🌱पालक ची पातळ भाजी
🌱साहित्य
अर्धी जुडी पालक बारीक चिरून
अर्धी वाटी ताक अथवा दही
दोन मिरच्यांचे तुकडे
सात आठ लसूण पाकळ्या चिरुन
अर्धी वाटी डाळीचे पीठ
फोडणी साठी पंचफोडण
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
🌱कृती
बारीक चिरलेला पालक नुसताच पातेल्यात घालून थोडा परतून
एक दोन वाट्या पाणी घालून शिजवून घ्यावा
🌱पालकाचा हिरवा रंग शाबूत ठेवण्यासाठी झाकणं ठेवू नये..
पालक शिजायला वेळ लगत नाही
पाच मिनिटात शिजतो
त्यावर अर्धी वाटी ताक
आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ पण्यात कालवून लावावे
🌱पुन्हा पाच मिनिटे शिजवून हळद व चवी नुसार मीठ घालावे
दुसरीकडे छोट्या कढईत तेल घालून
तेल तापल्यावर पंच फोडण(हे नसल्यास मोहरी जिरे फोडणी चालेल)व हिंग घालावा
लसूण आणि मिरच्यांचे तुकडे लाल होईपर्यंत परतून
ही गरम फोडणी भाजीवर ओतून भाजी सारखी करून घ्यावी
🌱एक उकळी आली की खाली उतरवावी.
आपल्याला हवे तितके पाणी अथवा ताक वापरुन पातळ करू शकता
🌱जिरे घालुन शिजवलेला गरम गरम भात
घरचे लिंबाचे लोणचे
मुगाचा तळलेला पापड
असा बेत केला आहे 😊😋