मी एक अभियंता
हस्य कल्लोळचा संता-बंता
वैद्य त्या निर्जीव यंत्रांचा
सर्वेसर्वा निर्माता
मी एक अभियंता
कठोर हृदयात पाझर प्रेमाचा
दृष्ट झगडालु प्रियकर
त्या निर्जीव यंत्राचा
मी एक अभियंता
लाचारीने यंत्रवत राबनारा
प्रेमाला आसुसलेल्या संगीणीच्या
भावना चिरडून टाकनारा
मी एक अभियंता
पालक या यंत्रांचा
आतुरलेल्या पाल्य नजरेत
पालकत्व गमावलेला
मी एक अभियंता
सखा सोबती यंत्राचा
शत्रू माझ्या मित्र परीजनाचा
सोहळा समारंभाला चुकवुन
खुनी नातेसंबंधाचा नातलगांचा
मी एक अभियंता
निर्जीवतेत सजीवता आणणारा
सजीव प्रेमळ आनंदी आयुष्याला
निर्जीवतेच्या गर्तेत लोटनारा
मी एक अभियंता
यंत्राच्या संगितात रमणारा
जाणकार यांत्रिकी भावनांचा
विष्वकर्मा यांत्रिकी विश्वाचा
कर्दनकाळ मानवी संवेदनेचा
मी एक अभियंता !!!...😪
✍ रवि सावरकर
8121129889
www.savarkarstory.com