“भाऊबीज”
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज. हा दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक सण आहे. बहिण भावाच्या नात्यांमधील प्रेम जोपासणारा हा सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीची सांगता या दिवसाने होते. कार्तिकी शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीजेचा दिवस त्याच बरोबर यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवसाच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. असेही म्हटले आहे कि या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. त्यामुळे यमराजांनी हे वरदान दिले कि या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
हा सण खास भाऊ - बहिणीचा आहे. बहिण या दिवशी भावाला बोलावून किंवा त्याच्याकडे जाऊन गोड धोडाचे जेवण करून, बहिण भावाला ओवाळून, टिळा लावते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाने नंतर काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. बहिण - भावाच्या प्रेमाचा हा अंत्यत मंगल दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो.
तुम्हा सर्वांना भाऊबीज निमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्या ......
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solution