अनुबंध बंधनाचे..

(68)
  • 110.2k
  • 0
  • 73.9k

नमस्कार माझ्या प्रिय वाचक मित्र आणि मैत्रिणींनो...?? माझे नाव मेघना उर्फ मेघा.... आज मी तुम्हा सर्वांसाठी एक खुप छान अशी प्रेमकथा घेऊन आली आहे.... तसं तर अशा कथा खुप असतात, आणि तुम्ही सर्वांनी पण आत्तापर्यंत खुप प्रेमकथा वाचल्या असतील. पण हि प्रेमकथा खुप वेगळी आहे. कारण ही प्रेमकथा मी अगदी जवळुन अनुभवली आहे. आणि या कथेचं मी पण एक पात्र आहे. त्यामुळे कदाचित ते अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. म्हणुन मी हा एक छोटासा प्रयत्न करतेय. मुळात मी लेखिका वगैरे नाहीये... त्यामुळे काही चूक झाली असेल तर माफ करा.

1

अनुबंध बंधनाचे. - भाग 1

अनुबंध बंधनाचे.....( भाग १ )!! प्रस्तावना !!नमस्कार माझ्या प्रिय वाचक मित्र आणि मैत्रिणींनो...माझे नाव मेघना उर्फ मेघा.... आज मी सर्वांसाठी एक खुप छान अशी प्रेमकथा घेऊन आली आहे....तसं तर अशा कथा खुप असतात, आणि तुम्ही सर्वांनी पण आत्तापर्यंत खुप प्रेमकथा वाचल्या असतील. पण हि प्रेमकथा खुप वेगळी आहे. कारण ही प्रेमकथा मी अगदी जवळुन अनुभवली आहे. आणि या कथेचं मी पण एक पात्र आहे. त्यामुळे कदाचित ते अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. म्हणुन मी हा एक छोटासा प्रयत्न करतेय. मुळात मी लेखिका वगैरे नाहीये... त्यामुळे काही चूक झाली असेल तर माफ करा. खरं तर हि कथा लिहिण्याचे कारण म्हणजे... ...Read More

2

अनुबंध बंधनाचे. - भाग 2

अनुबंध बंधनाचे.....( भाग २ )आज गुरुवार होता. घटस्थापना होती त्या दिवशी, नवरात्रीचा पाहिला दिवस, दरवर्षी प्रमाणे दांडिया मधे बेंजो ऑर्डर होती. प्रेम पहिल्यांदा नगरातील मित्रांसोबत तिथे वाजवायला गेला होता. तो कीबोर्ड काढून स्टँड वर लावत होता, तेवढ्यात एक छोटीसी मुलगी त्याच्या जवळ आली आणि त्याला बोलली...हाय... माय नेम इज अंजली...व्हॉट इज युवर गुड नेम...?तो तिच्या सुंदर डोळ्यांमध्ये पहातच राहिला. एकदम गुटगुटीत अशी ती किती गोड दिसत होती, अगदी एखाद्या परीसारखी... लाईट पिंक कलर चा वन पिस घातलेला. त्यावर व्हाईट कलर चे फ्लॉवर होते. गळ्यामध्ये ड्रेसला सुट होणारा नेकलेस, कानामध्ये त्याला मॅच होणारे इअर रिंग, एका हातात पिंक कलर चा ...Read More

3

अनुबंध बंधनाचे. - भाग 3

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३ )नवरात्रीचे उरलेले दिवस पण हे दोघेजन रोज भेटायचे, बोलायचे, एकमेकांशी बोलुन दोघांनाही खुप छान वाटायचं दोघेही खुश होते. दुसऱ्या आदल्या दिवशी फॅन्सी ड्रेस होता. आज प्रेम फॅन्सी ड्रेस मधे कृष्ण बनणार होता. तिथेच राहणाऱ्या एका महेश नावाच्या मित्राने आणि त्याची बहीण लिना या दोघांनी मिळुन हा प्लॅन केला होता.अंजली साठी मात्र हे सरप्राइज होते. कारण प्रेम ने तिला याबद्दल काहीच सांगितले नव्हते.अंजली प्रेमला रोज बोलायची, नाचायला का येत नाहीस म्हणुन, पण तो.... मला नाचता नाही येत म्हणुन टाळायचा... तरीही ती त्याला दांडिया खेळण्यासाठी हट्ट करायची. पण एवढ्या दिवसात प्रेम कधीच दांडिया खेळायला गेला नाही.पण शेवटच्या ...Read More

4

अनुबंध बंधनाचे. - भाग 4

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४ )दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे प्रेम जरा उशीराच उठला होता.गेले काही दिवस रोजचे कॉलेज, ऑफिस, रात्री जागरण यामुळे खुप थकुन गेला होता. म्हणुन त्याने आज दिवसभर घरीच आराम केला.मधेच त्याला अंजली बद्दल विचार येत होते. पण खुप विचार करून त्याकडे दुर्लक्ष करायचे असे ठरवले.दोन दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा होती. त्याचा मित्र त्याला सांगायला येतो. बुधवारी कोजागिरीच्या दिवशी वाजवायची ऑर्डर आहे तिथेच तु येशील का ?प्रेम ने सरळ नाही येणार म्हणुन सांगितले.त्या दिवशी मुले कमी होती त्यामुळे त्याचा मित्र जाताना पुन्हा त्याला बोलवायला आला. प्रेम नुकताच ऑफिस मधुन घरी आला होता. त्यांच्यासोबत त्याला जाणं गरजेचं वाटले. म्हणुन ...Read More

5

अनुबंध बंधनाचे. - भाग 5

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५ )दुसऱ्या दिवशी कॉलेज होते त्यामुळे प्रेम लवकर उठून कॉलेजला गेला. तिथूनच तो ऑफिसला जात असे.आज कॉलेजमधेच काय, कशातच लक्ष लागत नव्हते. ऑफिसमधे पण कामात लक्ष नव्हते. त्याला सारखा अंजलीचा तो गोड चेहरा डोळ्यासमोर येत होता.एक पाचवीत असलेली मुलगी किती मोठ्या मुलीसारखी वागत होती. अजुन पण त्याला तोच प्रश्न पडला होता.ऑफिसला आल्यावर लंच टाईम मधे.... तिला कॉल करायचा कि नाही...? याचाच विचार तो करत होता. नाही... हो... नाही... हो करत त्याने ती चिठ्ठी खिशातून बाहेर काढली. त्यावरील नंबर डायल केला.दोन बेल वाजल्या तसा त्याने पटकन रिसिवर ठेऊन दिला. नाही नको. आता नको... नंतर बघू... असा विचार ...Read More

6

अनुबंध बंधनाचे. - भाग 6

अनुबंध बंधनाचे.....( भाग ६ )प्रेमच्या आयुष्यात हे जे काही चालु होते, याची कल्पना कोणालाही नव्हती. ग्रुप मधे पण कोणाला अंजली बद्दल काहीच बोलत नव्हता.एवढ्या छोट्या मुलीशी फ्रेंडशिप केलीय, हे सांगायला पण त्याला बरं वाटत नव्हते.सर्वजण काय विचार करतील माझ्याबद्दल... हा विचार करून तो कोणालाच काही बोलत नव्हता.त्याचे नेहमीचे रुटींग चालु होते. वेळ मिळेल तेव्हा तो अंजलीसोबत फोनवर बोलत होता. दोघांनाही आता एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नव्हते.कधी कधी ऑफिसमधील कामामुळे त्याला रोज कॉल करायला जमायचे नाही. मग अंजली त्याच्यावर नाराज व्हायची. तो पण गोड बोलुन तिचा राग घालवायचा.एकदा प्रेम अचानक अंजलीला न सांगता गावी गेला. चारपाच दिवसांनी परत आला.ऑफिस मधे आल्यावर ...Read More

7

अनुबंध बंधनाचे. - भाग 7

अनुबंध बंधनाचे.....( भाग ७ )कॉलेज आणि ऑफिसच्या कामात थोडे दिवस असेच निघुन गेले. पण प्रेमला अंजलीला भेटण्याची इच्छा मनातून नव्हती.एक दिवस असाच विचार करत असताना त्याला काही दिवसांपूर्वीच बोलणे आठवले. ख्रिसमसच्या दिवशी रात्री तिच्या स्कूळजवळ असलेल्या चर्च मधे ती आणि तिची फॅमिली दरवर्षी येतात.' तु पण येशील का ख्रिसमसच्या रात्री मला भेटायला ' अशी तीच सतत बोलत असायची.प्रेमला आता अंजलीला भेटण्याचा अजुन एक मार्ग मिळाला होता.अखेर तो दिवस आला होता.आदल्या दिवशीच रात्री बारा वाजता चर्चमध्ये अंजली आणि तिची फॅमिली प्रेयर साठी येणार होते हे त्याला नक्की माहित होते.प्रेम रात्री जेऊन झाल्यावर थोड्या वेळाने ताईला बाहेर मित्राकडे जातोय, रमेश आला ...Read More

8

अनुबंध बंधनाचे. - भाग 8

अनुबंध बंधनाचे.....( भाग ८ )कालच्या भेटीत दोघांनीही जास्त काही बोलता आले नव्हते. म्हणुन प्रेम ने अंजलीला कॉल करायचा विचार दुपारचे चार वाजले होते, त्याने कॉल लावला आणि इकडे घरी अंजली पण त्याच्याच कॉल ची वाट पहात होती. रिंग होताच पटकन तिने कॉल उचलला...प्रेम : हाय...कशी आहेस...?अंजली : मी मस्त... तु कसा आहेस...?प्रेम : रात्री किती वाजता आले घरी...?अंजली : तीन वाजले घरी यायला... तुला पण लेट झाला ना...?प्रेम : हो ना... पण तुला भेटलो ना रात्री, खरच खुप छान वाटलं.अंजली : हो...तुझं तिथे येणं म्हणजेच माझ्यासाठी तर ख्रिसमस चे सर्वात मोठे सरप्राइज गिफ्ट होते. खरच तुला पाहिल्यावर एवढा आनंद ...Read More

9

अनुबंध बंधनाचे. - भाग 9

अनुबंध बंधनाचे.....( भाग ९ )प्रेम आणि अंजली तिच्या घराजवळ येऊन पोहोचतात, एका सुसज्ज अशा सोसायटी मधील बिल्डिंग मधे पहिल्या अंजली रहात होती.दरवाज्याजवळ पोहोचताच तिने बेल वाजवली. प्रेम थोडा अस्वस्थ वाटत होता. अंजलीच्या आईला कसं सामोरं जायचं, हेच त्याला कळत नव्हतं. त्यांनी काही विचारले तर काय बोलायचे. हा सर्व विचार मनात चालु असतानाच दरवाजा उघडला गेला. आणि समोर अंजलीची आई ( मॉम ) उभी होती.तिला पाहून अंजली बोलली....अंजली : मॉम... बघ कोण आलंय...?मॉम : मला वाटतं की...हा प्रेम आहे, बरोबर ओळखलं ना...अंजली : हो... अगदी बरोबर ओळखल...* असे बोलुन मॉम प्रेमला आत यायला सांगते. प्रेम थोडा घाबरतच आत येतो.आत येताच ...Read More

10

अनुबंध बंधनाचे. - भाग 10

अनुबंध बंधनाचे.....( भाग १० )प्रेम आणि अंजली यांचं नातं आता हळु हळू असच फुलत चाललं होतं. त्यांचं बोलणं आता वाढलं होतं, अधून मधून भेटत होते. नकळत दोघांनाही आता एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता.अंजली वयाने खुप लहान होती. या गोष्टीचं नेहमी भान ठेऊनच प्रेम तिच्याशी फक्त मैत्रीच्या नात्यानेच रहात होता. ते अंतर ठेवूनच तो तिच्याशी वागत होता.सर्व लहान मोठ्या गोष्टी एकमेकांसोबत बोलल्या जात होत्या. असेच छान दिवस चालले होते. दोघेही एकमेकांसोबत खुप खुश होते.बघता बघता अशीच दोन वर्ष निघुन गेली. या दोन वर्षांमध्ये ते दोघे अजुनच जवळ आले होते. त्यांची मैत्री आता हळु हळु वेगळं वळण घेत होती.प्रेम आता ...Read More

11

अनुबंध बंधनाचे. - भाग 11

अनुबंध बंधनाचे.....( भाग ११ )हा अजुन कसा आला नाही....11 वाजेपर्यंत तरी येतो बोलला होता. मग कुठे दिसत कसा नाही. ऑफिस ला पण सुट्टी आहे. मग घरी कॉल करून बघु का...? असा विचार करत जवळच असलेल्या एका PCO कडे गेली.खरं तर प्रेम खुप आधीच तिथे आला होता. एका गाडीच्या पाठीमागे उभा राहुन हे सर्व पहात होता. शेवटी त्याला पण रहावलं नाही, अजुन त्रास द्यायला नको म्हणुन, तो हळूच जाऊन तिच्या मागे येऊन उभा राहिला.अंजलीने हातातील बॅग खाली ठेवत पर्स मधून एक कॉइन काढला. आणि रिसिवर उचलुन कॉइन टाकला आणि प्रेमच्या घरचा नंबर डायल केला. रिंग होणार तेवढ्यात प्रेम हळूच पाठीमागून ...Read More

12

अनुबंध बंधनाचे. - भाग 12

अनुबंध बंधनाचे.....( भाग १२ )आपण एका हॉटेल मधे आहोत हे लक्षात घेऊन प्रेम अंजलीला स्वतःपासून थोडं बाजुला करतो. तिचे पाण्याने भरलेले असतात. प्रेम त्याचा खिशातील रुमाल काढून तिचे डोळे पुसतो. प्रेमला खरं तर खुप काही बोलायचं असतं पण तिच्या समोर तेव्हा तो शांत बसतो. तिच्याकडे पाहून एक हलकस स्माइल करतो. प्रेम : अंजली मॅडम... या गंगा जमुना वाहुन झाल्या असतील तर. थोडं फ्रेश व्हाल का ? सर्व मेकअप उतरला आहे. अंजली : ( डोळे पुसत ) चल मी काही जास्त मेकअप करत नाही. इतर मुलींसारखा कळलं...प्रेम : अरे हो.... पण ते खारट पाणी सर्व चेहऱ्यावर पसरलं आहे ना ते ...Read More

13

अनुबंध बंधनाचे. - भाग 13

अनुबंध बंधनाचे.....( भाग १३ )अंजलीच्या घरी पार्टीची जोरदार तयारी झालेली असते. सर्व पाहुणे, व तिचे मित्र मैत्रिणी जमा झालेले म्युझिक प्लेअर वर गाणी चालु असतात. संपुर्ण हॉल व्हाईट आणि पिंक कलर च्या बलून ने सजवलेला असतो. एका टेबलवर मोठा असा छान केक ठेवलेला असतो. अंजली पण तिच्या मॉम ने तिच्यासाठी खास बनऊन घेतलेला व्हाईट कलर चा फुल ड्रेस घालुन तयार होती. डोक्यावरती छान असा डायमंड चा कियारा घातलेला होता. आज ती खरच एका राजकुमारी सारखी दिसत होती. केक कापण्यासाठीची सर्व तयारी झाली होती. सर्वजण तिला केक कापण्यासाठी आग्रह करत होते, पण तिची नजर दरवाज्याकडे होती. कारण प्रेम अजुन ...Read More

14

अनुबंध बंधनाचे. - भाग 14

अनुबंध बंधनाचे.....( भाग १४ )आज दिवसभरात जे काही घडलं होतं त्यामुळे एवढ्या सहजपणे दोघांनाही लवकर झोप येणं शक्य नव्हते. घरी पार्टी असल्यामुळे तिलाही झोपायला उशीर झाला होता. पार्टीमध्ये डान्स वगैरे करून ती पण थोडीफार थकली होती. पण तरीही तिला पण झोप येत नव्हती.सकाळी जे काही घडलं होतं, ते पुन्हा सर्व डोळ्यासमोरून जात होते. तो क्षण पुन्हा पुन्हा आठऊन ती हाच विचार करत होती,खरच आज जे काही घडले ते स्वप्न तर नव्हते ना...?खरच प्रेम ने माझं प्रेम स्वीकारलं आहे... आता आयुष्यभर तो फक्त आणि फक्त माझाच असणार. ज्या क्षणाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होते, शेवटी तो क्षण आज आला ...Read More

15

अनुबंध बंधनाचे. - भाग 15

अनुबंध बंधनाचे.....( भाग १५ )आज सोमवार होता. रोजच्याप्रमाणे प्रेम ऑफिस मधे आला होता. दुपारी लंच टाईम झाल्यावर दोन वाजता कॉल येणार हे जवळजवळ नेहमीचं झालेलं होतं. कारण त्याचे बॉस लंच साठी घरी जायचे मग त्यांना यायला चार तरी वाजायचे. हा वेळ प्रेमसाठी तसा फ्री असायचा.अंजलीच्या घरी तसा काही प्रॉब्लेम नव्हता. कारण तिच्या रूम मधे पण फोन होता. म्हणून अंजली दुपारी दोन नंतरच त्याला कॉल करायची. आजची गोष्ट जरा वेगळी होती. दोन वाजून गेले होते. प्रेम खुप वेळ तिच्याच फोन ची वाट पहात होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. आणि प्रेम ने रीसिवर उचलुन कानाला लावला.अंजली : हाय... जानु.... कसा आहेस...?प्रेम ...Read More

16

अनुबंध बंधनाचे. - भाग 16

अनुबंध बंधनाचे.....( भाग १६ )* प्रेम आणि अंजली दोघेही एकमेकांकडे फक्त पहात होते. प्रेमच्या पण ही गोष्ट लक्षात आली जे काही घडलं ते खुप वेगळं होतं आणि खुप छान वाटत होतं तिच्या मिठीत. त्याला असं शांत पाहून अंजली बोलली...*अंजली : कळलं आता तुला,...मी का असं बोलत होते ते...काय फील करत होतास तू...?प्रेम.....आपण आता मैत्रीच्या खुप पुढे आलो आहोत. आणि मित्र तर आपण आहोतच आणि नेहमीच असणार.पण आता आपल्यात हे नवीन नातं निर्माण झालं आहे, त्यामुळे साहजिकच फिलिंग बदलल्या आहेत. प्रेम : अंजली...या सर्व गोष्टी काही क्षणासाठी खुप छान वाटतायत, पण मला पुन्हा पुन्हा असच वाटतं की, आपण खुप घाई ...Read More

17

अनुबंध बंधनाचे. - भाग 17

अनुबंध बंधनाचे.....( भाग १७ )जसजसे दिवस पुढे जात होते तसे, प्रेम आणि अंजली यांचं नाते अजुनच बहरत चाललं होतं.दोन अशीच अगदी आनंदात गेली होती. या कालावधीत ते दोघे एकमकांच्या अजुनच जवळ आले होते.त्या दोन वर्षात तिने स्वतः साठवलेल्या पैशातून प्रेमला एकदा मोबाईल फोन गिफ्ट म्हणुन दिला होता. आणि दुसऱ्या वर्षी एक सोन्याची चैन गिफ्ट दिली होती.खरं तर प्रेमसाठी असे महागडे गिफ्ट स्वीकारणं खुप अवघड व्हायचं, पण अंजली थोडी हट्टी होती, ती काहीही करून ते त्याला घ्यायला भाग पाडायची. आणि आता प्रेम जवळ मोबाइल असल्यामुळे ती त्याला कधीही कॉल करू शकत होती. आता वेळेचं बंधन उरलं नव्हतं. अंजली आता ...Read More

18

अनुबंध बंधनाचे. - भाग 18

अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्याला मॉम चा कॉल येतो. मॉम त्याला गावी जायची कळवतात.प्रेम ऑफिस मधे बॉस ना सुट्टीबद्दल बोलतो. आणि त्याला चार दिवसांची सुट्टी मिळते. प्रेम हि गोष्ट मॉम ना सांगतो. मॉम पण खुश होतात. पण या दोघांचा प्लॅन अंजलीला माहीत नसतो.एक दिवस अंजलीचा कॉल येतो,अंजली : प्रेम... मी पुढच्या आठवड्यात मॉम सोबत तिच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी चालली आहे. आपण भेटूया ना त्याआधी.प्रेम : अरे हो पण...काम खुप आहे ऑफिसमध्ये त्यामुळे ऑफिसच्या वेळेत तर नाही भेटता येणार. अंजली : प्रेम... असं काय रे करतोय... गेले पाच महिने आपण भेटलेलो नाही. त्या ...Read More

19

अनुबंध बंधनाचे. - भाग 19

अनुबंध बंधनाचे.....( भाग १९ )गावी जायचा दिवस आलेला असतो. ठरल्याप्रमाणे प्रेम वाटेत त्यांना भेटणार असतो. त्या दिवशी लवकर ऊठुन तयारी करायला लागतो.घरी ताईला सांगितलेलं असतं, मित्राच्या गावी चाललोय म्हणून, छान असे नवीन कपडे घालतो. काही कपडे बॅग मधे घेतो. सर्व तयारी करून बॅग घेऊन देवाच्या पाया पडून तो घरातुन ताईला येतो असं बोलुन निघतो.ठरलेल्या वेळेच्या आधीच तो तिथे येऊन थांबतो जिथे मॉम नी त्याला थांबायला सांगितले होते.इकडे अंजली आणि तिची छोटी बहीण मॉम सोबत एका कार मधुन निघालेले असतात. पुढे जे होणार होते ते, अंजलीसाठी मोठे सरप्राइज होते.खरं तर तिला पुढे बसायचं होते. पण मॉम तिला मागेच बस म्हणुन ...Read More

20

अनुबंध बंधनाचे. - भाग 20

अनुबंध बंधनाचे.....( भाग २० )प्रेम खिडकिमधून बाहेर पहात असतो. एवढ्या वर्षात तो खुप मुंबई फिरून झालेला असतो. पण त्याच असे आकाशातुन दिसणारे दृश्य हे खरोखर विलोभनीय होते.मोठमोठ्या इमारती, अथांग पसरलेल्या समुद्राकडे तो टक लावुन पहात होता.काही क्षण तो हेही विसरतो की अंजली त्याच्या बाजुला बसली आहे, आणि तिचा हात त्याने अजुनही तसाच घट्ट पकडुन ठेवलेला असतो.अंजली मात्र त्याच्याकडेच पहात असते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला स्वतःला एक वेगळा आनंद देत होते.आता ते लोक आकाशात खुप वरती आलेले असतात. खिडकीतून बाहेर चोहीकडे फक्त आणि फक्त ढग पसरलेले दिसतात. जणु काही स्वर्गातून प्रवास करतोय असं त्याला वाटत होते.आयुष्यातल्या त्या पहिल्या वहिल्या अविस्मरणीय ...Read More

21

अनुबंध बंधनाचे. - भाग 21

अनुबंध बंधनाचे.....( भाग २१ )प्रेम आतल्या रूम मधे झोपलेला असतो. पहाटेचे सात वाजलेले असतात. अंजली अंघोळ वगैरे करून फ्रेश तयार पण झालेली असते. मॉम तिला प्रेमला उठवायला सांगतात तशी ती त्या रूम मधे येते.प्रेम गाढ झोपेत असतो. ती फक्त त्याला पहातच राहते. इकडे तिकडे बघुन हळुच ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या केसातुन हात फिरवत त्याच्या कपाळावर किस करते. तिचे ओले झालेले केस त्याच्या चेहऱ्यावर फिरत असतात. प्रेमला त्या सुखद स्पर्शाची जाणिव होते आणि त्याला जाग येते, तो डोळे उघडतो तर...अंजली अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ होती. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर जातात आणि तिला तसच मिठीत घेतो. तिने मारलेल्या ...Read More

22

अनुबंध बंधनाचे. - भाग 22

अनुबंध बंधनाचे.....( भाग २२ )प्रेम बाहेर टीव्ही बघत बसलेला असतो. मस्त फिल्म लागलेली असते,' दिल तो पागल है... समोर माधुरी आणि शाहरुख खान चा एक रोमँटिक सीन चालु असतो.....त्याच वेळी अंजली अंघोळ करून टॉवेल ने तिचे ओले केस पुसत तिथे येते. प्रेमचे लक्ष टीव्ही कडे असते.अंजली पाठीमागून त्याच्या जवळ येते. टॉवेल तिथेच बाजुला ठेऊन देते, आई तिथे नाही याची खात्री करून ती तिचे दोन्ही हात मानेवरून त्याच्या हनुवटी जवळ घेत, हळुवार त्याचे डोके कोच वर टेकवते.तिच्या ओल्या केसांनमधुन टपकणारे पाण्याचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. दोघांची नजरानजर होताच अलगद ती त्याच्या कपाळावर किस करते. आणि पटकन तिथून बाजुला होते. ...Read More

23

अनुबंध बंधनाचे. - भाग 23

अनुबंध बंधनाचे.....( भाग २३ )प्रेम बाहेर टीव्ही बघत बसलेला असतो. अंजली पण थोड्या वेळाने तिथे येते. दोघे बोलत असतात...अंजली मग... कसं झालेलं जेवण...प्रेम : खुपच छान आणि टेस्टी झालेला रस्सा...अंजली : पण तु खुप कमी जेवलास...प्रेम : अरे... सकाळी पण खुप जास्त खाल्ले ना... मग जागा नको का पोटात...जिरणार कसं... एका जागी बसुन....अंजली : अच्छा... असं आहे का, मग जरा फिरून यायचं ना गावातून...प्रेम : मी... एकटा जाऊ... मला कोण ओळखत पण नाही ना इथे...मग अंजली : अच्छा... मग आपण दोघे जाऊ... चालेल...?प्रेम : नको... आता... संध्याकाळी जावू हवं तर... अंजली : बरं ओके... मग आत्ता काय करायचं...प्रेम : ...Read More

24

अनुबंध बंधनाचे. - भाग 24

अनुबंध बंधनाचे.....( भाग २४ )आज रविवार असल्यामुळे प्रेम थोडा उशिराच उठतो. अंघोळ वगैरे आवरून तो आरव च्या घरी येतो. पण आज सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. दोघे त्याच्या रूम मधे गप्पा मारत बसतात.आरव : काय रे... कुठे गेला होता... एवढे दिवस...?प्रेम : अरे... ऑफिस मधील एका मित्राच्या गावी गेलो होतो. कोकणात...आरव : अच्छा... मजा आहे तुझी... एवढे दिवस सुट्टी... मस्त एन्जॉय केला ना...प्रेम : हो...रे... छान रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं... आरव : कोणत्या गावी गेला होता रे...? प्रेम : अरे... गोव्याच्या थोडं अलीकडेच... गावाचं नाव आता आठवत नाही. आरव : अच्छा... मग गोव्याला बीच वर वगैरे जाऊन आला की नाही...प्रेम ...Read More

25

अनुबंध बंधनाचे. - भाग 25

अनुबंध बंधनाचे.....( भाग २५ )आज प्रेमचा वाढदिवस होता. आजपर्यंत मित्रांसोबत खुप वेळा पार्ट्या करून वाढदिवस साजरा करत होता. पण दोन तीन वर्षापासून त्याचा वाढदिवस अगदी स्पेशल सेलिब्रेट होत होता. कारण आता त्याच्या आयुष्यात अंजली होती.यावेळी तिने काहीतरी वेगळं ठरवलं होतं. त्यासाठी आधीपासूनच तिने सर्व प्लॅनिंग करून ठेवले होते. आणि प्रेमला त्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगितली होती. यावेळी मॉम ना सुध्दा खरं तेच बोलुन म्हणजे, "प्रेमचा वाढदिवस आहे, आणि मी त्याच्यासोबत गेट वे ला जाणार आहे, आणि येताना शॉपिंग पण करून येईन" असं बोलून त्यांच्याकडून परमिशन पण घेतली होती. मॉम नी तिला काही पैसे पण दिले होते, त्याच्यासाठी छान काहीतरी ...Read More

26

अनुबंध बंधनाचे. - भाग 26

अनुबंध बंधनाचे.....( भाग २६ )आज खुप दिवसांनी दोघांना हवा तसा एकांत मिळालेला असतो. प्रेम अलगद तिला मिठीत घेतो. दोघेही घट्ट मिठी मारतात. थोडा वेळ तसेच उभे असतात. अंजली हळुच त्याच्या कानात बोलते.अंजली : आय लव्ह यू... प्रेम... हा क्षण माझ्यासाठी खुप स्पेशल असतो नेहमीच. तुझ्या मिठीत आल्यावर स्वर्गसुख मिळाल्यासारखे वाटते. हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सुख आहे.प्रेम : अच्छा... मला पण काहीसं असच वाटतं. अंजली : हो... का... प्रेम : हो... खरच... खुप छान वाटतं. तुझ्या मिठीत असताना सर्वकाही विसरून जातो मी... अंजली : अच्छा... मग असच रहायचं का...प्रेम : हो... चालेल मला...अंजली : अच्छा... बरं ओके. तु बोलशील ...Read More

27

अनुबंध बंधनाचे. - भाग 27

अनुबंध बंधनाचे.....( भाग २७ )हॉटेल मधुन बाहेर पडल्यावर अंजली प्रेमला एका शॉपिंग सेंटर मधे घेऊन येते. तिथे एका स्टोअर त्याच्यासाठी टि शर्ट चॉईस करत असते. तेवढ्यात प्रेम तिला बोलतो....प्रेम : अंजली... काय चाललंय तुझं...?अंजली : काय म्हणजे... बर्थ डे बॉय साठी शॉपिंग करतेय....प्रेम : अरे पण झालं ना आता...( तिला बोटातील अंगठी दाखवत ) गिफ्ट मिळालं मला....बर्थ डे चे...अंजली : अरे हो... ते माझ्याकडून होते... आणि हे मॉम कडून तुझ्यासाठी आहे.....कळलं....प्रेम : अरे... पण काय गरज आहे का याची....?अंजली : हो... नक्कीच आहे.... कारण काय आहे ना... मिस्टर प्रेम.... मॉम ने तुला गिफ्ट घेण्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहेत. ...Read More

28

अनुबंध बंधनाचे. - भाग 28

अनुबंध बंधनाचे.....( भाग २८ )अखेर तो दिवस आला होता. १५ ऑगस्ट.प्रेम ने आधीच सर्व प्लॅनिंग केले होते. तिचा वाढदिवस दिवशी येत असल्यामुळे तिला जास्त वेळ बाहेर पडता येणार नव्हते, हे प्रेमला माहित होते. कारण त्या दिवशी तिचे डॅड पण घरीच असत. त्यांच्या घरी तर तिचा वाढदिवस खुप मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जात असे.पण प्रेमला तिच्यासाठी छोटसं का होईना पण छान काहीतरी सरप्राइज करायचं होतं.ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रेम आरवची बाईक घेऊन तिला घ्यायला ठरलेल्या ठिकाणी पोचला होता. अंजली अजुन आली नव्हती. हातात फोन घेऊन तिच्या घरी कॉल करावा की नको या विचारात ती येणाऱ्या दिशेकडे पहात तिची ...Read More

29

अनुबंध बंधनाचे. - भाग 29

अनुबंध बंधनाचे.....( भाग २९ )खुप वेळ झाला प्रेम तिथेच त्या गर्दीमधे तिच्या एका नजरेची वाट बघत होता.त्यांची प्रेयर झाल्यावर तिचे लक्ष दरवाज्याकडे गेले,,,,,,,प्रेमला वाटले आता तरी आपण तिला दिसू, पण त्याच क्षणी कोणीतरी एक मोठा फुलांचा बुके हातात घेऊन पुढे जात होते. त्यामुळे प्रेमचा चेहरा काही तिला नीटसा दिसला नाही.तो बुके घेऊन जाणारा सुटाबुटातील मुलगा आपल्या फॅमिली सोबत सरळ तिच्यापर्यंत पोचला. अंजलीच्या हातात तो फुलांचा बुके देऊन त्याने तिला हलकीशी मिठी मारत बर्थ डे विश केलं. त्याच्या आईने सोबत आणलेल्या एका छोट्याश्या बॅग मधुन एक गिफ्ट बाहेर काढले आणि तिला दिले. त्या मुलाने तिथेच ते गिफ्ट तिला ओपन करायला ...Read More

30

अनुबंध बंधनाचे. - भाग 30

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३० )दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्रेम आवरून कामाला चालला होता. एरिया मधुन बाहेर पडताच मेन रोड त्याला समोरच स्कुटी घेऊन उभी असलेली अंजली दिसली.... तिने लांबुनच त्याला पाहून हात केला.... तो घाईतच तिच्याजवळ जाऊन पोचला आणि तिला म्हणाला.....प्रेम : तु काय करतेय इथे, एवढ्या सकाळी,...? आणि किती वेळा सांगितलं आहे तुला, इथे नको थांबत जाऊ, सगळे ओळखीचे लोक असतात इकडे.अंजली : अच्छा...! असुदे मग...! मला नाही कोण ओळखत इथे तुझ्याशिवाय....! आणि तसंही मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेय...! मग त्यांना काय प्रोब्लेम आहे का....?प्रेम : कधी कळणार तुला काय माहित...! आधी चल इथून....!*असं बोलत तो तिला मागे ...Read More

31

अनुबंध बंधनाचे. - भाग 31

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३१ )शिल्पाच्या घरी सर्वांची तयारी चालु असते. मेघा सॅड्रिक चा मेकअप करत असते. शिल्पा तिच्या भावाचा करत असते.हे दोघे आल्यावर त्यांच्याकडे पाहून मेघा बोलते.मेघा : प्रभू राम आणि माता सीतेचे आगमन झाले आहे. सर्वांनी त्यांना नमस्कार करावा. *तिचे बोलणे ऐकून सर्वजण त्या दोघांकडे पाहून हात जोडतात. अंजली : झालं चालु तुझं....? तुला तर आता बघतेच मी....!*असं बोलुन ती मेघाच्या अंगावर धाऊन जाते, तोवर प्रेम तिचा हात पकडुन तिला थांबवतो.प्रेम : काय चाललंय तुझं...? नुसती भांडत असते.मेघा : बघा ना प्रभू...? वाचवा आम्हाला...! सॅड्रिक : ओय...! बस् झाले तुमचे...!. चला आवरा आता, अजुन या दोघांची तयारी पण ...Read More

32

अनुबंध बंधनाचे. - भाग 32

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३२ )काल रात्री घडलेल्या घटनेमुळे अंजली रात्रभर झोपली नव्हती. इकडे प्रेमची स्थिती काही वेगळी नव्हती. तो हाच विचार करून रात्रभर झोपला नव्हता.या दिवसाची पहाट जरा वेगळीच होती. पुढे काय होणार होते याची दोघांनाही भीती वाटत होती.सकाळी उठल्यावर प्रेम सर्व आवरून घराबाहेर पडला. आणि जवळच असलेल्या साई बाबांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊन तो तिथेच एकांतात विचार करत बसला होता. आज दसरा असल्यामुळे त्याला सुट्टी होती. आणि आज देवीचे विसर्जन होते. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा तिकडे जावं लागणार होतं.पण कालच्या घटनेमुळे तिकडे जावं की नको, असा विचार त्याच्या डोक्यात येत होता.अंजलीच्या घरी खुप काही झाले होते. काल रात्री ...Read More

33

अनुबंध बंधनाचे. - भाग 33

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३३ )काल रात्री जागरण झाल्यामुळे आज प्रेम थोडा उशिराच उठला होता. कामावर जायला उशीर झाल्यामुळे घाईतच तो टिफीन घेऊन घराबाहेर पडला. थोड्या वेळातच तो कंपनीत पोचला, बाप्पाच्या फोटोला हार चढवून अगरबत्ती लाऊन सर्व काही ठिक होऊ दे असा आशीर्वाद मागत आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली.इकडे अंजली सुद्धा नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून आवरून कॉलेजला निघुन आली होती. पण आज तिचे लेक्चर वरती लक्ष लागत नव्हते. कसेतरी सर्व लेक्चर अटेंड करून ती कॉलेज मधुन निघाली. सोबत मेघा आणि सॅड्रिक पण होते.त्या दोघांनाही या गोष्टीची कल्पना होती. पण आज सविस्तर तिच्याकडून जाणून घ्यायचे असे ठरवून ते दोघे तिला घेऊन ...Read More