वाटते असं कधीतरी मी ओढ्यात न्हाऊन यावे.
त्या ओढ्याचा निर्मळ पणा हळूच चोरून घ्यावे.!
वाटते असं कधीतरी की गरुडाची उंच झेप घ्यावे.
अथांग अश्या आभाळाला जवळून पाहून यावे.!
वाटते असं कधीतरी मी रानात भटकुनी यावे.
रानात भटकत भटकत मी रानवेडा होऊनि जावे.!
वाटते असे कधीतरी की भर पावसात बेधुंद भिजावे.
मनात दाटलेल्या विचारांना त्या थेंबामध्ये सोडूनि दयावे.!
वाटते असे ही कधी कधी की त्या पारावर ही बसुनी यावे.
पारावर बसलेल्या त्या वृद्धां चे अनुभव सोबत घेऊनि यावे.!
वाटते असे ही कधीतरी त्या रमलेल्या डावात जावे.
लहानपणाच्या गोड आठवणींना हळूच मिठी मारुन यावे.!
वाटते असे कधीतरी की खरंच प्राणी होऊनि पहावे.
त्या मुक्यांच्या कंठा मधुनि मधुर आवाज होऊन यावे.!
वाटते असे कधीतरी मी खरंच आयुष्य बेधुंद जगावे.
ह्या निर्जीव आयुष्यातूनी निघून खरा माणूस होऊनि पहावे.!
- धर्मेश. नगरे. -