खोटे आणी खोटे ...!!
का बोलतात लोक” खोटे” हे कधीच उमगत नसते
कदाचित खोटे बोलू नये हे त्यांना कळत असते पण” वळत “नसते .
छोट्या छोट्या गोष्टीत गोष्टीत पण माणसे खोटे बोलत असतात
“सफाईदार पणे खऱ्या गोष्टीला “खोटे च ठरवत असतात !
खऱ्या खोट्याची “सरमिसळ बेमालूम करत असतात
असे लोक पावलो पावली आपल्याला भेटत असतात !!
खरे कोणते “खोटे कोणते हेच कधी कधी उमगत नसते
“गांधारी “सारखे डोळ्यावर पट्टी बांधून इथेच आपल्याला वावरायचे असते !
“खोट्याच्या कपाळी गोटा असतो असे उगाचच म्हणत असतात
वास्तवात मात्र “खऱ्या “लाच सारे टाळत असतात ..
“खर्याची काय दुनिया नाही “.असे खोटे लोक पण बिनदिक्कत म्हणतात
काय माहीत त्यांच्या मनात तेव्हा काय “विचार ‘असतात
या खोट्या “दुनियेत राहून ही काही लोकांनी स्वताला" खरे" ठेवलेले असते
मनाची “खोटी “समजूत काढून स्वताचे “स्वत्व जपलेले असते
अशा या “खोट्या “दुनियेत मात्र माणूस खरा खरा राहत असतो
“खोटे बोलायसाठी पण खऱ्या माणसात राहण्या व्यतिरिक्त त्यांच्या कडे” पर्याय” नसतो !!
वृषाली **