🟢कैरीची वेगळी चटणी
🟢ही चटणी सासुबाई नेहेमी करीत
त्यामुळे घरी सर्वांच्या आवडीची आहे
ब्रेड ,पोळी ,भाकरी
अथवा आमटी भात, सार भात, याशिवाय
नुसती पण खायला चटकदार लागते
🟢साहित्य
एक कैरी साले काढून फोडी करून
एक कांदा मध्यम आकारात चिरुन
चार पाच पुदीना पाने देठा सकट
थोडी कोथिंबीर
दोन मिरच्या चिरुन
सात आठ लसूण पाकळ्या
मीठ चवीनुसार
गुळ अथवा साखर आवडीप्रमाणे
थोडे जिरे
🟢कृती
सर्व साहित्य मिक्सर मध्ये छान वाटून घेणे
हिरवीगार.. टॉक😋..चटणी तयार होते
वरती मोहरी आणि हिंग फोडणी घालणे
यामुळे आणखीन चव येते 🟢