(अ)पूर्ण प्रेम 💔💔💔
मी मीरा तुझी रे अन् तू माझा कृष्ण सावळा रे ,
हक्क आहे तुझ्यावर सर्वांचा फक्त मीच एकटी का झाले वंचित रे ...
सहत्र सोळा कन्यांचा तू पती परंतु
राधा तुला प्रिय रे ....
तुमची प्रीत झाली अजरामर ,
जेव्हा लोक म्हणती हा तर राधेचा शाम रे....
तुजसाठी वेडी झाले,
माझ्या नशिबी का हे वैराग्य रे ....
तुझ्यावर प्रेम मी ही केले परंतु,
तुला दिसले फक्त राधेचेच प्रेम रे,
अन् तिचा त्याग रे .....
तुझ साठी सोडले सर्व घरदार अन् मुखी फक्त एकच नाम,
माझा शाम .....
लोक ही म्हणती तरीही तुज राधेचाच शाम रे
मी काय गुन्हा केला ,
लोक मज् म्हणती ही तर , फितूर रे ....💔
- : Written by "Unknown Writer 🌼 "