माझ्या स्मरणातील काही दुर्गा स्वरूप स्त्री व्यक्तिमत्व.....
पार्वती बनवून तू महादेवांना आधीन केलस. त्यांची शक्ती बनली म्हणून तू आदिशक्ती आहेस
कुंती बनवून तू पंचमहाभूतांना अधीन केलस सामाजिक अवहेलना सहन केलस. कुमारिका माता बनून पण, तरीही सामाजिक बंधनांचा आदर केलास म्हणून तू सहनशील आणि आदर्श म्हणून अमर झालीस.
गांधारी बनून पतीसाठी स्वतःच्या डोळ्यांना पट्टी बांधून पत्नीधर्म निभाव लास आणि ह्याच पातिव्रत्याच्या सामर्थ्याने भगवान श्रीकृष्ण लाही शाप देण्याइतपत तुझ्यामध्ये सामर्थ आलं.
द्रौपती बनून तू पाच पतींना वरलस तरीसुद्धा एक प्रतिव्रता म्हणून ओळख बनवलं आणि दृढ भक्तीच्या जोरावर आणि विश्वासावर तू त्या क्रूर कौरवांसमोर खंबीरपणे उभी राहिली खरंच तुझ्या हिम्मतीला दंडवत.
जिजामाता बनुन तु दैदिप्यमान छत्रपती शिवाजींना घडवलं, छत्रपती शंभूराजांना घडवल तुमचे ज्वलंत संस्कार त्यांच्या तनमन धनावर करून स्वराज्याची स्थापना केली, तुमचे ज्वलंत संस्कारांचा परिणाम म्हणून शंभूराजे मृत्युंजय झाले.
झाशीची राणी बनवून तू अगदी अलीकडच्या काळात एका स्त्री मधील शौर्य आणि धैर्य दाखवून दिलास एक स्त्री राज्य सांभाळू शकते आणि राज्यासाठी लढू ही शकते. हे दाखवून दिलं.
सावित्रीबाई फुले बनून तुम्ही स्त्रियांच्या शिक्षणाची आस धरली. ज्या काळात स्त्रीला फक्त चूल मुलच माहित होतं. समाजाच्या ह्या मानसिक ते विरुद्ध तुम्ही लढाई लढली. बेडर आणि धिरोत्तम होऊन. तेव्हा तुमच्यावर दगड, चिखल, शेण फेक झाली. पण आज मात्र तुमच्याकडे एक सुधारक आणि लढवय्या स्त्री म्हणून पाहिले जातंय खरंच तुम्हाला मानाचा मुजरा समाजाच्या विरोधात जाऊन पुन्हा तोच विचार समाज मान्य करणं हे खूप मोठं कार्य आहे.
स्त्रियांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच सक्षम आणि खंबीर राहिलं पाहिजे. ताकत प्रत्येकातच असते तिला जागृत करावी लागते.