वाटलेली डाळ हलकी होते
चवीपुरतं मीठ
जिरे
कढीलिंब चिरुन
मिरच्या बारीक चिरून व
एक कांदा बारीक चिरून घालणे
कढईत तेल चांगले तापले की
आच मध्यम करणे
हाताने किंवा चमच्याने गोल वडे टाकणे
दोन्हीकडून खरपुस तळले गेले की बाहेर काढणे
🟠पुढचा घाणा टाकणे
पुढचा घाणा होईपर्यंत खाली काढलेले वडे गार होतात.
मग ते हाताने हलकेच दाबून चपटे करावे
व परत तळायला टाकावे
🟠आता हे वडे पूर्वीच तळले असल्याने लगेचच तळून होतात
असेच पुढच्या घाण्या वेळी ही करावे
हे वडे अतिशय कुरकुरीत होतात
🟠मी यासोबत नारळ आणि पुदिना याची चटणी केली आहे