☘️अळूची भजी
🍀कृती
प्रथम अळूच्या पानांचे बारीक तुकडे करून घेतले
आधीच करून ठेवलेल्या चिंचेच्या कोळात ही पाने तास भर भिजत ठेवली
म्हणजे पानांची खाज कमी होते
🍀 डाळीचे पीठ ,थोडी तांदूळ पिठी , गूळ , मीठ , हळद , तिखट , काळा मसाला , थोडी बडीशेप (चविष्ट लागते )कोथिंबीर , थोडे ओले खोबरे , इत्यादी सर्वच अंदाजे घेऊन
त्यात हे चिंचेच्या कोळात भिजवलेले अळूच्या पानांचे तुकडे घालून थोडे घट्टसर पीठ भिजवले
🍀नंतर यात कडक तेलाचे मोहन घातले
व मंद आचेवर छोटया आकारात खरपूस मंद आचेवर तळली
😊