#काव्योत्सव 2.0
प्रेयसी
क्षितिज मिलनाची ती प्राजक्त लाली
सजली जिच्या आरक्त गाली
जपते एक गुपित मनाशी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
हरवले तुझ्या प्रेमात जरी
होऊन कावरी बावरी
लाजते मनात जराशी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
वेड तुझे हे अति
उरी गंधाळते प्रिती
वाच्याळती मज हे जगवासी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
मानलेस तर खुप काही
न मानलेस तर काहीच नाही
कारण नाते फक्त ह्रदयाचे ह्रदयाशी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
म्हणती त्याग असे प्रतीक प्रेमाचे
जाणकार आपण त्या एका क्षणांचे
मग का जोडीले नाते शतःजन्माशी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
त्या शपथांचे ,त्या वचनांचे
मी तेवियले दिवे
वाटे जगत आहे
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
आता सोडले हात ,मोडले रस्ते
चुकली वाट, तोडले नाते
सुकले झाड ही जे राहीले साक्षी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
उरलीत आता फक्त
गर्भगळीत झालेली स्वप्नं
वेचिते तुकडे जे पडलेत छिन्न विछिन्न
भरली ओंजळ राहिले मात्र पाणी हे अक्षी
झुरते आहे तुजसाठी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
अशी सख्या रे तुझी प्रेयसी
विनंती म्हात्रे खारपाटील.