Anubandh Bandhanache - 6 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 6

The Author
Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 6

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ६ )

प्रेमच्या आयुष्यात हे जे काही चालु होते, याची कल्पना कोणालाही नव्हती. ग्रुप मधे पण कोणाला तो अंजली बद्दल काहीच बोलत नव्हता. 
एवढ्या छोट्या मुलीशी फ्रेंडशिप केलीय, हे सांगायला पण त्याला बरं वाटत नव्हते.
 सर्वजण काय विचार करतील माझ्याबद्दल... हा विचार करून तो कोणालाच काही बोलत नव्हता.
 त्याचे नेहमीचे रुटींग चालु होते. वेळ मिळेल तेव्हा तो अंजलीसोबत फोनवर बोलत होता. दोघांनाही आता एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नव्हते. 
कधी कधी ऑफिसमधील कामामुळे त्याला रोज कॉल करायला जमायचे नाही. मग अंजली त्याच्यावर नाराज व्हायची. तो पण गोड बोलुन तिचा राग घालवायचा. 
एकदा प्रेम अचानक अंजलीला न सांगता गावी गेला. चारपाच दिवसांनी परत आला. 
ऑफिस मधे आल्यावर त्याचे बॉस त्याला बोलले. कोणीतरी अंजली नावाच्या मुलीचे कॉल येत होते तुझ्यासाठी. 
गावी त्याच्या वडीलांमुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यांचा राग याच्या डोक्यात अजुन होता. त्याने अंजलीला सांगितले होते की, ऑफिस मधे स्वतःहून कॉल करायचा नाही म्हणुन, तरीही तिने कॉल केला होता. 
प्रेम तिला न बोलताच गावी गेल्यामुळे तिने दोन दिवस कॉल ची वाट पाहिली, पण तिसऱ्या दिवशी तिला राहवलं नाही म्हणून तिने कॉल केला होता. 
प्रेम थोडा चिडला होता. त्याने अंजलीला कॉल लावला आणि तिचे काही न ऐकताच सर्व राग तिच्यावर काढला. तिला खुप काही बोलला. कॉल ठेवताना पुन्हा कॉल करू नको, असे ओरडुन बोलला, आणि कॉल कट केला.
 बिचारी अंजली त्याचे सर्व काही निमुटपणे ऐकत होती. आणि प्रेम ने कॉल कट केला तशी ती आपल्या रूम मधे जाऊन रडायला लागली. अंजलीला आजपर्यंत कोणीही कधीच असं ओरडुन बोलले नव्हते, 
घरामध्ये आणि परीवारामध्ये ती सर्वांची लाडकी होती. आज तिला खुप वाईट वाटत होते. माझे काहीच ऐकुन न घेता, प्रेम मला किती ओरडला, ते पण फक्त कॉल केला म्हणुन... यापुढे आता कधीच त्याच्या ऑफिस मधे कॉल करायचा नाही. असे ठरवुन तिने डोळे पुसले. आणि अभ्यास करायला बसली. इकडे प्रेमचा राग शांत झाल्यावर त्याच्या लक्षात आले, 
आपण काय मोठी चुक केलीय ते, आपणच तिला न सांगता गावी गेलो, पाच दिवस तिला कॉल केला नाही, म्हणून तिने काळजीपोटी ऑफिस मधे कॉल केला असावा, आणि तिची काही चुक नसताना मी माझा सर्व राग तिच्यावर काढला.... 
काय विचार करत असेल ती आता माझ्याबद्दल.... त्याला राहवलं नाही म्हणुन त्याने पुन्हा अंजलीला कॉल लावला. पण अंजलीने नंबर पाहून रिसिव्ह नाही केला. त्याने थोड्या वेळाने पुन्हा कॉल केला तर अंजलीच्या मॉम नी उचलला, प्रेमला काय बोलावं ते कळेनासे झाले, त्याने पटकन काहीतरी वेगळं नाव विचारून रॉंग नंबर आहे असे दाखऊन दिले. 
आता मात्र त्याचे टेन्शन अजुनच वाढत चालले होते. जर अंजलीने कधीच कॉल उचलला नाही तर.... कसे बोलणार तिच्याशी.... 
खरंतर झालेल्या प्रकाराबद्दल त्याला तिची माफी मागायची होती. पण अंजली कॉल वर येत नव्हती. तिला राग येणं साहजिकच होते.
 ऑफिसच्या कामासाठी बाहेर आल्यावर त्याने पीसीओ वरून कॉल लावण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हासद्धा अंजलीच्या मॉमनेच कॉल घेतला. प्रेम ने काही न बोलताच कट केला.

जसजसा वेळ पुढे जात होता तसा प्रेम चे टेन्शन अजुन वाढायला लागले होते. शेवटी तो ठरवतो, ती ट्युशन वरून सुटते तेव्हा तिला भेटायचं आणि तिला सॉरी बोलुन माफी मागायची. 
असे ठरवुन तो लवकरच ऑफिस मधून निघतो आणि बरोबर आठ वाजता तिच्या ट्युशन च्या बाहेर येऊन तिची वाट पहात उभा राहतो. थोड्या वेळात सर्व मुले मुली क्लास मधुन बाहेर येत असतात, 
प्रेम त्या सर्वांमध्ये अंजलीला शोधत असतो. पण सर्व मुले बाहेर पडली तरी त्यामध्ये अंजली त्याला कुठेच दिसली नाही. तरी अजुन थोडा वेळ थांबुन शेवटी निराश होऊन घरी निघुन जातो. जाताना त्याच्या मनात तिचेच विचार चालु होते. का आली नसेल ट्युशन ला अंजली...? आता काय करायचं... 
आता ती स्वतःहून कॉल करत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही, पण मीच तिला रागाने बोललोय की यापुढे कधीच माझ्या ऑफिस मधे कॉल करायचा नाही म्हणुन....
 अरे देवा... किती मोठी चुक झालीय माझ्या हातुन.... या गोष्टीचा स्वतःलाच दोष देत असतो. रात्री पण तोच विचार डोक्यात असल्यामुळे त्याला नीट झोप येत नाही. उशिरा झोप लागल्यामुळे सकाळी उठायला पण उशीर होतो. 
आरव आणि रमेश दरवाज्यात येऊन उभे असतात. घाईघाईत तो आवरतो, आणि त्यांच्यासोबत कॉलेजला जायला निघतो. त्याचा चेहरा पाहून वाटेतच आरव त्याला विचारतो.
आरव : काय रे... काय झालं... तुझा चेहरा का पडलाय आज...?
प्रेम : काही नाही रे... रात्री झोप नाही झाली म्हणुन...
आरव : नक्की ना...? का काही दुसरा प्रॉब्लेम आहे, तसे काही असेल तर सांग...
प्रेम : नाही रे... तसे काहीच नाही. ओके.
(असे बोलुन तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो.)
आरव : तु बोलतोय तर ओके... पण खरच काही असेल तर सांग....
प्रेम : अरे... खरच काही नाही... आणि असले तर तुमच्याशिवाय कोणाला सांगणार...
आरव : बरं ओके... टेक केअर.
असे बोलुन ते तिघेही कॉलेजला जातात.
प्रेमला काहीही करून अंजलीला भेटायचे असते. तिची माफी मागायची असते. पण खुप प्रयत्न करूनही त्या दोघांची भेट होत नव्हती.
 घरी कॉल करायचा म्हटलं तरी टेन्शन येत होते. कारण ती एकदाही कॉल रिसिव्ह करत नव्हती. बाहेर कुठेतरी भेटली पाहिजे जेणकरून तिच्याशी बोलता येईल, असं सारखं प्रेमला वाटत होते. 
एवढ्या दिवसात तिने पण एकदाही प्रेमला ऑफिसमधे कॉल केला नव्हता. आणि करेल तरी कशी.... प्रेम ने एवढं सर्व विनाकारण तिला ऐकवलं होते. 
जसजसे दिवस जात होते, त्याचे टेन्शन अजुनच वाढत चालले होते. 
आता त्याच्याजवळ एकच शेवटचा पर्याय होता अंजलीला भेटण्यासाठी, तो म्हणजे तिच्या स्कूल मधे जाऊन तिला भेटायचे. त्याच्या कॉलेजपासून अंजलीचे स्कूल जवळच होते. पण कधी आणि कसे भेटणार हा प्रश्न होता. कारण प्रेम चे कॉलेज आणि अंजलीच्या स्कूलचे टाईम सेम होते. सकाळी सात ते बारा. तिला भेटायचं म्हटलं तर एखादा पिरियड बंक करावा लागणार होता. 
दुसऱ्या दिवशीच त्याने लास्ट पिरियड बंक करून, आरव ला ऑफिसमधे लवकर जायचे आहे असे सांगुन अंजलीच्या स्कूल जवळ येऊन तिची वाट पाहु लागला. थोड्याच वेळात स्कूल सुटले. सर्व मुलं मुली गेट मधुन बाहेर पडत होती.
सर्व मुलांच्या गर्दीमध्ये प्रेम ची नजर अंजलीला शोधु लागली होती. साधारण तिच्यासारख्या दिसणाऱ्या एक दोन मुली लांबुन येताना दिसल्या, पण जवळ आल्यावर त्या कोणीतरी वेगळ्याच होत्या, हे पाहून त्याचा मुड ऑफ झाला. 
खरं तर एवढ्या मुलांच्या गर्दीमध्ये तिला शोधणं तसे कठीणच होते. हळु हळू गर्दी कमी होत होती. काही मुले मुली बाहेर गेटवर असलेल्या स्कूलबस मधे चढत होती.  
त्याच एका बसमधे चढताना तिला पाहिल्यासारखं प्रेमला वाटले. ती पाठमोरी असल्यामुळे चेहरा दिसला नव्हता. 
 प्रेम बसजवळ जाईपर्यंत बस चालु झाली होती. शेवटी त्याने बसचा पाठलाग केला, बस थोड्या अंतरावर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की, बस दुसऱ्याच मार्गाने जात होती. तो वाटेतच थांबला. एवढे दिवस तिच्याशी बोलत होतो पण तिला एकदाही विचारले नाही, स्कूल मधे कशी जात होती ते....
आता काहीच पर्याय नव्हता, ऑफिसला जायला पण उशीर झाला होता. म्हणुन तिथुनच सरळ तो ऑफिसला निघुन आला.
 अंजलीला भेटण्याचा तिच्याशी बोलण्याचा प्रेमचा हा प्रयत्न पण असफल ठरला होता. सर्व प्रयत्न करून झाले होते. आता पुढे काय करायचं, कसे तिला भेटता येईल, हेच विचार दिवसभर त्याच्या डोक्यात येत होते. तिला भेटल्याशिवाय, तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हता. 
मी का एवढा रागावलो तिच्यावर, या गोष्टीचा त्याला पुन्हा पुन्हा त्रास होत होता.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️