आवळा

आवळा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, खरच आवळा हे असं फळ आहे कि जिथे आवळ्याला बघितलं कि लगेच आपल्या तोंडातून मिटक्या पडतात. हे फळ अगदी लहाना पासून ते मोठ्यापर्यत सगळ्यांना आवडतो. आवळ्याचा औषध म्हणून खूपच उपयोग केला जातो. आयुर्वेदातही आवळ्यापासून विविधप्रकारचे औषधे तयार करतात. हे फळ आरोग्यदृष्टीने, आर्थिकदृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे.

कार्तिक महिन्यात म्हणजेच नोव्हेबर डिसेंबर महिन्यात आवळ्याचे पीक होते. आवळा हा मध्यम उंचीचा पानझडी वृक्ष असून संपूर्ण भारतात सापडतो. आणि आता हे सिजनच आहे आवळ्याचं, बाजारात टीकटिकांनी आवळ्याच्या राशीच्या राशी विकायला बसलेले दिसून येतात. आवळा हा चवीने आंबट व तुरट असतो. आवळ्या मध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा हे फळ कितीही शिजवल्यावर किंवा सुकवल्यावर त्यामधील महत्वाचे जीवनसत्वे व औषधी गुणधर्म कमी होत नाही.

आवळा हा पित्तशामक, बलदायी, पाचक, ज्वर नाशक, दात मजबुतीसाठी उपयुक्त आहे. तसेच केसांसाठी गुणकारी आहे, मधुमेह, पचनक्रिया, ऍसिडिटी, हाडे मजबुती साठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी आणि अशाप्रकारे बऱ्याच औषधा मध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो. आवळ्यापासून बरेच खाण्याचे पदार्थ सुद्धा बनवण्यात येतात जसे कि आवळ्याचा मुरंबा, लोणचे, सुपारी, आवळा चूर्ण, जॅम, ज्यूस, चटणी, सरबत आणि कॅण्डी इत्यादी पदार्थ तयार करता येतात व हे पदार्थ आम्हाला वर्ष भर टिकवता येते. म्हणून तर म्हणतात आवळा हा फळ अगदी सर्वगुणसंपन्न आहे.

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solutions

Marathi Blog by Brains Media Solutions Pvt. Ltd. : 111845593
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now