#वड्याचवड्या
♦️आले बटाटा वडी
♦️आपल्या आल्याचा भरपूर वापर होतो . चहा तर नेहेमीच होतो
मी उप्पिट ,पोहे अथवा भाज्या ,रस्सा यात पण त्याचे पातळ काप वापरते
या आहेत आल्याच्या आणि बटाट्याच्या वड्या,
नेहमीच्या आलेवडी किंवा आलेपाक पेक्षा तशा मऊ असतात.
मात्र करायला सोप्या आणि चवीलाही छान.
थंडीच्या मोसमात चवदार आणि पौष्टिक
♦️ साहित्य
एक वाटी पुर्ण भरून किसलेले आले
दोन वाट्या साखर
अर्धी वाटी पिठी साखर
अर्धी वाटी दूध
एक चमचा साजूक तूप
दोन मध्यम वाट्या उकडलेल्या बटाट्याचा किस
वेलदोडे पूड
पाव चमचा हळद पुड
♦️कृती
प्रथम कढईत किंवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये किसलेले आले , साधी साखर ,तूप , दूध एकत्र करावे. गॅसवर मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे.
♦️मिश्रण थोडे आळत आले की उकडलेल्या बटाट्याचा किस घालावा.
सतत ढवळत राहावे.
मिश्रण घट्टसर झाले की गॅसची आच मंद करून त्यात पिठी साखर घालावी व चांगले घोटावे
♦️ मिश्रण वड्या पाडता येतील एवढे दाटसर झाले की त्यात वेलचीपूड घालावी व नीट हलवुन घ्यावे.
पाव चमचा हळद घालावी म्हणजे रंग चांगला येईल
♦️स्टिलच्या थाळीला तूपाचा हात लावून घ्यावा त्यावर एकसारखे थापून घ्यावे.
थाळी ठोकून घ्यावी म्हणजे मिश्रण एकसारखे पसरते
थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
♦️टीप
१) वेलदोडे पूडऐवजी जायफळ पावडरनेसुद्धा छान स्वाद येतो.
३) वड्या लगेच डब्यात भरू नये काही तास मोकळ्या हवेत उघड्याच ठेवाव्या