तू निधड्या छातीने चालला होतास. त्यांना वाटले तु आव्हान देतो आहेस.
आधाराला हातात काठी घेतलीस.
त्यांना वाटले... तुझ्या हाती अस्त्र आले.
एकाएकी शस्त्र रोखले गेले. गोळीचा अचूक नेम. तु शांतपणे हे राम उच्चारलेस. त्यांना वाटले तुझी गांधीगिरी मृत झाली.
पर तु तेनो बापू थयो..
गांधी टोपी आंधी बनी.
राष्ट्रपिता महात्मा गांधी
लाभली राष्ट्रासाठी उपाधी
रघुपति राघव राजाराम
हे राम... हे राम... हे राम...
-Chandrakant Pawar