Anubandh Bandhanache - 48 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 48

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 48

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४८ )
काही दिवसांनी ते दोघे त्याच ठिकाणी भेटतात. ते दोघेही खुप वेळ गप्पा मारत बसले होते. पण कोणीही त्या विषयावर बोलत नव्हते. वैष्णवीला वाटत होते त्याने काहीतरी बोलावे, आणि प्रेमला वाटत होते तिने हा विषय काढावा. 
खुप वेळ ते दोघे इतर विषय काढून बोलत होते. अखेरीस प्रेमला राहवत नाही. तो तिला बोलतो...
प्रेम : वैष्णवी....! अजुनही तुला असच वाटतं का...! की, आपलं नातं हे फक्त मैत्रीपूरतच आहे...?
 * वैष्णवीला काय बोलावं हे सुचत नव्हते, थोडं थांबुन ती बोलली....
वैष्णवी : म्हणजे....?
प्रेम : म्हणजे मला काय बोलायचं आहे हे तुला कळत आहे, पण तु उगाच असे प्रश्न का करतेय.
वैष्णवी : मला नाही माहित हे काय आहे ते, पण जे आहे ते छान आहे. आणि ते तसेच राहू दे.
प्रेम : म्हणजे....! अजुन किती दिवस....! खरं तर मला तुझा हा मैत्रीचा सहवास पण छान वाटतोय, पण थोडा त्रास पण होतोय याचा. सांग ना नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे ते...!
वैष्णवी : सांगितलं ना एकदा....! अजुन काय बोलू...!
प्रेम : जे मनात आहे ते बोल. माझं तर तुला माहिती आहे. आणि असच आपण भेटत, बोलत राहिलो, आणि एक दिवस अचानक जर ते सर्व बंद झाले तर त्याचा दोघांनाही त्रास होईल. म्हणुन विचारतोय मी...!
वैष्णवी : आपण आत्ताच नको ना या गोष्टींचा विचार करायला. 
प्रेम : मग अजुन किती दिवस हे असच चालणार आहे....?
वैष्णवी : ते बघु पुढच्या पुढे....!
प्रेम : नाही...! मला आत्ताच जाणून घ्यायचं आहे. नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे.
वैष्णवी : सांगेन पण आत्ता नको, आता आपण निघुया उशीर झालाय खुप.... चल...!
 * असं बोलुन ती ऊठुन चालु लागली. प्रेम तिथेच उभा होता. थोडे पुढे गेल्यावर ती मागे वळून पाहते. ती परत त्याच्याजवळ येते. त्याचा हात पकडते आणि सोबत घेऊन चालते. 
दोघे त्या गार्डन मधून बाहेर येतात. ती एका ऑटोला हात करून थांबवते. ती आत बसते. त्यालाही आत बसायला सांगते. मग तोही तिच्या बाजूला बसतो. त्या प्रवासात दोघेही गप्प होते. काही वेळातच ऑटो स्टेशनला पोचते. 
दोघेही ऑटोमधून उतरतात. त्याचे पैसे देऊन दोघे पायऱ्यांवरून वरती चालायला लागतात. स्टेशनच्या पलीकडे काही अंतरावर वैष्णवी राहत होती. प्रेम खुप वेळा सोडायला आला होता पण आजपर्यंत प्रेम कधीही तो ब्रीज उतरून खालीपर्यंत तिला सोडायला गेला नव्हता. त्यामुळे तो तिथेच थांबुन तिला बोलतो...!
प्रेम : वैष्णवी....! माझी हद्द संपली...! आज मी तुला शेवटचं विचारतोय..."माझ्याशी लग्न करशील." आणि मला याचं उत्तर जे काही असेल ते आत्ताच हवं आहे. आणि यापुढे आयुष्यात मी कधीही तुला हा प्रश्न करणार नाही. 
 * वैष्णवी थोडा वेळ त्याच्याकडे हसत पाहत राहते आणि त्या ब्रीज च्या पायरीवरून एक पाऊल खाली टाकते. तसं प्रेमचे टेन्शन वाढते. थोड्या वेळासाठी त्याला वाटतं,...संपलं सर्व....! 
पण वैष्णवी खालच्या पायरीवर हातातून पडलेला रुमाल उचलते आणि त्याच्याकडे पाहून हसायला लागते....! तिला असं हसताना पाहून प्रेमला काहीच कळत नाही. ती त्याचा हात पकडते आणि त्याला बोलते...!
वैष्णवी : किती वेळ लावलास हे विचारायला, पण ठिक आहे आता....! मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला....! पण आत्ता मला खुप उशीर होतोय, आणि कोणीतरी आपल्याला इथे असं पाहिलं तर माझी वाट लागेल. तु पण घरी जा आता...! मी निघते...! बाय....!😊
 * एवढं बोलुन ती पटापट ब्रिजच्या पायऱ्या उतरून खाली जाते. प्रेम मात्र तिथेच स्तब्ध होऊन तिच्याकडे पहात उभा असतो. त्याला काहीच कळत नव्हतं, काय करायचं ते. ती त्याला होकार देऊन गेली होती यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. 
वैष्णवी पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मागे वळून त्याच्याकडे पाहते. त्याला बाय करते आणि पुढच्या रोड मधुन आत जाते. 
ती दिसेनाशी होईपर्यंत प्रेम तिलाच पहात होता. खुप दिवस त्याला अंजलीची आठवण आली नव्हती. पण या क्षणी त्याला तिच्या जागी तीच दिसत होती. त्याला काहीच सुचत नव्हतं. आनंद साजरा करायचा की, आपण आता दुसऱ्या कोणाचे तरी झालो आहोत, यापुढे अंजली हा विषय कायमचा संपवावा लागणार होता. याचे वाईट वाटून घ्यायचे. 
थोडा वेळ तिथेच उभा राहून, थोड्या वेळाने तो राघवला कॉल करतो. राघव स्टेशन जवळच तिथेच राहत होता. तो लगेच तिथे पोचतो. त्याच्या बाईक वर बसून दोघेही थोड्या अंतरावर असलेल्या खाडीजवळ पोचतात. जातानाच तो आरवला कॉल करून त्याला पण तिकडे बोलावतो. तोही काही वेळात तिथे पोचतो. 
प्रेम दोघांनाही जे काही घडलं ते सांगतो. आणि आरवला मिठी मारतो. राघव पण त्याच्या मिठीत सामील होतो. त्या दोघांनाही या गोष्टीचा खुप आनंद होतो. तिघे मिळून तो क्षण खुप छान सेलिब्रेशन करतात. काही वेळात हि गोष्ट सर्व ग्रुप मधील लोकांना कॉल वरून पोचलेली असते. सगळेजण प्रेमचे अभिनंदन करतात. काही वेळाने ते तिघे जण एका हॉटेल मधे येतात. प्रेम सर्वांसाठी चायनीज ऑर्डर करतो. आणि त्यांच्या गप्पा पुढे चालु होतात.
आजचा दिवस प्रेमासाठी खुप खास होता. त्याचं सर्वात मोठं टेन्शन गेलं होतं. त्याला वैष्णवीचा होकार मिळाला होता. आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न हा होता की, तिच्या घरातुन याला होकार कसा मिळवायचा. आरव त्याला बोलत होता..." टेन्शन घेऊ नको, पुढेही सर्व ठिक होईल. आत्ता एंजॉय कर काही दिवस. बाकी आपण आहोतच की, तिच्या घरचे नाही तयार झाले तर पळवून आणू तिला, पण तुझं लग्न तिच्याशी लाऊनच देऊ. हे आपलं प्रॉमिस आहे." 
त्याच्या अशा बोलण्याने प्रेमला खुप आधार वाटतो. पार्टी संपल्यावर तो आरवसोबत घरी निघुन येतो. राघव तिथूनच त्याच्या घरी निघुन जातो. 
आजची रात्र झोप लागणे थोडे अवघडच होते. कारण खुप साऱ्या विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली होती. आता पुढे काय....? रात्री उशिरापर्यंत त्या विचारातच तो जागा असतो. 
खरं तर आज त्याला अंजलीची खुप आठवण येत होती. एवढे दिवस तो वैष्णवीला मिळवण्याच्या नादात तिला थोडं का होईना पण विसरला होताच. पण, मी जे काही करतोय ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय. याच्यातच दोघांचेही भले होते. 
कारण किती जरी विचार केला तरी आपण तिला ते सुख कधीच देऊ शकलो नसतो, ज्याची ती हक्कदार आहे. भविष्यात तिचेही कोणत्या तरी श्रीमंत मुलाशीच लग्न होईल. तिथे तिला खरं सुख मिळेल. मग आपण काहीच चुकीचे करत नाही आहोत, असं स्वतःलाच समजावत असतो. 
पहाटेच्या सुमारास त्याची झोप लागते. मग सकाळी जरा उशीराच उठतो. आवरून तो ऑफिसला पोचतो. खरं तर आज तो खुप आनंदी असायला हवा होता. कारण कालच वैष्णवीने त्याला लग्नासाठी होकार दिला होता. पण हवा तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसुन येत नव्हता. 
तो नेहमीच्या कामात व्यस्त होता. दुपारी त्याला आरवचा कॉल आला. 
आरव : काय मग...! कसं चाललंय...! 
प्रेम : मस्त....! 
आरव : कॉल वैगेरे आलेला की नाही मग...?
प्रेम : कोणाचा....?
आरव : अरे....! अजुन कोणाचा....? वहिनीचा...😊
प्रेम : अच्छा...! तिचा....!
आरव : मग अजुन कोणाचा येणार होता का...?
प्रेम : नाही रे...! कोणाचाच नाही आलाय कॉल...!
आरव : अच्छा....! येईल... येईल...,😊
प्रेम : बघू.....!😊
आरव : ठिक आहे...! संध्याकाळी भेट आल्यावर.
प्रेम : ओके....! बाय...!
 * असं बोलुन तो कॉल कट करतो. 
संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर त्याला वैष्णवीचा कॉल येतो. तो कॉल रिसिव्ह करतो.
वैष्णवी : हाय...! कसा आहेस....?
प्रेम : मी ठिक आहे....! तु कशी आहेस...?
वैष्णवी : मी पण ठिक आहे. निघालास तु ऑफिस मधुन....?
प्रेम : हो....!
वैष्णवी : प्रेम....! झोप लागली का काल...?
प्रेम : हो....! का....?
वैष्णवी : काही नाही...! असच विचारलं...!
प्रेम : अच्छा...! म्हणजे तुला झोप लागली नसेल...! हो... ना...!
वैष्णवी : खरं तर...! नाहीच लागली...! खुप वेळ जागी होते. 
प्रेम : का बरं...? निर्णय बदलला वगैरे नाही ना...? 🤨
वैष्णवी : नाही रे...! तो निर्णय मी विचार करूनच घेतलाय...!
प्रेम : नुसता विचार करून नाही, खुप खुप विचार करून....! असं बोल. 😊
वैष्णवी : सॉरी...! मला माहितीये, तुला याचा खुप त्रास झालाय. पण काय करू मी, विचार करणं भाग होतं मला. 
प्रेम : चलो...! देर आए, दुरुस्त आए...!😊
वैष्णवी : प्रेम...! पुढे होईल ना रे सर्व काही नीट...?
प्रेम : नको टेन्शन घेऊ एवढं....! कालच होकार दिला आहेस. जरा काही दिवस रिलॅक्स रहा. आणि माझ्यावर विश्वास ठेव, सर्व काही ठिक होईल.
वैष्णवी : बाप्पा करो...! असच नीट होऊ दे.
प्रेम : होईल होईल...! नको काळजी करू एवढी.
वैष्णवी : बरं...! नाही करत. बोल आता...!
प्रेम : वैष्णवी....! तुझ्याशी खुप काही बोलायचं आहे. आणि ते फोनवर बोलू शकत नाही. कॉइन पुरणार नाहीत तुला. म्हणून विचारतोय, भेटूया का आपण...?
वैष्णवी : खरं सांगु....! आधी एवढं काही वाटत नव्हतं, पण आत्ता या गोष्टीची जास्त भीती वाटू लागली आहे. कोणी पाहिलं आपल्याला बाहेर आणि घरी कळलं तर काय होईल....!
प्रेम : तु नको ना एवढं टेन्शन घेऊ. काही होणार नाही. या भीतीने तु भेटणारच नाहीस का कधी...?
वैष्णवी : तसं नाही रे....! दादाची बाहेर खुप ओळख आहे. त्याचे काही मित्र मला पण ओळखतात. आणि आधी जे काही घडलं आहे ते तुझ्या बाबतीत नको व्हायला एवढच वाटतं. म्हणुन भीती वाटते.
प्रेम : तु माझी काळजी करू नको. आणि असं काहीही होणार नाही. उगाच नको ते विचार करू नको. बोल आता कधी भेटायचं.
वैष्णवी : ठिक आहे...! उद्या संध्याकाळी भेटू. ऑफिस सुटल्यावर.
प्रेम : बरं ठिक आहे, कुठे भेटशील...? मी येऊ का तुझ्या ऑफिस जवळ...!
वैष्णवी : नको...! तिथे अजिबात येऊ नको, आपण नेहमी भेटतो तिथेच भेटू. मी ऑफिस मधुन सुटल्यावर तिथेच येईन.
प्रेम : ठिक आहे...! मी वाट पाहिन तिथे.
वैष्णवी : बरं चल आता...! लास्ट कॉइन होता, कॉल कट होईल. बाय...!
प्रेम : बाय...! काळजी घे.
वैष्णवी : हो... बाय...!
 * असं बोलुन ती त्या पीसीओ चा रिसीवर ठेऊन देते आणि तिथून घरी जाते. काही वेळात प्रेम पण घरी पोचलेला असतो.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्याच ठिकाणी म्हणजे तलावाच्या बाजूला असलेल्या गार्डन मधे दोघे भेटतात.
प्रेम आधीच तिथे येऊन तिची वाट पहात उभा असतो. तिथे येणाऱ्या सर्व ऑटो कडे तो पहात असतो. ती मात्र बस ने आलेली असते. बसमधून उतरल्यानंतर ती त्या गार्डन जवळ पोचते. 
ती प्रेमला लांबूनच बघत असते. आज त्याला भेटताना तिची थोडी धडधड वाढलेली होती. मनात एक भीती पण होती. बस स्टॉप वरून रस्त्याच्या कडेने ती हळु हळु चालत त्याच्याजवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते.
वैष्णवी : हाय...! 😊
प्रेम : हाय....! इकडून कुठून आली...?
वैष्णवी : अरे बस ने आली ना मी, मागे बस स्टॉप आहे तिथे उतरले होते.
प्रेम : अच्छा...! कशी आहेस तु...? 
वैष्णवी : मी छान आहे...! तु कसा आहेस...?😊
प्रेम : मी पण छानच आहे....! 😊
वैष्णवी : आपण आत जाऊन बोलुया...!
प्रेम : बरं चल....!😊
 * दोघेही आत जातात. तलावाशेजारी असलेल्या कठड्यावर काही कपल्स बसलेले होते. त्यांच्यापासून काही अंतरावर ते दोघे जाऊन बसतात. प्रेम थोडं अंतर ठेऊनच बसलेला होता. काही वेळ कोणीच काही बोलत नव्हते. दोघेही इकडे तिकडे पाहून पुन्हा एकमेकांना पाहुन हसत होते. थोड्या वेळाने वैष्णवी दोघांमधे असलेली तिची पर्स उचलते आणि आपल्या दुसऱ्या बाजूला ठेवते आणि थोडी सरकुन प्रेमच्या जवळ येते. त्याच्या हात हातात घेत त्याला बोलते...
वैष्णवी : प्रेम...! मी तुला माझ्याबद्दल सर्व काही सांगितले आहे, आणि अजुनही तुला खुप काही सांगायचं आहे. कारण आपल्या नात्याची सुरुवात नीट व्हावी. म्हणुन मी हे बोलतेय. 
प्रेम : ऐक ना....! त्याआधी मी एक बोलू का...?
वैष्णवी : बोल...!
प्रेम : तु जर तुझ्या आयुष्यात मागे काय झाले असेल ते सांगणार असशील तर, नको सांगु. मला काहीही ऐकायचं नाही. आणि मला वाटतं आत्ता तरी आपण आपल्या पुढील आयुष्यावर बोलूया. 
वैष्णवी : अरे पण ऐक तरी मला काय बोलायचं आहे ते...! 
प्रेम : हा... मी ऐकतोय...! पण मी जे काही बोललो आहे ते सोडुन तुला हवं ते बोल. मी ऐकायला तयार आहे. 
वैष्णवी : बरं ठिक आहे, आता मला एक सांग, तुला का असं वाटलं की मला प्रपोज करावं म्हणुन...?
प्रेम : माहित नाही ते...! पण काही गोष्टी आतुन येतात. आणि सध्या माझी जी परिस्थिती आहे ती फक्त तुला माहीत आहे. त्यामुळे मनात हा विचार आला की, एखादी नवीन मुलगी आयुष्यात येणार. ती हे सर्व ॲक्सेप्ट करेल की नाही हे माहित नाही. पण तुझ्यासोबत एवढे दिवस, एवढा वेळ घालवल्या नंतर कुठेतरी वाटलं असं की, तु समजुन घेशील सर्व. आणि मला कोणाची समजुत काढता येत नाही. त्यामुळे यात मला वेळ वाया घालवायचा नव्हता. आणि तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात यावी असं मला मनापासून वाटत होतं. 
वैष्णवी : अच्छा...! पण खरं सांगायचं तर मला आत्तापासूनच टेन्शन आलं आहे. घरी हे सर्व कळल्यावर काय होईल....! घरचे तयार होतील का...?
प्रेम : अरे...! किती विचार करतेय, तसं पाहिलं तर आज पहिल्यांदा भेटतोय आपण. आणि पहिल्या भेटीतच तुला टेन्शन यायला लागलं...! पुढे काय होईल...!🤔
वैष्णवी : सॉरी...! पण येतात रे विचार मनात, जे करायचं नाही हे मनाशी ठरवलं होतं, आणि आता...!
प्रेम : म्हणजे...! विचार वैगेरे बदलणार नाहीस ना...? तसं असेल तर आत्ताच सांग....!😊
वैष्णवी : नाही रे...! तसं असतं तर, मी होकार दिलाच नसता. पण पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या आत्ताच समोर दिसायला लागल्या आहेत. म्हणुन थोडं टेन्शन आलं होतं.
प्रेम : ऐक ना...! काही दिवस तरी या गोष्टी डोक्यातून काढून टाक ना...! पुढे जे होईल ते होईल, त्याचं टेन्शन आत्ताच का घेतेय. 
वैष्णवी : ठिक आहे...! नाही विचार करत. तु बोल आता...! काय ठरवलं आहेस तु...?
 * असं बोलुन ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. प्रेम तिच्याकडे पहात तिला बोलतो...
प्रेम : हे बघ वैष्णवी...! मी हा निर्णय का घेतला आहे हे तुला माहीतच आहे. पण तरीही सांगतो. मी ताईकडे अजुन किती दिवस राहणार...! पुढच्या काही दिवसात मी माझ्या आईला आणि लहान भावाला गावावरून इकडे बोलवणार आहे. ते दोघेही पहिल्यांदा मुंबईला येत आहेत. आणि इथे त्या दोघांना ऍडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ तर लागेलच. आणि आईला एकटीला अशा नवीन ठिकाणी तुझी सोबत मिळावी. आणि तु तिला नीट सांभाळून घेशील. असं मला वाटतं. 
वैष्णवी : हो... रे... ते मी करेनच ! पण त्यासोबत मी जॉब सुद्धा करणार. 
प्रेम : तो निर्णय तुझाच असेल. तुझी इच्छा असेल तर तू करू शकते. पण घरातील काम पण असेल, आई आहेच मदतीला, तरीही तुला जमेल तसं कर.
वैष्णवी : करेन मी मॅनेज, तु नको काळजी करू. 
प्रेम : बरं...! नाही करत काळजी. 😊
वैष्णवी : प्रेम... होईल ना सर्व नीट....?
प्रेम : बघ...! पुन्हा तेच....?
वैष्णवी : सॉरी...! आता पुन्हा नाही बोलणार. आज पहिलीच भेट आहे ना आपली....! 😊
 * असं बोलुन ती थोडीशी त्याला बिलगते. प्रेम पण तिला जवळ घेतो. थोडा वेळ ते एकमेकांशी गप्पा मारतात. काही वेळाने प्रेम तिला बोलतो....
प्रेम : चला मॅडम....! आज उशीर नाही होत का...?
वैष्णवी : नाही होत...! सांगेन मी काहीतरी, मैत्रिणीकडे गेले होते म्हणुन...!😊
प्रेम : अच्छा...! पण तरीही नको...! निघुया आपण आता....!
वैष्णवी : पाच मिनिट बस्... मग निघू...!
प्रेम : पाच मिनिटांनी काय होणार आहे. 😊
वैष्णवी : ते तुला नाही कळणार....! 
 * असं बोलुन ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून थोडा वेळ शांत बसते. दोघेही काही वेळ न बोलता तसेच बसले होते. शेवटी वैष्णवी त्याला बोलते.
वैष्णवी : आज खुप दिवसांनी खुप छान आणि रिलॅक्स वाटलं. 😊
प्रेम : अच्छा....! मला पण....!😊
वैष्णवी : बरं... चल आता खरच निघुया, उशीर तर झालाच आहे. 😊
 प्रेम : ठिक आहे...! चला... तर मग...!😊
 * दोघे त्या गार्डन मधून बाहेर येतात. प्रेम एक ऑटो थांबवतो. त्यामधे बसुन काही वेळातच ते स्टेशन ला पोचतात. ती नको बोलत असताना सुद्धा, प्रेम तिला सोडायला त्या रेल्वे ब्रिज च्या शेवटपर्यंत जातो. तिथून ती एकटीच खाली उतरते. तिथून त्याला बाय करून पुढच्या रोड वरून आत जाते. प्रेम तिथेच उभा राहून तिच्याकडे पहात असतो. 
आज पुन्हा एकदा तीच गोष्ट घडते. त्याला वैष्णवीच्या जागी अंजली दिसत असते.
वैष्णवी निघून गेलेली होती, पण प्रेम मात्र तिथेच स्तब्ध होऊन उभा राहिला होता. 
काही वेळात एका एक्सप्रेस रेल्वेच्या हॉर्न च्या आवाजाने तो दचकतो आणि भानावर येतो.
ब्रिज वर खुप गर्दी झाली होती. त्यातून वाट काढत तो अलीकडे येतो. आणि तिथून बस पकडून घरी निघून येतो. 
रात्री जेवण वैगेरे झाल्यावर तो रमेश सोबत आरवकडे जातो. ते तिघे मिळून मैदानात बसून खुप वेळ आता पुढे काय करायचं, या विषयावर गप्पा मारतात. मग रात्री उशिरा तो रमेशच्या घरी त्याच्यासोबत झोपायला जातो.
आजचा दिवस तसा दोघांसाठी खास होता. आजची भेट त्यांची तशी पहिलीच भेट होती. 
वैष्णवी आज खुश होती. घरी आल्यावर आईने विचारातच तिने आईला सांगितले, " मैत्रिणीकडे गेले होते म्हणुन उशीर झाला आज..." 
आज ती घरात सर्वांशी हसून मनमोकळे बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव दिसत होता. तिने आज आईसोबत छान स्वयंपाक केला होता. तिला खुप दिवसांनी असं आनंदी पाहून तिची आई पण खुश होती. 
रात्री सर्वांसोबत जेवण करून, सर्व गोष्टी आवरून ती आईच्या बाजूला झोपली होती. त्यांची रूम थोडी लहान होती त्यामुळे वरती पोट माळा केला होता, तिचा भाऊ वरती झोपला होता. त्या दोघांमध्ये तसं जास्त बोलणं होत नसे. पण आज त्याचा मूड चांगला होता. म्हणून तिने स्वतःहून त्याला खालूनच आवाज दिला...
वैष्णवी : दादा...! ऐकतोय ना, मला काहीतरी बोलायचं आहे. 
दादा : बोल...! ऐकतोय...!
वैष्णवी : मला मोबाईल हवा आहे....!
दादा : ठिक आहे घेऊया उद्या....! 
 * दादा असा पटकन तयार होईल असं तिला वाटलं नव्हतं, पण त्याच्या अशा बोलण्याने ती मात्र खुप खुश झाली होती. त्याला थॅन्क्स बोलुन ती उद्याच्या विचारात झोपी गेली. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️