#NAVARATRI
आला - आला उत्साहात सण हा नवरात्री
हिरवी साडी घालुनी पुजते तुला कालरात्री...
नऊ दिवस उत्साहाचे करते मी साजिरे
सुख - समृध्दी नांदू दे सर्वसामान्यांच्या घरे...
दरवर्षी येणारा सण, यावर्षी आहे निराळा
कारण, कोरोनाचा तोरा आहे आगळा - वेगळा...
करुनी वार कोरोनाच्या मुळाशी
मोकळ्या हवेला आण ग माते आम्हा सर्वांपाशी...
💐 खुशी ढोके 💐