सुसंवाद
वाद म्हणजे, दोन व्यक्ती मधे बोलणे चालू असताना, दोघांच्या विचारातला फरक आला की आवाज वाढायला लागतो. त्या दोघा मधे एक तरी रागीट असला तर भांडण सुरू होतो. ह्याला वाद म्हणतात.
काही दिवसापासून असे वाटत होता की ह्या विषयावर चार वळी लिहावे.
माझे मते वाद या शब्दाचा असे वर्गीकरण होऊशकते.
सुसंवाद - संवाद - वाद ( विवाद) - कुविवाद - निर्विवाद
सुसंवाद म्हणजे चांगले संवाद. संवाद ज्यावेळी उत्तम निकाल दाखविते, तिला सुसंवाद म्हणतात. सुसंवादामुळे मन सुखावला जाते आणि आनंदी होते.
संवाद म्हणजे चांगले संवाद. ज्या चर्चेचा निकाल वादात बदल होत नाही आणि फक्त बोलणे, ऐकणे असतात त्याला संवाद म्हणतात. संवादामुळे आपल्याला बरेच गोष्टी माहिती होतात. हा गुणाचा वापर चांगला झाला तर उत्तम. नाही तर डोक्याला ताप.
वाद (विवाद) म्हणजे सौम्य रूपी भांडण. नेहमी ग्रुपच्या सगळ्यांच्या मत एकच होत नसतात. विचारात फरक असल्याने खटके उडायला लागतात. मोठा आवाजात बोलणे सुरू होतो. हाताचे एँक्शन करून मोठ्या आवाजाने बोलण्याला वाद म्हणतात. मूर्खांसि वाद करूनये असे म्हणतात. इथूनच मारामाऱ्या सुरु होतात.
नवरा बायको मधे वाद होत असतात. खूपच वाद, ते पण रोज व्हायला सुरू झाली तर घटस्फोट होतात.
कुविवाद म्हणजे जेंव्हा वाद, वाईट घडवायला सुरु करतो ती वेळ. वादा ची पुढची पायरी म्हणजे कुविवाद. कुविवादामुळे शारीरिक बल वापरणे चालू होवून जातो. येथे शारीरिक भांडण म्हणजे मारामारी सुरू होतो. ही एक छोटी युद्ध च असते. ह्याच्यात दोघांचाही नुकसान होऊशकते. जेंव्हा हाणामारी सुरु होणार असे वाटले की एकाने माघार घ्यावी म्हणजे चांगले होईल. ते शहाणपणाचे लक्षण आहे.
शेवटचा प्रकार आहे निर्विवाद. जाच्यात वाद नाही ते निर्विवाद. सोसायटीच्या मिटिंगमध्ये एक ठराव एकमताने म्हणजे निर्विवादाने पास झाला.
म्हणून मला असे वाटते की एक तर सुसंवाद पाहिजे नाही तर निर्विवाद पाहिजे. वाद,कुविवाद नकोच नको. संवादाला वगळता येत नाही.