Anubandh Bandhanache - 2 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 2

The Author
Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 2

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २ )

आज गुरुवार होता. घटस्थापना होती त्या दिवशी, नवरात्रीचा पाहिला दिवस, दरवर्षी प्रमाणे दांडिया मधे बेंजो वाजवण्याची ऑर्डर होती. प्रेम पहिल्यांदा नगरातील मित्रांसोबत तिथे वाजवायला गेला होता. तो कीबोर्ड काढून स्टँड वर लावत होता, तेवढ्यात एक छोटीसी मुलगी त्याच्या जवळ आली आणि त्याला बोलली... 
हाय... माय नेम इज अंजली...
व्हॉट इज युवर गुड नेम...?
तो तिच्या सुंदर डोळ्यांमध्ये पहातच राहिला. एकदम गुटगुटीत अशी ती किती गोड दिसत होती, अगदी एखाद्या परीसारखी... लाईट पिंक कलर चा वन पिस घातलेला. त्यावर व्हाईट कलर चे फ्लॉवर होते. गळ्यामध्ये ड्रेसला सुट होणारा नेकलेस, कानामध्ये त्याला मॅच होणारे इअर रिंग, एका हातात पिंक कलर चा बेल्ट असलेले घड्याळ, दुसऱ्या हातात छान असं ब्रेसलेट, पायामध्ये पिंक कलर चे फॅन्सी शूज, आणि हातामधे दांडियाच्या काठ्या... मस्त असे सिल्की केस,...मधेच हवेने ते डोळ्यावर यायचे आणि अलवार हाताने ते बाजूला करून ती बोलत होती. साधारण दहा अकरा वर्षांची असेल. पण तिची तब्येत तशी हेल्दी असल्यामुळे ती थोडी मोठी वाटत होती.
 एवढ्या लहान वयात हातावर क्रॉस चा टॅटू काढलेला, त्यावरून त्याला अंदाज आला की ती ख्रिचन असावी. खरं तर प्रेमला लहान मुलं खुप आवडायची. आणि ती एखाद्या बोलक्या बाहुली सारखी गोरीपान दिसत होती. ती गोड स्माइल देत प्रेमकडे पहात होती. म्हणून तो सुध्दा तिला पहातच राहिला होता.
पुन्हा एकदा तिने त्याला हाय...केलं. तसं प्रेम भानावर आला. त्याने पण तिला हाय केलं.
तसा तिने हात पुढे केला, त्याने पण तिच्यासोबत हात मिळवला. त्यावर ती बोलली.
अंजली : तुमचं नाव काय..?
प्रेम : माझे नाव प्रेम...
अंजली : अरे व्वा किती छान नाव आहे. मला आवडलं. 
प्रेम विचारच करत बसला. एवढीशी आहे पण किती छान बोलतेय. तेवढ्यात ती पुन्हा बोलली.
अंजली : मला कीबोर्ड वाजवायचा आहे. मी वाजवू का...?
त्याला थोडं हसायला आले. 
प्रेम : तुला वाजवायला येतो कीबोर्ड...?
अंजली : हो.... पण थोडं थोडं. अजुन मी शिकतेय. माझ्या घरी पण आहे छोटासा कीबोर्ड.
प्रेम : अच्छा...पण थांब थोडा वेळ अजुन वायर नाही लावली.
अंजली : ओके...मी थांबते.
असं बोलली आणि ती तिथेच थांबली.
प्रेम ने कीबोर्ड चालू करून दिला तशी ती लगेच पुढे येऊन बोलली.
अंजली : आता वाजवू...?
त्याने हो बोलल्यावर लगेच तिने एक साँग वाजवायला सुरुवात केली. सॉंग होते, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार... ☺️
किती छान वाजवत होती. आणि ते वाजवताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. थोड्या वेळाने ती थांबली, आणि प्रेमला थँक्स बोलली, आणि तिथून निघून गेली. तो तर तिला पुन्हा पहातच राहिला. खरं तर प्रेमला स्वतःला सुध्दा कीबोर्ड वाजवता येत नव्हता. त्याचा मित्र कीबोर्ड वाजवायचा. थोड्या वेळाने दांडिया चालु झाला. प्रेम आणि त्याचे मित्र दांडियाची गाणी वाजवत होते. आणि त्याचे लक्ष पुन्हा तिच्याकडे गेले. काय छान नाचत होती. मधेच ती नाचता नाचता प्रत्येक राऊंड ला समोर यायची, आणि त्याच्याकडे पाहून गोड हसायची. नॉन स्टॉप तीन ते साडेतीन तास नाचत होती. शेवटी गरबा संपला. 
प्रेम आणि त्याच्या मित्रांनी आवराआवर करायला सुरुवात केली होती. पण प्रेमची नजर तिलाच शोधत होती. पण ती कुठेच दिसत नव्हती. त्याला वाटलं घरी गेली असेल. प्रेम पाणी पित होता. तेवढ्यात मागुन कोणीतरी आवाज दिला..." हाय प्रेम..."
त्याने मागे वळुन पाहिले तर समोर तीच उभी होती. नाचून घामाने भिजलेली, त्याच्याकडे पहात हात पुढे केला आणि बोलली...फ्रेंड्स..?
त्याने पण हात मिळवला आणि बोलला..   
प्रेम : व्हाय नॉट.. शुअर....फ्रेंड्स..
अंजली : तु चालला का आता घरी...? उद्या येशील ना...? 
प्रेम : हो आता तर रोजच येणार ना मी...
तशी तिने एक छानशी स्माइल देत गुड नाईट...बाय... बोलुन घरी निघुन गेली.
दुसऱ्या दिवशी सुध्दा ती प्रेमची वाट पहात होती. म्हणजे साहजिकच तिला आज पण कीबोर्ड वाजवायचा होता.
प्रेम आणि त्याचे मित्र तिथे आले, आणि प्रेमचा मित्र जो कीबोर्ड वाजवायचा तो कीबोर्ड काढून स्टँड ला लावू लागला. प्रेम दुसरे समान रिक्षातून काढत होता. तेवढ्यात त्याला समोर अंजली दिसली. आज तिने ब्ल्यू कलर चा वेलवेट ड्रेस घातला होता. नेहमीसरखीच आज पण ती खुप सुंदर दिसत होती. अंजली कीबोर्ड कडे पहात होती. प्रेमला वाटलं आज ती त्याच्या मित्राला जाऊन विचारेल. पण ती फक्त तिकडे पहात राहिली होती. आणि प्रेम समोर दिसल्यावर लगेच हसतच त्याच्याजवळ आली आणि बोलली...हाय प्रेम... त्याने पण तिला हाय...केले. त्याच्याकडे पहात तिची नजर कीबोर्ड कडे वळली. प्रेम समजुन गेला. तिला काय हवंय. त्याने अंजलीचा हात पकडला आणि तिला घेऊन तिकडे गेला. त्याच्या मित्राला सांगुन तिला कीबोर्ड वाजवायला दिला. तशी ती खुश झाली. आणि साँग वाजवायला सुरुवात केली.
आज तिने सरगम वाजवली, सर्वजण तिच्याकडे कौतुकाने पहात होते. प्रेम सुद्धा तिच्याकडेच पहातच राहिला होता. तिचे ते निरागस हास्य, त्या गोंडस चेहऱ्यावरचे भाव, खुप छान वाटत होते. 
त्या दिवशी गरबा संपल्यानंतर ती पुन्हा घरी जाताना प्रेमला गोड हसत बाय करून निघुन गेली. 
आज नवरात्रीचा तिसरा दिवस होता. प्रेम चे कॉलेजचे पहिलेच वर्ष होते. तो अकरावी मधे शिकत होता. सकाळी कॉलेज आणि दुपारी एका ऑफिसमधे पार्ट टाइम काम करत होता. 
आज प्रेमच्या ऑफिस मधे खुप काम असल्यामुळे त्याला घरी यायला थोडा उशीरच झाला होता. तो खुप थकला होता. आणि त्यात दिवसभर उपवास, त्याने काही खाल्ले पण नव्हते. त्यामुळे फ्रेश होऊन तो जेवला आणि लगेच झोपुन गेला. त्या दिवशी त्याला मित्रांसोबत बेंजो वाजवायला जाता आले नाही. 
दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुट्टी असल्यामुळे प्रेम आज थोडा उशिराच उठला होता. दुपारी जेवण झाल्यावर तो पुन्हा थोडा वेळ झोप काढून संध्याकाळी मैदानात क्रिकेट खेळून आला. 
आज रात्री लवकर जेऊन ते लोक सर्व सामान घेऊन ९ वाजताच तिकडे पोहोचले. तिथे गेल्यावर प्रेमची नजर तिलाच शोधु लागली होती. पण ती कुठेच दिसत नव्हती. त्यांनी तयारी केली आणि वाजवायला सुरुवात केली. गरबा चालु झाला होता. 
प्रेम चे लक्ष वाजवण्याकडे नव्हते. कारण त्याला अंजली अजुनही कुठे दिसत नव्हती. त्याला वाटलं आज ती नाही येणार. म्हणून त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि वाजवायला लागला. मधेच त्याचे समोर लक्ष गेले तर अंजली गरबा खेळताना त्याला दिसली. प्रेम खुप वेळ तिच्याकडे पहात होता, पण तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. तसं त्याच्या मनात विचार आला काय झालं असेल...? आज हि बघत पण नाही माझ्याकडे...?
खेळता खेळता पुन्हा जेव्हा अंजली त्याच्या समोर आली तेव्हा त्याने डोळ्यांनीच इशारा करून तिला विचारलं...काय झालं म्हणुन...पण तिने एकदाच डोळे मोठे करून रागात त्याच्याकडे पाहिलं आणि नजर फिरवली.
त्यानंतर गरबा संपेपर्यंत तिने त्याचाकडे एकदाही पाहिलं नाही. प्रेम मनात विचार करत होता. एवढीशी आहे... पण किती हा नाकावर राग. आणि त्यात पण किती क्युट दिसते ही. ☺️ 
त्या दिवशी गरबा संपला तरी जाताना पण त्याच्याकडे रागाने बघुन घरी निघुन गेली. आज ती काहीच बोलली नव्हती त्याच्याशी त्यामुळे प्रेमला जरा वेगळं वाटत होतं.
 तो रात्री घरी आला. फ्रेश होऊन झोपला. पण त्याला आज झोप येत नव्हती. अंजली चा विचार डोक्यात सारखा येत होता. काय झालं असेल...? का बोलली नाही माझ्याशी आज ती...? पण त्याचे एक मन हा पण विचार करायला लागले होते. प्रेम... काय चाललंय तुझं...?
का एवढा तिचा विचार करतोय. दहा अकरा वर्षाची लहान मुलगी आहे ती. आणि तुझे वय काय आहे ते बघ... त्या विचाराने त्याला स्वतःचाच राग आला. मग एक मैत्री म्हणुनच त्याकडे पहायचं असे मनाशी ठरवले. आणि तो वाईट विचारच डोक्यातुन काढून टाकला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोचले तिथे तेव्हा त्याने सहज नजर फिरवली इकडे तिकडे... अंजली कुठेच दिसत नव्हती. सर्व मित्र वाजवायची तयारी करू लागले. 
थोड्या वेळात गरबा चालु झाला होता. पुन्हा प्रेमची नजर तिला शोधायला लागली होती. आणि ती नाचताना त्याला दिसली. आज पण तिने त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही. प्रेमला खुप वाईट वाटलं. 
गरबा संपला तसे सर्वजण आवराआवर करू लागले होते. तेवढ्यात मागुन तिचा आवाज प्रेमच्या कानावर पडला. अंजली जवळच उभी होती आणि तिच्या मैत्रिणीला काहीतरी बोलत होती.  
अंजली : फ्रेंड्स असे असतात का ग...? काहीच सांगत नाहीत. जर येणार नसेल तर आधीच सांगायचं ना... मग कोण वाट पहात बसणार नाही ना..." 
प्रेमला ऐकवण्यासाठीच ती बोलतेय हे त्याच्या लक्षात आले होते.
तो तसाच तिच्यासमोर गेला, कान पकडले आणि बोलला...
प्रेम : सॉरी मॅडम पुन्हा अशी चुक होणार नाही. यावेळी माफ कराल का...?
त्यावर दुसरीकडे चेहरा करत ती बोलली, 
 अंजली : काही गरज नाही सॉरी बोलायची. फ्रेंड मानलं असतं तर सांगितले असते. की मी उद्या येणार नाही म्हणुन.
प्रेमला थोडं हसायला आले होते. ते आवरून तो पुन्हा बोलला.
प्रेम : पुन्हा एकदा माफी मागतो बस... अजुन काही फाईन असेल तर सांग. मी तयार आहे, तु बोलशील ते करायला पण अशी रागावू नको.
अंजली : इट्स ओके... ठिक आहे, फर्स्ट टाईम आहे... म्हणुन माफ करतेय. पुन्हा असे नाही ना करणार...प्रॉमिस "
असे बोलुन तिने हात पुढे केला. 
प्रेम : नेवर.... कधीच नाही करणार... 😊
असे बोलुन तिला हात मिळवला. तशी ती छान अशी हसली. मग थोडा वेळ तिच्याशी बोलला. घरी जाताना प्रेमला छान स्माइल दिली आणि बाय गुड नाईट बोलुन निघुन गेली.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️