Anubandh Bandhanache - 40 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 40

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 40

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४० )

दुबईच्या सफल ट्रिप नंतर पुढचे काही दिवस असेच निघुन जातात. सिद ने सर्व फोटो रोल प्रिंट करून आणलेले असतात. ते पाहण्यासाठी सर्वजण एकदा बाहेर हॉटेल मधे भेटतात. थोडे थोडे करत खुप सारे फोटो त्यांनी काढलेले असतात. त्यातील असे काही फोटो ते वेगळे करतात ज्यामध्ये प्रेम आहे, आणि त्या सोबत त्या दोघांचे जवळ जवळ पंचवीस एक फोटो एकत्र काढलेले होते. ते फोटो एकत्र करून अंजली पुन्हा पुन्हा पहात होती, आणि त्या आठवणी मनात साठवून ठेवत होती. तिच्या हातातुन ते सर्व फोटो प्रेम घेतो आणि स्वतःजवळ ठेवतो. कारण तो अल्बम सर्वांच्या घरी पाहिला जाणार होता. बाकीचे सर्व फोटो अल्बम मधे सेट करून ते पुन्हा एकदा खात्री करून घेतात की, त्यामध्ये प्रेम कुठे दिसत तर नाही याची.... 
त्या दोघांचे फोटो प्रेम घरी घेऊन येतो. ते फोटो एका छोट्या अल्बम मधे लाऊन तो अल्बम कपाटात कपड्यांच्या खाली लपवून ठेवतो. 
पुढच्या काही दिवसात प्रेम आठवडाभरासाठी गावी जाऊन येतो.
काही दिवसांनी अंजलीचा बारावीचा रिझल्ट जाहीर झाला होता. अंजली खुप चांगल्या मार्कांनी पास झाली होती. त्याबद्दल सर्वांनी तिचे मनभरून कौतुक केले. तिच्या घरी तर सेलिब्रेशन पार्टी झाली. पण प्रेम जाऊ शकला नाही. 
एक दिवस तिने मग प्रेमला बाहेर हॉटेल मधे खास वेगळी पार्टी दिली. त्याने पण तिचे अभिनंदन केले. 
पुढील शिक्षणासाठी तिचे मुंबई मधील एका नामांकित कॉलेज ॲडमिशन झाले. तिच्या डॅड ची इच्छा होती की ती त्यांच्याप्रमाणेच एक आर्किटेक व्हावी. त्या परीने ते तिच्यासाठी सर्व काही प्रयत्न करत होते. 
एका भेटीत प्रेम पण तिला हेच समजावत होता. "आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करून दाखव."
आता तिचं कॉलेज चालु झालं होतं. एक्स्ट्रा क्लासेस पण चालु होते. ती पण मन लाऊन शिकत होती. अधुन मधून ते दोघे भेटत होते. प्रेमचा वाढदिवस, मग तिचा वाढदिवस, तसेच मेघा आणि सिद यांचा पण वाढदिवस या निमित्ताने ते लोक एकत्र येवून एंजॉय करत होते.
मेघा कॉलेज करत पोलिस अकॅडमी मधे ट्रेनिंग घेत होती. सिद सॉफ्टवेअर इंजिनियरिंग करत होता.
काही दिवसांनी अंजलीचे डॅड आणि मेघाचे वडील दोघेही काही दिवसांची सुट्टी घेऊन दुबईला मेघाच्या दीदीकडे जातात. 
दिदी आणि जिजुंना प्रेम बद्दल मेघाने कल्पना दिली होती की, प्रेमचा उल्लेख त्या दोघांसमोर कुठे करू नका म्हणून....
तिथे एक दिवस दीदींच्या घरी चहा पित असताना अंजलीच्या डॅडची नजर एका फोटो अल्बम वर जाते. तो अल्बम त्यांच्या शॉपच्या ओपनिंग सेरेमनीचा होता. 
तो अल्बम हाती घेऊन ते त्यातील फोटो पाहू लागतात. एक एक फोटो पहात ते पुढे जात असतात तेवढ्यात एका ग्रुप फोटो मधे त्यांना अंजलीच्या बाजूला प्रेम उभा असलेला दिसतो. 
त्यांना थोडा वेळ विश्वास बसत नाही की, तो तोच मुलगा असेल. पुन्हा एकदा ते सर्व अल्बम मधील फोटो पाहून घेतात. पण दुसरीकडे कुठे त्यांना तो दिसत नाही. 
शेवटी खात्री करण्यासाठी तो फोटो अल्बम मधुन बाहेर काढून पुन्हा त्याच्याकडे पाहतात.
त्यांच्या मनात थोडी शंका येते, पण हाही विचार करतात तो मुलगा इथे कसा काय येऊ शकतो.
पण अंजलीच्या बाजुला तो असल्यामुळे त्यांचा संशय वाढत जातो. खरच जर तो मुलगा यांच्यासोबत इकडे आला असेल तर....!
म्हणजे अंजली आणि सर्वजण त्यांच्याशी खोटं बोलले आहेत. हि गोष्ट त्यांच्यापासून लपवली गेली होती. या सर्व गोष्टींचा विचार करताना त्यांना अंजलीचा आणि सोबत सिद आणि मेघाचा पण खुप राग येत असतो.
खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी ते तो फोटो स्वतःजवळ ठेवतात. तिथे याबद्दल ते कोणाशी काही बोलत नाहीत.
दोन दिवसांनी ते दोघेही परत इंडियात येतात. घरी आल्यावर एक दिवस ते अंजलीला बोलवतात आणि तिला विचारतात.
डॅड : बेटा... मला एक गोष्ट खरं खरं सांगशील...?
* त्यांच्या या प्रश्नाने अंजली थोडीशी घाबरून गेली होती. डॅडचा तो रागीट चेहरा पाहून ती थरथरत्या आवाजातच बोलली....
अंजली : काय झालं डॅड....?
डॅड : मला अगदी खरं सांग की, दुबईला तुमच्यासोबत अजुन कोण आलं होतं...?
* त्यांचा तो प्रश्न ऐकुन अंजलीला खात्री पटली की,नक्कीच त्यांना तिकडे कुठून तरी कळलं होतं की, प्रेम त्यांच्यासोबत होता. आता तर तिला घामच फुटला होता. काय बोलावं ते सुचत नव्हतं.... त्यांना घाबरून ती फक्त मान खाली घालून उभी होती. तिच्याकडे पाहून डॅड पुन्हा एकदा ओरडून तिला बोलले...
डॅड : काय विचारतोय मी....? कोण होतं अजुन तुमच्यासोबत....
* त्यांच्या त्या रूद्र आवाजाने ती अजुनच घाबरून जाते आणि रडायला लागते. त्यांच्या आवाजाने मॉम पण किचन मधुन धावत हॉल मधे येतात...
मॉम : काय झालं...? का ओरडत आहात तिला...?
डॅड : तिलाच विचार... आपल्या नकळत यांच काय चाललं आहे ते....?
* अंजु पटकन जाऊन मॉम ला मिठी मारते. मॉम तिला जवळ घेत बोलतात.
मॉम : काय झालं आहे.... सांगाल का मला...?
डॅड : आपल्यापासून लपवून खुप काही गोष्टी घडल्या आहेत. आणि तेच मला जाणून घ्यायचं आहे.
मॉम : म्हणजे नक्की काय झालंय...?
डॅड : या प्रश्नाचं उत्तर मला तिच्याकडून हवं आहे. तू सोड तिला.
* असं बोलुन ते ऊठुन अंजलीला हाताला धरून मॉम पासुन बाजूला करतात... आणि पुन्हा तिला तोच प्रश्न करतात....
डॅड : तुला सांगायचं आहे की नाही, का त्या दोघांना पण बोलावून घेऊ...?
* ते ऐकुन अंजली घाबरतच बोलते.
अंजली : कोणी नव्हतं आमच्यासोबत... आम्ही तिघेच होतो. 😥
डॅड : पुन्हा एकदा विचारतोय मी, खरं खरं सांग...?
अंजली : खरच बोलतेय मी....!😥
* तिच्या अशा खोट्या बोलण्याने डॅड अजुनच संतप्त होतात आणि अंजलीच्या जोरात कानाखाली वाजवतात. तिचा तोल जातो आणि ती खाली पडते.
मॉम लगेच तिच्याजवळ जाऊन तिला उठवून जवळ घेतात. ती गालावर हात ठेऊन खुप रडायला लागते.
मॉम : काय करताय तुम्ही...! जीव जाईल पोरीचा, एवढ्या जोरात मारतं का कोणी...?😠
डॅड : तुमच्या या लाडामुळेच डोक्यावर बसली आहे ती... जरा तिच्यावर लक्ष ठेवलं असतं तर हि वेळ आलीच नसती. तुम्ही सुद्धा जिम्मेदार आहात यासाठी.
मॉम : तुम्ही जरा शांत व्हा... आणि मग बोला...!
* डॅड खूपच चिडले होते.... ते त्या रागातच त्यांच्या रूम मधे जाऊन तो फोटो घेऊन येतात आणि मॉम च्या हातात देतात, मॉम तो फोटो पाहून अजूनच घाबरतात. तिचे डॅड रागाने अजूनच बडबड करत असतात.
डॅड : आम्हाला वाटलं होतं, हे प्रकरण तेव्हाच संपलं असेल. पण आमचा मूर्खपणा झाला, आणि आम्ही तेव्हा दुर्लक्ष केलं. तेव्हा त्या बालिश होत्या, त्या बालिशपणात झालेली चुक, म्हणुन थोडं दुर्लक्ष केलं. त्याचेच परिणाम आज बघायला लागत आहे. पण आता नाही. हे प्रकरण कायमचं संपवायला हवं. कोण तो मुलगा...? त्याची लायकी पण नाही आपल्या पायाजवळ उभे राहायची. अशा भिकारी लोकांना जवळ केलं यांनी..... आज त्याला त्याची लायकी दाखवतो. 😠
* असं बोलून डॅड मॉमच्या हातातील तो फोटो खेचून घेत रागा रागानेच बाहेर निघून जातात. ते पाहून अंजली खूप रडायला लागते. ती रडतच मॉम ला बोलते. 
अंजली : मॉम डॅडला थांबव ना...! ते प्रेम ला काहीतरी करतील. प्लीज थांबव ना त्यांना मी पाया पडते तुझ्या....!😥
* असं बोलून ती रडतच मॉम समोर हात जोडते. तिची ती अवस्था पाहून मॉमला सुद्धा तिची दया येते. त्या अंजलीला जवळ घेऊन तिला धीर देतात. तिला असं पाहून त्यांच्या पण डोळ्यातून अश्रू वहायला लागतात. पुढे त्यांना काय करावे ते सुचत नाही. 
शेवटी मॉम प्रेमला कॉल लावण्याचा प्रयत्न करतात. खूप वेळ त्याच्या मोबाईलची रिंग होत असते. पण त्याचा कॉल काही रिसिव्ह होत नव्हता. कारण आज रविवार असल्यामुळे मोबाईल घरीच ठेवून तो मैदानात क्रिकेट खेळत होता. अंजलीच्या घरी घडलेल्या या सर्व प्रकाराची त्याला कोणतीही कल्पना नव्हती. 
इकडे मॉम आणि अंजली पुन्हा पुन्हा त्याला आपापल्या मोबाईल वरून कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात. 
प्रेमचा मोबाईल सायलेंट होता. घरी ताईला सुद्धा ते कळलं नव्हतं. या दोघींचे खूप सारे मिस कॉल पडले होते. 
दोघींना पण काय करावे ते काहीच सुचत नव्हतं. त्याचा कॉल लागत नाही हे पाहून अंजली सिद ला कॉल करते. घरात घडलेली सर्व हकीकत त्याला सांगते. पटकन जाऊन प्रेमला याबद्दल सर्व बोलायला सांगते. तो सुद्धा या प्रकारामुळे घाबरून जातो. तो काही कामानिमित्त बाहेर आला होता. हातातील काम सोडून तो पटकन बाईक घेऊन ताबडतोब प्रेमला भेटण्यासाठी निघतो. जाताना खूप वेळ त्याचा कॉल ट्राय करतो. पण त्याचाही कॉल रिसिव्ह होत नव्हता. मग तो मेघाला कॉल करून हा सर्व प्रकार सांगतो. ती घरीच असते, हे सर्व ऐकून ती सुद्धा घाबरून जाते. काय करावं हे तिलाही सुचत नाही. त्या भीतीने ते सुद्धा प्रेमला कॉल लावण्याचा प्रयत्न करते करते. पण तिचाही कॉल रिसिव्ह होत नाही.
सर्वजण घाबरून गेलेले असतात. पुढे काय होणार आहे याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हते. 
अंजलीचे डॅड घरातून निघून पोलीस स्टेशनला जाऊन मेघाच्या वडिलांना भेटतात. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतात. मेघा पण या सर्व प्रकरणांमध्ये सामील होती या गोष्टीचा त्यांना पण खूप राग येतो. 
त्या रागाच्या भरात ते गाडी घेऊन प्रेम जिथे राहत होता तिथे पोहोचतात. मेघाचे वडील वर्दीवर नसतात. तिथे पोचल्यावर खाली उतरून ते एका दुकान वाल्याला प्रेमचा फोटो दाखवतात. 
तो दुकान वाला प्रेमला लगेच ओळखतो. कोणीतरी पाहुणे असतील असं समजून तो त्यांना बोलतो की, समोरच मैदान आहे तिथेच तो भेटेल. 
मेघाचे वडील एकटेच मैदानात जातात. तिथे त्यांना प्रेम दिसतो. त्याला ते लांबूनच इशारा करून जवळ बोलवतात. प्रेम लांबून त्यांना ओळखत नाही. मात्र जसा तो जवळ येतो तसं त्याला कळतं की ते मेघाचे वडील होते. 
तो जवळ आल्यावर मेघाचे वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गाडीपर्यंत घेऊन जातात. गाडीमध्ये पुढच्या सीटवर डॅड ना पाहून प्रेम घाबरून जातो. 
मेघाचे वडील मागचा डोअर ओपन करून त्याला गाडीमध्ये बसायला सांगतात. प्रेम मात्र गाडीत बसायला नकार देतो. मग मेघाचे वडील त्याला जबरदस्ती आत बसवतात. आणि कारचा डोअर बंद करतात. पुढे जाऊन ते गाडी चालू करून त्या एरियातून बाहेर पडतात. 
प्रेम आता खूपच घाबरलेला असतो. त्याला काय करावं ते सुचत नाही. कोणाला कॉल करावा म्हटलं तर मोबाईल सुद्धा त्याच्याजवळ नसतो. अशातच् तो त्यांना बोलतो....
प्रेम : साहेब मी काही नाही केलं, माझं काही चुकलं असलं तर मला माफ करा. मला घरी जाऊ द्या.
* असं बोलून हात जोडून तो त्यांना विनवणी करत होता. या सर्व प्रकारात अंजुच्या वडिलांचा राग अजून वाढला होता. पुढच्या सीट वरूनच मागे वळून ते प्रेमच्या कानाखाली मारतात. 
मेघाचे वडील त्यांना शांत करतात. प्रेम हतबल झालेला असतो. तो पुन्हा पुन्हा त्यांची माफी मागत असतो. त्यांना गाडी थांबवण्याची विनंती करत असतो. पण ते गाडी थांबवत नाहीत.
त्यांची गाडी शहरातून बाहेर निघून एका अज्ञात ठिकाणी पोहोचते. एका बंद पडलेल्या मोठ्या कंपनीच्या गेटमधून गाडी आत आलेली असते. तिथे आसपास कोणीच नसतं. 
गाडी बंद होते आणि ते दोघेही खाली उतरतात. अंजूचे वडील खाली उतरून रागातच गाडीचा मागचा दरवाजा खोलतात आणि प्रेम ला बाहेर खेचतात. त्याची कॉलर पकडून पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली लावत त्याला बोलतात.
डॅड : तुझी लायकी आहे का रे माझ्या मुलीच्या पायाजवळ उभं राहायची.....😠
* असं बोलून ते पुन्हा पुन्हा त्याला मारत असतात. तेवढ्यात मेघाचे वडील तिथे येतात. त्याला त्यांच्या तावडीतून सोडवत बाजूला घेतात आणि बोलतात. 
मेघाचे वडील : काय रे चरबी आली का तुला...? श्रीमंत मुलींना फसवून त्यांना लुटायचं हेच धंदे आहेत ना तुमचे. 
प्रेम : नाही साहेब मी असं काहीच केलेलं नाही. 
मेघाचे वडील : नाव काय रे तुझं....?
प्रेम : प्रेम देशमुख साहेब....!
मेघाचे वडील : घराणे तर चांगले वाटतेय आणि हे धंदे करतोय. गाव कोणतं तुझं....?
प्रेम : कोल्हापूर साहेब....?
मेघाचे वडील : वडील काय करतात तुझे...?
प्रेम : गव्हर्मेंट सर्व्हंट होते, रिटायर झालेत गावीच आहेत आता.
मेघाचे वडील : इथे कोणाजवळ राहतो....?
प्रेम : ताई आणि भाऊजी सोबत....!
मेघाचे वडील : काम धंदा काही करतो का नाही...?
प्रेम : हो साहेब एक कंपनीत कामाला जातो. 
मेघाची वडील : जरा चांगल्या घरातला वाटतोयस, मग हे सर्व धंदे कशाला करत बसलायस. तुझ्या घरी माहिती आहे का हे सर्व. 
प्रेम : नाही साहेब...!
मेघाचे वडील : कधीपासून चालू आहे सर्व... खरं खरं सांग...?
प्रेम : असं काहीच नाही साहेब आम्ही फक्त मित्र आहोत, गेले दोन-तीन वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. तुम्हालापण माहीतच आहे साहेब. 
मेघाचे वडील : खोटं बोलू नको आम्हाला सर्व कळलंय. 
प्रेम : नाही साहेब पण मी खरं बोलतोय आणि मी खरच कोणाला फसवलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. 
मेघाचे वडील : तू दुबईला यांच्यासोबत गेलेलास... कुठून आले एवढे पैसे तुझ्याजवळ...?
प्रेम : मी साठवले होते साहेब. माझीही इच्छा होती म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो.
* त्यांचं बोलणं चालू असताना अंजलीचे डॅड पुन्हा तिथे येतात आणि प्रेम ला मारायला लागतात. 
मेघाचे वडील त्यांना शांत करत त्यांना गाडीमध्ये नेऊन बसवतात. आणि ते पुन्हा येऊन प्रेमशी बोलतात.
मेघाचे वडील : तुला माहित होतं ना की, ती मुलगी आपल्या कास्ट मधील नाही. मग तू कोणत्या उद्देशाने हे सर्व पुढे चालू ठेवलं. तिला फसवायचा प्लॅन होता तुझा... खरं खरं सांग....?
प्रेम : नाही साहेब असं काहीच नाही. मी कधीच तिला फसवलं नाही. आम्ही फक्त मित्र होतो. पण नकळत गेल्या काही दिवसापासून आम्ही रिलेशन मध्ये आलो.
मेघाचे वडील : पण तुला माहीत होतं तिचे वडील कोण आहेत, पुढे जाऊन काय होईल याची तुला कल्पना तरी होती का...?
प्रेम : हो साहेब.... मला माहित होतं पुढे जाऊन काहीच होणार नाही. ही गोष्ट मी तिला पण खूप वेळा बोलून झालो होतो. पण ती ऐकत नव्हती. 
मेघाचे वडील : अरे मुर्खा.... तुला तर अक्कल होती ना. ती अजून लहान आहे. तुझं वय काय तिचं वय काय...? जरा तरी भान ठेवायला हवं होतं. 
प्रेम : सॉरी साहेब चुकी झाली... मी आता तिला कधीच नाही भेटणार. मला माफ करा. 🙏🏻
मेघाचे वडील : तुला माहित नाही तु कोणाशी पंगा घेतलाय. हि पिस्तुल बघितली का, त्याच्या हातातुन काढून घेतलीय मी, मी जर आता इथे नसतो तर त्या माणसाने तुला मारून टाकला असता इथे. अरे जरा अंथरून बघून पाय पसरावे. 
प्रेम : सॉरी साहेब तुम्हीच मला यातून बाहेर काढा. मी खरच पुढे काय असं काहीच वागणार नाही जेणेकरून त्यांना त्रास होईल. 
मेघाचे वडील : खूप मोठा मूर्खपणा केला आहेस तू, मी त्याच्याशी बोलून बघतो, त्याने ऐकलं तर ठीक नाहीतर तुझं काही खरं नाही. 
प्रेम : प्लीज साहेब तुम्हीच काहीतरी करा ना...?
मेघाचे वडील : ठीक आहे मी प्रयत्न करतो तू थांब इथेच. पळून जायचा प्रयत्न करू नको, नाहीतर उगाच मरशील. 
प्रेम : नाही जाणार साहेब....!
* असं बोलून मेघाचे वडील गाडी जवळ जातात आणि अंजूच्या सोबत बोलत असतात. थोड्यावेळाने ते प्रेमला आवाज देतात, आणि गाडी जवळ बोलवतात. 
प्रेम घाबरलेल्या अवस्थेतच गाडी जवळ जातो. अंजुचे डॅड गाडीतून बाहेर येतात. प्रेम कडे रागाने पाहत मेघाच्या वडिलांना बोलतात...
डॅड : तू याच्यावर दया मया दाखवू नकोस, याच्यावर एखादी फ्रॉड ची केस टाक, आणि याला आत मध्ये टाक काही वर्षासाठी.... (प्रेमकडे रागाने पहात) माझ्या पोरीला फसवतो काय.... चांगली अद्दल घडली पाहिजे तुला....😠 
* प्रेम त्यांच्यासमोर हात जोडत बोलतो...
प्रेम : नको साहेब....! मला जेलमध्ये पाठवू नका. प्लिज माझ्यावर दया करा पुन्हा अशी चूक मी कधीच करणार नाही मी तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईन. 
डॅड : अरे तिच्या आयुष्यात येण्याची तुझी लायकी पण नव्हती पण तरी तू ती चूक केलीस, त्याचीच शिक्षा आता भोगायला तयार हो....😠
प्रेम : नको साहेब मी पाया पडतो तुमच्या...🙏🏻 असं करू नका, माझ्यावर माझ्या सर्व कुटुंबाचा भार आहे. गावी लहान भाऊ आई आहे. ते वाऱ्यावर पडतील. प्लीज मला माफ करा. मी पुन्हा तुम्हाला इथे कुठेच दिसणार नाही. 🙏🏻
मेघाचे वडील : अरे मुर्खा एवढं सर्व तुला जर कळत होतं, तर मग हे सर्व करायची काय गरज होती. हे सर्व करायला आई बापाने इकडे पाठवले का तुला...?
प्रेम : नाही साहेब चुकी झाली माझी, पुन्हा पुन्हा बोलतोय खरंच चुकलं माझं... पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. 😔
मेघाचे वडील : तुला एक शेवटची संधी देतोय... असं समज की तुझा पुनर्जन्म झालाय. पण यापुढे तू या एरियात दिसता कामा नये, आणि दिसलास की मी तिथूनच तुला उचलला म्हणून समज. आणि विसरून जायचं सगळं... मागे काय झालं ते. पुन्हा जर इथे कोणाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास, तर माझ्याएवढं वाईट कोण नाही, लक्षात ठेवायचं. कायमचं जेल मधे खडी फोडायला पाठवेन.
प्रेम : हो साहेब...! मी नाही कोणाला कॉन्टॅक्ट करणार. मी कधीच नाही इकडे येणार. कधीच तुम्हाला दिसणार नाही यापुढे. पण आता मला जाऊ द्या...! 🙏🏻
* अंजूचे डॅड पुन्हा एकदा समोर येऊन रागात त्याला बोलतात...
डॅड : ह्याच्यामुळे तू आता वाचला आहेस हे लक्षात ठेव, पण जर का या पुढे मला दिसलास, किंवा या कोणाशी कॉन्टॅक्ट केलेला मला समजलं. तर मग तु समजून जा मी काय करेन ते...... चल निघ आता इथून तोंड घेऊन...😠
* मेघाचे वडील पुन्हा एकदा त्याला त्यांच्यापासून दूर घेऊन जातात आणि त्याला समजावतात.
मेघाचे वडील : हे बघ माणसांच्या हातून चुका घडतात. त्या सुधरायची संधी प्रत्येकाला मिळत नाही. त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नकोस. शेवटचं सांगतोय तुला.... शाना असशील तर हे सर्व विसरून जाशील. आणि जरा आपल्या फॅमिली चा विचार कर... कुठे या सर्व फंद्यात स्वतःला अडकून घेतोय.
जा निघ आता... आणि काही दिवस गावाला निघुन जा. ते मोबाईल नंबर वगैरे बदलून टाक. 
आणि कोणाशीच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नको. नाहीतर तुच अडचणीत येशील. आणि मग तेव्हा मी काही करू शकणार नाही. 
प्रेम : हो साहेब... तुम्ही बोलताय तसच करेन. धन्यवाद साहेब. तुमच्यामुळे मी आज वाचलोय. 
मेघाचे वडील : जा... निघ आता...! आणि लक्षात ठेव सांगितलय ते...! 
प्रेम : हो साहेब....!🙏🏻
* असं बोलुन तो सुटकेचा श्वास घेत त्यांच्या पाया पडतो आणि तिथून धावतच त्या कंपनीच्या गेट मधुन बाहेर पडतो. आज तो मरणाच्या दारातून सुटला होता. त्याच्या हृदयाची धडपड वाढलेली असते. रात्रीचे आठ वाजलेले असतात. सर्वत्र अंधार पडलेला असतो.
त्या गेट बाहेर पडताच त्याला मागुन त्यांच्या गाडीची लाईट दिसते. भीतीने पुन्हा तो रोडवर उभ्या असलेल्या एका गाडीच्या मागे लपतो.
त्यांची गाडी जशी निघुन जाते. तसा तो पुन्हा एकदा सुटकेचा श्वास सोडतो. त्याला आज मरणाच्या दारातून परत आल्यासारखं वाटत होतं...
आता पुढे काय करायचं ते सुचत नव्हतं. कोणाला कॉल करावा म्हटलं तर, मोबाईल पण घरी होता. तो तिथून घरी जायला निघतो. ट्रॅक पॅटच्या पॉकेट मधे हात घालुन बघतो. पॉकेट मधे फक्त दहा रुपयाची एक नोट भेटते. तेवढ्या पैशात तो ऑटोने तर घरी जाऊ शकत नव्हता. मग तो थोडा चालत पुढे मेन रोड वर येतो. 
तिथे एका वडापावच्या गाडीजवळ जातो. तिथून थोडं पाणी घेऊन चेहऱ्यावर मारतो. थोडं फ्रेश होऊन जवळच असलेल्या बस स्टॉप वर येऊन थांबतो.
थोड्या वेळात एक बस येते जी त्याच्या नगराजवळून जाणारी असते. तो ती बस पकडतो. आत चढून मागच्या सीटवर बसतो. हातातील दहा रुपयाची नोट कंडक्टर ला देऊन तिकीट घेतो.
घरी जाताना फक्त हाच विचार करतो. बस् झालं आता... आजच्या आज गावी निघून जायचं.
तो घरी पोचायच्या आधीच सिद त्याच्या घरी येऊन गेलेला असतो. त्याला फक्त तिथल्या मुलांकडून एवढी माहिती मिळते की, क्रिकेट खेळत असताना त्याला कोणीतरी गाडीत बसवून घेऊन गेले होते. त्यानंतर तो घरी आला नव्हता. ही बातमी तो कॉल करून अंजली आणि मेघाला देतो.
ते समजल्यावर अंजली पुर्णपणे समजुन जाते की, तिचे डॅडच् त्याला कुठे तरी घेऊन गेलेत. आता ते त्याचे काय करतील हे तिच्या समजण्यापलीकडचे होते. ती मॉम समोर जोरजोरात रडायला लागते, आणि मॉम ला बोलते.
अंजली : मॉम...! डॅड प्रेमला घेऊन गेलेत, ते त्याला मारून टाकतील. प्लीज तू त्यांना कॉल कर ना....!😭
मॉम : हो बाळा मी करते कॉल त्यांना, तु रडू नको, प्रेमला काही नाही होणार...!
* असं बोलुन त्या डॅड ना कॉल लावतात... मात्र ते कॉल रिसिव्ह करत नव्हते. मॉम पुन्हा पुन्हा त्यांना कॉल करत होत्या.....
अंजली : मॉम...! काय झालं....! प्लीज सांग ना त्यांना प्रेमला काही करू नका...! त्याला काही झालं तर मग मी पण नाही राहणार....😭
मॉम : असं वेड्यासारखं बोलू नको बाळा, त्याला काही नाही होणार, मी आहे ना..., मी काही नाही होऊ देणार त्याला.
अंजली : पण मॉम...! तो अजून घरी नाही आलाय, म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी केलं असणार...😭
* मॉम तिला जवळ घेत बोलतात...
मॉम : ये बाळा नको ना असा वाईट विचार करू, असं काही झालं नसेल. 
अंजली : मग काय करु मॉम....! माझ्या चुकीची शिक्षा त्याला का, त्याची इच्छा नसतानाही मी भाग पाडलंय त्याला हे सर्व करायला. त्याला काही झालं तर.....! नाही....! खरं तर मी जिम्मेदार आहे या सर्वाला....!😭
* असं बोलुन ती त्या स्वतःवरच्या रागातच तडक निघुन त्यांच्या बेडरुम मधे जाते. आणि डोअर लॉक करून घेते. 
मॉम बाहेरून दरवाजावर हात आपटून तिला दरवाजा खोलायला सांगतात, पण ती मात्र दरवाजा खोलत नाही. बाहेर मॉम रडत असतात... ते तिला पुन्हा पुन्हा विनवणी करत असतात.
मॉम : ये बाळा मी हात जोडते तुला, प्लीज दरवाजा खोल. मी बोलेन यांच्याशी... मी प्रेमला काही होऊ देणार नाही.... प्लीज खोल ना दरवाजा...🙏🏻
* अंजली काही दरवाजा खोलत नाही हे पाहून मॉम पुन्हा डॅड ना कॉल लावतात. पण तेही कॉल उचलत नव्हते. मग त्या सिद ला कॉल करून घरी बोलवतात.
तो येईपर्यंत त्या पुन्हा पुन्हा अंजलीला दरवाजा खोलण्यासाठी विनवणी करत असतात. 
अंजली मात्र त्यांचे काही न ऐकता. आतमधे डॅड च्या गोळ्यांचा डबा घेऊन त्यातील झोपेच्या गोळ्यांच्या पॉकेट मधील सर्व गोळ्या काढून हातात घेते. मनातल्या मनात प्रेमला आणि मॉमला सॉरी बोलते आणि त्या सर्व गोळ्या तोंडांत टाकते. टेबलवरील पाण्याची बॉटल घेऊन त्यावर पाणी पिते आणि त्यासोबत पटापट सर्व गोळ्या गिळुन टाकते. 
बाहेर मॉमचा रडण्याचा आवाज ऐकुन ती तोंड पुसत ती दरवाजा खोलते. 
मॉम पटकन आत येऊन तिला मिठी मारतात आणि तिला बोलतात.
मॉम : अशी का वागते बाळा... तुला जर काय झालं असतं तर मी काय करायचं होतं सांग बघू....😥
* अंजली फक्त रडत होती, ती काहीच बोलत नव्हती. तिला तसच मिठीत घेऊन मॉम तिला धीर देत असतात. तेवढ्यात डोअर बेल वाजते. मॉम तिला बेडवर बसवुन. डोअर ओपन करायला जातात. 
सिद आणि मेघा दोघेही आलेले असतात. ते दोघेही पटकन बेडरूम मधे तिच्याजवळ जातात. तिची अवस्था पाहून मेघा तिला मिठी मारते आणि बोलते.
मेघा : अंजू काय हालत करून घेतलीय, हे बघ... सर्व काही ठिक होईल... तू नको काळजी करू, आम्ही आहोत ना सर्व तुझ्यासोबत. 😥
अंजली : काही ठिक होणार नाही, आता संपलं सर्व मेघा....! माझ्या प्रेमला हे लोक घेऊन गेले.... आता मी पण जाईन त्याच्याजवळ कायमची....😭
मेघा : काय बडबडतेय तू....😠 काही नाही झालंय त्याला....!😥
* मेघा तिचे सांत्वन करत होती, मॉम मात्र पुन्हा पुन्हा डॅड ना कॉल करत होत्या. तिचे डॅड आणि मेघाचे वडील तिथून निघाल्यावर त्या टेन्शन मधे एका बार मधे ड्रिंक करायला बसलेले असतात. म्हणुन त्यांनी त्यांचा मोबाईल सायलेंट करून गाडीतच ठेऊन दिलेला असतो. 
या सर्व प्रकारात खुप वेळ निघुन गेलेला असतो. तिच्या घरी आता अंजलीवर हळू हळू गोळ्यांच्या परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. तिला आता गुंगी येत होती. तिचे डोळे बंद होत होते. 
मेघा आणि मॉम ला वाटते, कदाचित जास्त वेळ रडल्यामुळे कदाचित तिला असं होत असावं...
मेघा हळूच तिला बेडवर झोपवते. तिच्या डोक्याखाली उशी ठेवून तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते. दुसऱ्या बाजूला मॉम तिचा हात पकडून बसलेल्या असतात. त्या गुंगीतच ती मॉम च्या हातातील हात सोडवत मॉम ला हात जोडत बोलते....
अंजली : सॉरी... मॉम...! मी खुप त्रास दिलाय तुला, पण आता नाही देणार.... मला माफ करशील मला...!🙏🏻😥
* तिचं असं बोलणं ऐकून मॉम अजूनच रडायला लागल्या होत्या.... ती मात्र अर्धवट डोळ्यांची उघडझाप करत करत सर्वांकडे पहात होती. 
अखेरीस थोड्याच वेळात तिचे डोळे पुर्ण बंद होतात. आणि तिच्या शरीराची हालचाल बंद होते. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️