माझे शब्द.....
माझे शब्द ..तुला नेहेमीच वाटतात.."कुरबुर"
....जेव्हा ते तक्रार..करत असतात...तुझ्या उशीराविषयी...
माझे..शब्द..तुला नेहेमीच वाटतात.."अडसर"
...तुझ्या..माझ्या नात्यातला..आपल्या प्रेमातला...
माझे शब्द..तुला नेहेमीच वाटतात"अडथळा"..
..जेव्हा,.तुला व्यक्त..करायच असत माझ्यावरच खर खर प्रेम..!!
माझे शब्द असतात.."निष्फळ"..आणी,.."नाकाम"
..जेव्हा तुझ्या डोळ्यातली ओढ..माझ्या डोळ्याना पण कळत असते.!
अखेर..मीच त्याना बसवते.."दटावुन",आणी "दामटुन"
मनाच्या एका कोपर्यात...
तेही..होतात.."हिरमुसले",.."ओशाळवाणे"..आणी "नाराज"
आणी मग येतो तो एक 'उन्मादक "क्षण...!!
जेव्हा माझ्या शब्दाना तुझे ओठच ..घेतात टिपुन..
"अलगद'..माझ्या.च..ओठावरुन....
आणी मग त्याना लाभते......
एक" चिरंतन"..आणी " अमर "आस्तित्व.!!!!...
वृषाली