कॉर्न 🌽टिक्की
साहित्य
एक मोठी वाटी कॉर्न
एक उकडलेला बटाटा बारीक किसुन
एक वाटी मक्याचा रवा घेतला जो माझ्याकडे उपलब्ध होता
(साधा रवा वापरू शकता)
दोन मिरच्या बारीक चिरुन
बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा काळी मिरी पावडर
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
कृती
सर्व प्रथम कॉर्न वाफवून मिक्सर मधून थोडेसे भरड वाटून घेतले.
मक्याचा रवा भाजून घेतला
वाटलेल्या कॉर्न मध्ये बटाटा कीस कोथिंबीर मिरची. काळी मिरी पावडर. मीठ,कोथिंबीर व लिंबू रस घालून मिक्स करून घेतले
थोडा वेळ तो गोळा झाकुन ठेवला
थोड्या वेळाने त्याचे गोळे करून पोळपाटावर थापून गोल साच्याचा वापर करून टिक्की बनवली.
ही टिक्की मक्याच्या रव्यात दोन्हीं बाजूंनी घोळून
फ्रिज मधे तासभर सेट केली
तासाभराने तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी चांगलीं खरपुस फ्राय केली.
गरमागरम कॉर्न टिक्की सोबत थोडे केळीचे वेफर्स.. कांदा रिंग व 🍅.टोमॅटो सॉस .