Anubandh Bandhanache - 38 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 38

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 38

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३८ )
बघता बघता मधले दिवस निघुन जातात. प्रेम ने पण ऑफिस मधे त्याच्या बॉस ला सांगुन सुट्टी घेतली होती. प्रेमचा पासपोर्ट, सर्वांचे विसा, फ्लाईट चे तिकीट सर्व काही कन्फर्म झालेले असते. 
आता फॉरेन ट्रिप म्हटल्यावर थोडीफार खरेदी तर होणारच. मग निघायच्या चार दिवस आधीच अंजली तिच्या मॉम सोबत शॉपिंग करायला मार्केट मधे जाते.
तिथे पोचताच मॉम तिला बोलतात...
मॉम : काय ग...! तुझी शॉपिंग होईल, पण प्रेम चं काय...? तो पण येणार आहे ना तुमच्यासोबत, मग त्याला नको शॉपिंग करायला...? 
अंजली : हो... पण...! 😔
मॉम : काय झालं...?🤔
अंजली : असं वाटतं त्याला उगाच खर्च करायला भाग पाडतोय. तो तरी कुठुन करेल सर्व...? 😔
मॉम : अरे व्वा...! एवढा विचार करायला लागली माझी परी. 😊 बरं ठिक आहे ना, आपण करू त्याच्यासाठी खरेदी. मग तर झालं....! 😊
अंजली : हो... पण, त्याला नाही आवडत, असं काही त्याच्यासाठी घेतलेलं. 😔
मॉम : कसं नाही आवडणार...? तु त्याला सांग की, मॉम ने शॉपिंग केलीय त्याच्यासाठी, नाहीतर मीच बोलेन त्याच्याशी... ओके...! 😊
अंजली : हो... चालेल...! मग तो काही न बोलता घेईल बघ....!😊
मॉम : बरं...! तुला त्याच्या कपड्यांची साइज माहित आहेत ना..?😊
अंजली : हो...! शर्ट... 38, जीन्स... 32, शूज... 8 नंबर. 😊
मॉम : क्या बात है...! तोंड पाठ सर्व...! मस्त...!👌🏻😊
अंजली : अगं ते लास्ट टाईम त्याच्या बर्थ डे ला नाही का, त्याला गिफ्ट केलेलं, म्हणुन लक्षात राहिलं. 😊
मॉम : इट्स ओके बेटा...! पण छान...!😊 चला आता शॉपिंग करू. 😊
* त्या दोघी मिळुन खुप शॉपिंग करतात. त्यात तिचे ड्रेस, प्रेमला शर्ट, टी शर्ट, तिचे सँडल, त्याचे शुज्, गॉगल, परफ्यूम, बॅग. असं खुप काही शॉपिंग झाल्यावर त्या सर्व बॅग घेऊन दोघी ऑटो पकडुन घरी यायला निघतात. संध्याकाळचे आठ वाजुन गेलेले असतात. अंधार पडलेला असतो. वाटेत अंजली मॉम ला बोलते...
अंजली : मॉम...! त्याच्या शॉपिंग च्या बॅग आपण घरी कशा घेऊन जायचं...? 🤔
मॉम : हो... ग...! एक काम करूया त्याला कॉल करून बघ कुठे आहे तो, आणि त्याला बाहेर मेन रोड ला यायला सांग. आपण तिथेच त्याला देऊ हे सर्व. 
अंजली : बरं ओके...!😊
* ती प्रेमला कॉल करते. तो कॉल रिसिव्ह करत बोलतो....
प्रेम : हाय...! कशी आहेस...? 
अंजली : मी बरी आहे...! तु कुठे आहेस आत्ता...?
प्रेम : मी घरीच आहे...! का... काय झालं...?🤔
अंजली : एक काम कर ना...! मेन रोड ला ये ना, थोड्या वेळात, मी पोचतेय थोड्या वेळात तिथे. 
प्रेम : का...? असं अचानक....!🤔
अंजली : तु आधी ये तर... मग बोलू... बाय.😊
प्रेम : बरं ओके...! येतो. 😊
* प्रेम थोडा विचार करतच घरातुन निघतो, ' काय झालं असेल...? अचानक का येतेय ती...? '
त्या विचारात तो मेन रोड ला येऊन पोचतो. आणि तिची वाट पहात उभा राहतो.
थोड्याच वेळात त्यांची ऑटो त्याच्याजवळ येऊन थांबते. ऑटो मधे तिच्यासोबत मॉम ला पाहून तो थोडा दचकतो. तो ऑटो जवळ जाऊन मॉम शी बोलतो.
प्रेम : हाय... मॉम...! कशा आहात...? 😊
मॉम : मी बरी आहे...! तु कसा आहेस...? खुप दिवसांनी भेटलो ना आपण...!,😊
प्रेम : हो... ना...! कुठे गेला होतात...?🤔
अंजली : शॉपिंग ला....!😋 जायचं आहे ना आपल्याला...!😊
मॉम : बघ किती खुश आहेत मॅडम... बाहेर जायचं म्हटल्यावर. 😊
प्रेम : अच्छा...! मग झाली का शॉपिंग...?😊
मॉम : म्हणजे काय...! हे बघ... ! खुप शॉपिंग केलीय . आणि हे तुझ्यासाठी माझ्याकडून....😊
* असं बोलुन मॉम हातातील दोन बॅग ज्यामध्ये त्याचे कपडे, शुज होते ती त्याला देतात.
प्रेम : मॉम...! हे काय...? मी पण जाणारच होतो खरेदीसाठी उद्या, तुम्ही कशाला आणलं हे सर्व...?🤔
मॉम : ठिक आहे ना...! मी काही घेऊ शकत नाही का तुझ्यासाठी...?🤔
प्रेम : असं काही नाही मॉम...! पण...! 🙂
मॉम : पण बिन काही नाही, गपचुप घे हे... कळलं.🙂
* प्रेम पुढे काही बोलू शकत नव्हता, त्याने त्या दोन्ही बॅग हातात घेतल्या. थोडा वेळ त्यांच्या सोबत बोलुन तो त्यांना बाय करून घरी आला.
घरी आल्यावर एवढी शॉपिंग बघुन ताईने त्याला विचारले.
ताई : एवढी खरेदी कशासाठी केलीय, गावी जातोय का...? 🤔
प्रेम : हो...! पण आपल्या नाही...! मित्राच्या गावी चाललोय. 😊
ताई : कधी चाललाय...? मग बोलला का नाहीस...?
प्रेम : चार दिवसानंतर जातोय...! सांगनारच होतो तुला. 😊
ताई : किती दिवसांसाठी चाललाय...? आपल्याला गावी पण जायचं आहे, लक्षात आहे ना...! 
प्रेम : आठवडा तरी जाईल, तिकडून आल्यावर मग जाऊ आपण. 😊
ताईशी गप्पा मारत बॅग मधील कपडे काढून घालुन बघतो. सर्व अगदी बरोबर फिट असतात. सोबत शूज पण घालुन बघतो. तेही अगदी बरोबर मापाचे असतात. बॅगेत अजुन बरच काही होते, कॅप, गॉगल, परफ्यूम आणि एक लेदर पर्स पण होती. ती पर्स हातात घेऊन तो उघडुन पाहतो तर त्यामध्ये काही पैसे पण होते. ते पाहून त्याला थोडे वाईट वाटते. आणि अंजलीचा राग पण येतो. शॉपिंग वैगेरे ठिक आहे पण पैसे का दिलेत तिने....? तिने असं नको करायला हवं होतं. हे तिला बोलायलाच हवं... असं मनातच ठरवून तो मोबाईल हातात घेतो. पण आता खुप उशीर झालेला असतो. त्यामुळे तो तिला कॉल करू शकत नव्हता. शेवटी रहावेना म्हणुन तो तिला एक मॅसेज पाठवतो. " सकाळी मला कॉल कर. "
अंजली त्याचा मॅसेज वाचते. ती पण कॉल करू शकत नव्हती. म्हणुन त्याच्या मॅसेज ला रिप्लाय देते. " ठिक आहे करेन कॉल सकाळी."
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेम सर्व आवरून ऑफिस ला आलेला असतो. तो अंजलीच्या कॉल ची वाट पहात असतो. साडे दहाच्या सुमारास तिचा कॉल येतो. प्रेम कॉल रिसिव्ह करतो.
अंजली : ओ मेरे जानु...! कैसे हो...? 🥰
प्रेम : मी ठिक आहे...!🙁
अंजली : काय...झालं...? मुड ठिक नाही का...?
प्रेम : अंजु...! तुला माहित आहे ना, ज्या गोष्टी मला आवडत नाहीत, तु तेच का करते...?🤔
अंजली : काय झालं प्रेम...! मी काय केलं...?🤔
प्रेम : काल जी शॉपिंग केली होती, त्या बॅग मधील पर्स मधे काही पैसे पण होते, तुच ठेवले होते ना...?🤨
अंजली : कसले पैसे...? मी नाही ठेवलेत, तुझी शपथ. खरं बोलतेय...! 
प्रेम : मग कुठुन आले पैसे त्यामध्ये....?🤔
अंजली : एक मिनिट थांब...! 
*असं बोलुन ती तशीच किचन मधे जाते. या सर्व प्रकाराबद्दल ती मॉम ला विचारते.
अंजली : मॉम...! काल प्रेमला दिलेल्या पर्स मधे तु पैसे ठेवले होतेस....? 🤔
मॉम : हो...! का...! काय झालं...? 
अंजली : मॉम...! सांगत तरी जा ना...! हा बघ प्रेम कॉल वर आहे, तो उगाच मला ओरडतोय, हे घे तुच बोल त्याच्याशी...!
* असं बोलुन ती मोबाईल मॉम ला देते.
मॉम : प्रेम...! काय झालं रे..! ते पैसे मीच ठेवले होते. आणि अंजुला त्याबद्दल मी काहीच बोलले नव्हते.
प्रेम : मॉम...! पण त्याची काय गरज होती...! एवढी सर्व शॉपिंग केलीत तुम्ही माझ्यासाठी आणि वरून हे पैसे...!
मॉम : प्रेम...! मला वाटलच होतं, कदाचित तुला आवडणार नाही, म्हणुन मीच तुला कॉल करून बोलणार होते. तुम्ही एवढ्या लांब चालले आहात. थोडे पैसे सोबत असलेले बरे. म्हणुन मीच त्या पर्स मधे ठेवले होते. 
प्रेम : पण मॉम...! पैसे आहेत माझ्याजवळ, तुम्ही कशाला दिलेत...!
मॉम : प्रेम एक गोष्ट सांग...! एक आई म्हणुन.. मला तेवढा ही हक्क नाही आहे का, की मी तुला काही पैसे खर्चासाठी देऊ शकत नाही. 
प्रेम : मॉम... ! तसं काही नाही...! पण.. !
मॉम : पण... काय...! आता अंजूला देतेय ना, मग तुला का नाही...? जास्त विचार करू नको, कळलं. !एन्जॉय करा तिकडे आणि येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये मग...!😊
प्रेम : हो मॉम... ! नक्कीच...! 🙂
मॉम : आणि हो...! तिला खरच काही माहीत नव्हते, त्यामुळे आता भांडू नका. मस्त तयारी करा जायची. ओके...! 😊
प्रेम : हो... मॉम...!🙂
मॉम : बरं... मी आता आवरते जरा, तुम्ही बोला.😊
* असं बोलुन मॉम फोन अंजुला देतात, ती फोन घेऊन बोलत तिच्या रूम मधे येते...
अंजली : आता तरी झालं समाधान...! यामधे मी काहीच केलेलं नाही. कळलं...!😊
प्रेम : ओके...! सॉरी....! उगाच तुला बोललो. 🙁
अंजली : इट्स ओके...! मला माहितीय तुला हे सर्व आवडत नाही. पण आता मॉम ची मर्जी....!😋
प्रेम : बरं चल...! मी आता ठेवतो फोन. थोडं काम आहे. 🙂
मॉम : बरं ठिक आहे.....! बाय मेरे जानु...!🥰
* प्रेम तिला बाय करून त्याच्या कामात व्यस्त होतो.
पुढील दोन तीन दिवस प्रत्येकजन आपापली तयारी करत असतात. प्रेम पण त्याच्या एका मित्राकडून एक बॅग घेऊन येतो. तिकडे वापरासाठी कपडे व इतर सर्व गोष्टी तो बॅग मधे भरून ठेवतो. 
निघायच्या एक दिवस आधी सर्वजण भेटतात. कारण या तिघांना सोडायला कोणी ना कोणी एअरपोर्ट वर येणारच होते. प्रेमला पण जास्त काही माहीत नव्हते. त्यामुळे, मेघा त्याला व्यवस्थित समजावते. त्याची तिकीट, विसा, पासपोर्ट त्याला देते. 
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेम लवकरच ऊठुन आवरायला लागतो. फ्लाईट दुपारी होती पण त्याला लवकर पोचायचं होतं. सर्व आवरून तो ताईला सांगुन घरातुन निघतो. जाताना आरवला कॉल करून फक्त एवढच बोलतो की, मित्राच्या गावी चाललोय, आठवडाभर तरी राहणार आहे तिकडे. 
तिथून टॅक्सी करून तो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ला पोचतो. थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत तो बॅग घेऊन आपले तिकीट आणि पासपोर्ट दाखवून पाच नंबर गेट मधुन आत मधे जातो. 
मागच्या वेळेस मॉम सोबत होत्या, त्यामुळे काही टेन्शन नव्हते. पण यावेळी तो एकटा होता. त्यात इंटरनॅशनल ट्रॅव्हल. 
तसं मेघाने त्याला काल व्यवस्थित सर्व प्रोसेस समजावून सांगितली होती. तरीही आतील वातावरण पाहून तो थोडा गोंधळुन गेला होता.
थोडा वेळ एका जागी थांबुन तो तिने सांगितल्याप्रमाणे पासपोर्ट, तिकीट हातात घेऊन तो चेकिंग विंडो वर जाऊन चेकिंग प्रोसेस पुर्ण करतो. तिथे मोठी बॅग टॅग लाऊन ती लगेज सेक्शन ला जाते. मग तिथून बोर्डिंग पास घेऊन तो सिक्युरिटी चेकिंग साठी पुढे जातो. इमिग्रेशन झाल्यावर तो थोडा फ्री होतो. हातातील पासपोर्ट, बोर्डिंग पास वगैरे आपल्या सॅक मधे ठेऊन तो ड्युटी फ्री एरिया मधे जाऊन तिथेच थोडा टाईम पास करतो. कारण फ्लाईट ला अजुन खुप वेळ बाकी होता. थोडा वेळ फिरून झाल्यावर तो बोर्डिंग पास वर दिलेल्या गेट नंबर कडे जायला निघतो. तेवढ्यात त्याला चेकिंग काउंटर वर हे तिघे पण दिसतात. तसा याच्या जिवात जीव येतो. 
तो लगेच तिथे पोचतो. अंजली प्रेमला समोर पाहून तिथेच त्याला मिठी मारते. त्यांना पाहून मेघा बोलते..
मेघा : अरे...हो...! तो पण येतोय आपल्यासोबत...! 😋
अंजली : तु गप्प बस्.....!😊
मेघा : प्रेम...! कधी आला तु...?
प्रेम : एक तास तरी झाला असेल...!😊
मेघा : चेकिंग प्रोसेस झाली सर्व तुझी...?
प्रेम : हो...!😊
मेघा : अरे व्वा...! तरी मी बोलत होते हिला...! करेल तो सर्व नीट, तेवढा हुशार आहे तो...! पण येताना नुसती बडबड गाडीमध्ये...😊 कॉल कर त्याला, पोचला का विचार...? आता तुच सांग... कसं बोलणार मी... पप्पा पण सोबत होते. एवढी पण अक्कल नाही हिला.
अंजली : बरं...! तुझी बडबड राहू दे.... आता... आला ना तो...🥰
प्रेम : कसे आलात तुम्ही, आणि सोडायला कोण आलेलं. ...?
मेघा : माझे पप्पा...! व्ही आय पी सर्व्हिस, त्यांच्या गाडीतून आलो सर्व. 😊
प्रेम : अरे व्वा.... मस्तच...!,,😊
* हे लोक गप्पा मारत असतात तेवढ्यात चेकिंग काउंटर वरून सॅड्रिक त्यांना आवाज देतो.
आता थोडी गर्दी वाढलेली असते त्यामुळे त्याच्या सर्व प्रोसेस होईपर्यंत दोन तास जातात. त्या वेळेत प्रत्येकजण आपल्या जवळील पैसे एक्सचेंज करून घेतात. 
ते झाल्यावर तिथून ते फ्लाईट लागते त्या गेटवर जातात. तिथे वेटींग झोन मधे थांबतात. मग पुन्हा गप्पांना सुरुवात होते.
मेघा : फायनली मी ठरवलं होतं, अगदी तसच होतंय. आपण चौघेही निघालोय दुबईला.🥰
* असं बोलुन ती त्या तिघांना पण एकत्र करून ग्रुप मिठी मारतात. सर्व खुप हॅप्पी असतात. खास करून अंजली, कारण पुढचे काही दिवस ती प्रेम सोबत असणार होती. या गोष्टीचा तिला जास्त आनंद होता.
या आधी पण ती फॅमिली सोबत दुबईला दोन वेळा जाऊन आली होती. पण आजची तिची ही जर्नी थोडी वेगळी असणार होती.
सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. अंजली प्रेमच्या बाजुला बसलेली असते. त्याचा हात हातात घेत अखेर ती प्रेमला बोलते...
अंजली : थॅन्क्स प्रेम....! 🥰
* प्रेम तिच्याकडे पहात...
प्रेम : कशाबद्दल....?😊
अंजली : तु आलास त्याबद्दल....!😊
प्रेम : मग तर तुला थॅन्क्स म्हणावं लागेल, कारण तुझ्यामुळे आज मी माझ्या पहिल्या इंटरनॅशनल टूर वर जातोय. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता या गोष्टीचा.😊
अंजली : खरं तर याचं क्रेडिट मेघालाच दिलं पाहिजे, कारण मला खरच नव्हतं वाटलं की हा प्लॅन सक्सेस होईल म्हणुन. पण तिने करून दाखवला.
मेघा : मग...! मी काय बोललेली तुला, आपण एकदा ठरवलं की ठरवलं...! और मेरी जान, तेरे लिए इतना भी नहीं कर सकती मै....😋 
* अंजली थोडी भाऊक होते, आणि ऊठुन मेघाला जाऊन मिठी मारते. तिच्या गालावर किस करते आणि तिला बोलते.
अंजली : थॅन्क्स डियर...😋
* मेघा पण तिला जवळ घेत बोलते...
मेघा : अरे मेरा बच्चा....!🥰
सॅड्रिक : किती इमोशनल होतात ह्या....!😊
* थोड्या वेळातच फ्लाईट अनाऊंस होते. सर्वजण लाईन मधे उभे राहतात. हळू हळू पुढे सरकत ते फ्लाईट मधे पोचतात. सीट नंबर पहात ते पुढे पुढे जात असतात. मधल्या पॅसेज मध्ये दोन मागे, दोन पुढे असे चार सीट असतात. त्यामधील दोन विंडो सीट असल्यामुळे मेघा आधीच एका विंडो सीट वर बसते. आणि मागच्या विंडो सीट वर अंजली प्रेमला बसायला सांगते. आणि ती त्याच्या बाजुला बसते. सर्वांच्या बॅग रॅक मधे ठेऊन सिद मेघाच्या बाजुला बसतो. थोड्याच वेळात सर्व फ्लाईट फुल होते. फ्लाईट चा दरवाजा बंद होतो. समोर एक एअर होस्टेस सीट बेल्ट आणि इतर माहिती देत असते. त्याप्रमाणे सर्वजण आपापले सीट बेल्ट लाऊन घेतात. फ्लाईट हळू हळू रन वेच्या दिशेने जायला निघते. अंजली प्रेमचा हात हातात घेऊन बसलेली असते. तिला त्याच्यासोबतचा गोव्याचा प्रवास आठवत होता. ती त्याच्याकडेच पहात असते, त्याचं लक्ष मात्र बाहेर असतं. पायलटची अनाउन्समेंट होते, फ्लाईट टेक ऑफ साठी रन वे वरून आपला स्पीड वाढवत पुढे जात असते. जसे ते टेकऑफ होते तसे तो अंजली चा हात घट्ट पकडतो. थोडा वेळ त्याला पोटात गोळा आल्यासारखे वाटते. तो मात्र अजुनही बाहेरच पहात असतो. पुन्हा एकदा तोच अनुभव विमानातून मुंबई पाहण्याचा....😊 खुप वेळ तो त्या सुंदर क्षणाचा आनंद घेतो. फ्लाईट जेव्हा खुप उंचीवर जाऊन स्टेबल होते. मग तो विंडो मधुन दिसणारा ढगांमध्ये स्वर्ग सुखाचा अनुभव. तो पाहण्यात प्रेम हरवून जातो. 
अंजली मात्र त्याच्याकडे पाहत त्याच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव मनात साठवून ठेवत होती. त्याने पकडलेला हात अजुन तसाच तिने घट्ट पकडुन ठेवला होता. तेवढ्यात फ्लाईट मधे सीट बेल्ट काढण्याबाबत अनाउन्समेंट ऐकू येते. तसा प्रेम अंजलीचा पकडलेला हात तिच्या हातातुन काढत तिच्याकडे पाहत बोलतो.
प्रेम : काय... झालं...? अशी का बघतेय माझ्याकडे...?😊
अंजली : काही नाही...! असच...!😊
* ते दोघे आपापला सीट बेल्ट काढतात. पुढच्या सीट वरून मेघा त्यांना आवाज देते.
मेघा : हाय... ! आम्ही पण आहोत तुमच्यासोबत...! विसरले का...?😊
अंजली : हो... हो...! माहितीय तुम्ही आहात ते...!😊
मेघा : नशीब...! बाय द वे,...! कसं वाटलं प्रेम...?😊
प्रेम : खूपच छान...! मजा येतेय....!😊
मेघा : गुड...! अजुन खुप मज्जा करणार आहोत आपण तिकडे पोचल्यावर. 😊
* तिची बडबड चालु होते, तेवढ्यात एक एअर होस्टेस ट्रॉली मधुन सँडविच, स्नॅक्स तसेच पाणी बॉटल, कोल्ड्रिंक व काही चॉकलेट सर्वांना देते.
सर्वजण त्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेत, गप्पा मारत, मजा मस्ती करत असतात. पुढील अडीच तीन तास कसे जातात ते कळत सुद्धा नाही. फ्लाईट लैंड होते आणि अखेरीस ते दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट वर पोचतात. तिथल्या सर्व प्रोसेस पूर्ण करून, आपापल्या बॅग घेऊन ते सर्वजण एअरपोर्ट च्या बाहेर पडतात.
मेघाचे जिजू त्यांना न्यायला आलेले असतात. ते त्यांना बाहेर भेटतात. मेघा त्यांची ओळख प्रेम सोबत करून देते. बाकी अंजली आणि सिद ला ते आधीपासून ओळखत असतात. 
त्यांच्या कार मधुन पुढील दोन तासांचा प्रवास हा दुबई शहर पहात पहात होतो. प्रेम साठी हा अनुभव खुप वेगळा होता. सोबत अंजली असुन सुद्धा तो भान हरपुन तो बाहेरील नजारा आपल्या डोळ्यात साठवत असतो. उंच उंच इमारती, त्याचं लक्ष वेधून घेत होत्या. कधी कल्पना पण न केलेल्या अशा एका ठिकाणी तो आलेला होता. आणि ते सर्व पाहून यावर त्याचा विश्वास बसत नव्हता की, आपण खरच इथे आलोय...
अखेरीस ते सर्व मेघाच्या बहिणीच्या सोसायटी मधे पोचतात. एका सुसज्ज अशा सोसायटी मधे ते लोक एकविसाव्या मजल्यावर राहत होते. 
कार मधुन सर्वांच्या बॅग, सामान काढून ते लोक लिफ्ट ने वरती जातात. मेघाची बहीण आणि तिची मुलगी लिफ्ट च्या बाहेरच त्यांची वाट बघत उभी असते.
लिफ्ट एकविसाव्या मजल्यावर थांबते. दरवाजा ओपन होतो. तशी मेघा बाहेर जाऊन तिला मिठी मारते. आणि तिच्या मुलीला उचलुन घेते. तिचे लाड करते. सर्वजण बॅग घेऊन लिफ्ट मधुन बाहेर पडतात.
तिथेच मेघा तिच्या बहिणीची ओळख प्रेम सोबत करून देते...
मेघा : दी...! हा बघ प्रेम....! म्हणजे... आपल्या अंजुच प्रेम...😋
दिदी : खुप सुंदर आहे ग...! अंजु...! कुठे सापडला हा ब्ल्यू डायमंड....? छान जोडी जमली....!😊
* ते ऐकुन अंजली थोडीशी लाजते. 
मेघा : नवरात्रीत...! दांडिया खेळताना...!😋
दिदी : मस्त...! बरं... चला आता, दमला असाल प्रवास करून.
* असं बोलुन समोरच असलेल्या आलिशान फ्लॅट मधे ते जातात. आत जाताच समोर खुप मोठा हॉल होता. पुढच्या बाजूला मोठी गॅलरी. तिथून दिसणारा दुबईचा नजारा खूपच विलक्षण अनुभव देणारा असा होता.
त्यांच्या गेस्ट रूम मधे सर्व बॅग ठेऊन. सर्वजण फ्रेश होतात. संध्याकाळ झालेली असते. हॉल मधे सर्व गप्पा मारत बसलेले असतात. दिदी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट आणि चहा बनवून आणते. 
आजचा दिवस ते घरीच एन्जॉय करतात. रात्री खुप छान जेवण वगैरे करून बाल्कनीत गप्पा मारत बसलेले असतात. त्यामध्ये जास्त करून प्रेम आणि अंजलीचाच विषय निघत असतो. खुप वेळ गप्पा मारून ते रात्री उशिरा झोपतात. सिद आणि प्रेम त्यांच्या गेस्ट रूम मधे झोपतात. अंजली आणि मेघा दोघी दुसऱ्या एका बेडरूम मधे झोपतात.
रात्री झोपताना प्रेम सिद ला बोलतो....
प्रेम : मला जरा एक चिमटा काढ रे, कारण मला अजुनही विश्वास बसत नाही की, मी दुबई मधे आहे ते...😊
* सिद त्याला जोराचा चिमटा काढतो.... तसा प्रेम ओरडतो...
प्रेम : अरे बस्....! एवढ्या जोरात कोण चिमटा काढतो. 😊
सिद : नाही...! पण तुला पूर्ण खात्री व्हायला हवी ना म्हणून....😋
* बोलत बोलत सिद झोपी जातो. प्रेम मात्र अजुन जागाच असतो. बाजुच्या बेडरूम मधे मेघाची बडबड संपून ती पण झोपी गेलेली असते. अंजली अजुन जागीच असते. घरी आल्यापासून त्यांच्यात तसं काही बोलणं झालं नव्हतं.... म्हणुन तिला वाटतं की एकदा त्याला भेटुन यावं...
ती बेडवरून उठते, टेबल वरील पाण्याची बॉटल ओपन करून थोडं पाणी पिते. आणि तशीच बॉटल घेऊन ती हळुच दरवाजा उघडुन बाहेर येते. बाजुलाच गेस्ट रूम असतो. हळू आवाजात ती डोअर नॉक् करते. रूम मधील शांत वातावरणामुळे प्रेमला तो आवाज ऐकु येतो. त्याला खात्री होती की, ही अंजूच असणार. तो बेडवरून ऊठुन हळुच दरवाजा उघडुन पाहतो तर समोर अंजली उभी होती. त्याला पाहताच ती त्याला मिठी मारते. तिला मिठीत घेत तो हलक्या आवाजात बोलतो...
प्रेम : काय झालं...? झोप येत नव्हती का...? 😊
अंजली : मग...! तु का अजुन जागा आहेस...?😊
प्रेम : मी आता झोपतच होतो, तेवढ्यात तु आली...😊
अंजली : थॅन्क्स प्रेम...! मला विश्वासच बसत नाही अजुन....😊
प्रेम : सेम... ! माझंही तेच झालंय...😋
अंजली : आय लव यू.... जानु. 🥰
प्रेम : लव यू टू... ! मेरी जान...!🥰
* अशातच अंजली तिची मिठी घट्ट करण्याच्या नादात तिच्या हातातील पाण्याची बॉटल खाली पडते. तसे ते दोघे पटकन मिठीतुन वेगळे होतात. पण त्या आवाजाने सिद पटकन झोपेतून उठून बसतो. दरवाज्यात त्या दोघांना एकत्र पाहून बोलतो.
सिद : अरे...! झोपा यार आता....! अजुन आठवडा भर आपण इथेच आहोत.😊
* त्याचं बोलणं ऐकुन अंजली पाण्याची बॉटल उचलुन प्रेम कडे देत बोलते.
अंजली : अरे...! ते मी... पाणी द्यायला आले होते. 
सिद : कळलं ते मला...! दिलं ना पाणी, ये बाबा पाणी पी आणि झोप, आणि तु पण झोप जा आता....😊
* अंजली थोडी लाजुन तिथून त्यांच्या बेडरूम मधे येऊन झोपते. प्रेम पण थोडं पाणी पितो आणि झोपी जातो.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️