अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४९ )
वैष्णवी दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून ऑफिसला गेली. तिचा भाऊ संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला स्टेशनला भेटणार होता. आज तिला मोबाईल घ्यायचा होता. त्यामुळे कधी दिवस संपतोय असे तिला झाले होते.
अखेरीस कसाबसा दिवस निघून गेला होता, संध्याकाळचे सहा वाजले होते. ती ऑफिस मधुन निघते आणि पीसीओ वरून दादाला कॉल करते. तो स्टेशनला येऊन थांबलेला होता. त्यामुळे ती प्रेमला कॉल करत नाही. तिथून ती स्टेशनला येते. तिथे तिचा भाऊ तिला भेटतो. ते दोघे तिथेच एका मोबाईलच्या शॉप मधे जातात. ती नोकियाचा एक मोबाईल पसंत करते. तिथेच त्यामधे नवीन सिम कार्ड टाकून घेते. काही वेळाने ते कार्ड चालु होणार होते.
तिचा भाऊ मोबाईल आणि सिम कार्ड चे पैसे भरून त्याचे बिल घेतो. वैष्णवी मोबाईलचा तो रिकामा बॉक्स त्या मोबाईल सोबत दिलेल्या बॅग मधे टाकते. आणि मोबाईल हातात घेऊन आनंदाने दादासोबत त्या शॉप मधुन बाहेर पडते. बाहेर आल्यावर त्याला पुन्हा एकदा थॅन्क्स बोलते.
तिचा भाऊ आणि ती दोघेही ऑटो पकडून घरी येतात. घरी आल्यावर ती सर्वात आधी आईला तिचा मोबाईल दाखवते. तिची आई पण खुश होते.
मग फ्रेश होऊन तो मोबाईल पुन्हा त्या बॉक्स मधे ठेऊन तो बॉक्स देवाजवळ ठेवते. दिवाबत्ती झाल्यावर ती घरातील स्वयंपाक करण्यात आईला मदत करत असते.
तेवढ्यात तिला आठवते.... आज आपण प्रेमला कॉल केला नाही, तो वाट बघत असणार. पण आता खुप उशीर झाला होता. तो आता घरी पोचला असेल. आणि आता एवढ्या उशीरा बाहेर जाऊन त्याला कॉल करणे शक्य नव्हते. कारण दादा घरीच होता.
इकडे ऑफिस मधुन सुटल्यावर प्रेम मात्र तिच्या कॉलची वाट बघत घरी चालला होता. आणि तिच्या कॉल करण्याची वेळ निघुन गेल्यावर तो अजुनच टेन्शन मधे येतो...
दोनच दिवस तर झाले तिने होकार दिला आहे...,याआधी तर ती रोज कॉल करत होती, मग आज का कॉल केला नाही तिने...? काही झालं असेल का...? कसं कळणार ते...! जसजसा वेळ जात होता, तसे त्याला अजूनच टेन्शन येत होते. शेवटी तो आरवला कॉल करतो. काही वेळात आरव त्याला तिथे भेटतो. तो त्याला हे सर्व सांगतो. मग ते दोघे राघव कडे येतात. राघव घरातून बाहेर येतो आणि त्या दोघांसोबत तिथेच जवळ असलेल्या चौकात येऊन बोलत असतात...
आरव : आपण एक काम करू, ती जिथे राहते तिथे जाऊ....!
राघव : पागल झाला आहेस का तू....! तिच्या भावाला अजुन तु ओळखत नाहीस. तसं तर मी पण त्याला अजुन भेटलो नाही कधी, पण नाव ऐकुन आहे, खुप डेंजर माणूस आहे भाई....!
आरव : चल मग... आज भेटुन येऊ...!😊
प्रेम : मस्करी नको रे.... ! इथे मला टेन्शन येत आहे, आणि तुमचं काय चाललंय.
आरव : अरे...! मी मस्करी करत नाही. मी खरच बोलतोय आपण जाऊया तिकडे. निदान समजेल तरी काही झालं असेल तर...!
राघव : तुला घर माहीत आहे का तिचं...?
आरव : तुला माहीत असेल ना...! एकाच एरिया मधे राहतात, मग तेवढं काम करू शकत नव्हता का...?
राघव : मी काय म्हणुन जाऊ तिच्या घरी...? मार खायचा आहे का मला...!
प्रेम : जाऊदे...! नको रिस्क घ्यायला, आपण जाऊया घरी. बघु उद्यापर्यंत वाट....!
आरव : अरे...! आत्ताच एवढा घाबरला का...! लग्न करायचं आहे ना तुला तिच्याशी.....!
प्रेम : तसं नाही रे...! पण नको उगाच....!
आरव : ते काही नाही...! तुम्ही बसा गाडीवर, आज वहिनीच्या घरी जाऊनच येऊ...!
राघव : तु मार खायला लावणार आज असं वाटतं आज.....!
आरव : अरे...! उगाच का मारतील ते, आपण फक्त तिच्या घराजवळ जाऊन येऊ. तुला माहीत आहे ना ती कुठे राहते ते...!
राघव : सांगितलं होतं एकदा तिने, चल बघू...! आज जाऊनच येऊ....!
प्रेम : काय चाललय तुमचं...! तुम्ही सांगून पण ऐकणार नाहीत का...!
आरव : तु गप्प गाडीवर बस्...!
* प्रेम आरवच्या गाडीवर बसतो. राघव पण त्याच्याच गाडीवर बसून तिघेही तिच्या एरिया मधे जातात. तिथे पोचल्यावर ते तिथेच मेन रोडवर थांबतात. आरव गाडी साईड ला घेतो. राघव लांबूनच त्यांना वैष्णवी रहात असलेली चाळ दाखवतो.
राघव : या चाळीमध्ये लास्ट रूम त्यांचा आहे.
प्रेम : मी सांगतोय ते ऐका, चला परत जाऊ...!
आरव : तु गप्प बस रे...! आज वाहिनीला भेटूनच जायचं...!
राघव : नाही भेटली तर, मार तरी नक्कीच भेटेल...!😋
आरव : राघव...! तु आत जाऊन राऊंड मारून ये...! बघ दिसते का...?
राघव : पागल झालाय का....! 🤨
आरव : अरे...! तु इकडेच राहतो ना, मग कशाला घाबरतोय. आणि काय झालं तर बघू, काही आवाज आला तर, आम्ही इकडूनच निघू....तु बस् मार खात...!😋
प्रेम : काय फालतुगिरी चाललीय तुमची....!
आरव : मग तु जातो का सासरवाडीत....? 😄
राघव : तिकडेच रहा मग...! घरजावई होऊन...!😋
प्रेम : तुम्ही लोकं कधीच नाही सुधरणार...! काय करायचं ते करा...!
* असं बोलुन तो पाण्याची बॉटल घेण्यासाठी रोडवरील एका दुकानात जातो. बॉटल घेऊन परत येत असतो तेवढ्यात त्याला समोरून वैष्णवी त्या दुकानात येताना दिसते. तिला बघून तो तिथेच स्तब्ध उभा होतो. ती थोडी जवळ येते आणि त्याला असं अचानक तिथे बघुन दचकते. दोघेही एकमेकांकडे पहात असतात. दोघांना काय बोलायचं ते सुचत नाही. दुकानदार तिच्या ओळखीचे असतात, दुकानात काही लोक तिच्या चाळीतले होते. त्यांच्यासमोर ती काहीच बोलू शकत नव्हती.
तरीही त्याला थोडे बाजुला घेऊन हळूच त्याला बोलते.
वैष्णवी : तु इथे काय करतोय....? कशाला आलाय इथे...? 🤔
प्रेम : ते....! आज तुझा कॉल नाही आला ना, म्हणुन मला वाटलं काही झालं वगैरे झालं असेल म्हणून...
वैष्णवी : अरे पागल आहेस का...? नाही जमलं कॉल करायला आज, म्हणुन काय इथेपर्यंत यायचं. तु आता पटकन निघ इथून, जर कोणी बघितलं ना इथे, तुझ्याशी बोलताना, तर माझं काही खरं नाही. तू निघ आधी इथून, हवं तर मी सकाळी कॉल करते. पण आत्ता तू जा इथून....🙏🏻
प्रेम : हो... जातोय, एवढी काय घाबरतेय, आणि एकटा नाही आलोय मी...!
वैष्णवी : म्हणजे...! अजुन कोण आहे तुझ्यासोबत...?
प्रेम : आरव आणि राघव...! ते बघ तिकडे बाईक जवळ उभे आहेत.
वैष्णवी : अरे देवा...! त्यांना पण घेऊन आला आहेस...! कळतं का तुला काही...! एक काम कर आता थोडे पुढे एक मंदिर आहे तिथे जाऊन थांबा मी येते तिथे मागून.... जा आता...!
प्रेम : हो....! जातोय...!
* असं बोलुन तो ते दोघे उभे होते तिथे येतो. त्याला पाहून आरव बोलतो.
आरव : पाण्याची बॉटल काय वहिनीच्या घरातून आणायला गेला होतास की काय...?😋
प्रेम : घरी तर नाही गेलोय, पण तिला भेटून आलोय...! 😊
आरव : म्हणजे...! कुठे भेटलास तिला...?
प्रेम : ती बघ समोरच्या दुकानात उभी आहे.
* दोघे तिच्याकडे पाहतात, ती हळूच त्यांना हात दाखवते आणि पुढे यायला सांगते. तीही त्या रस्त्याने मंदिराकडे चालत जाते. मग हे. तिघेही गाडीवरून पुढे जाऊन त्या मंदिराजवळ थांबतात. थोड्याच वेळात वैष्णवी तिथे पोचते. आणि त्यांना बोलते...
वैष्णवी : तुम्ही लोकं काय पागल बिगल आहात का..? काय चाललंय हे....?
आरव : अगं हा प्रेम आम्हाला घेऊन आला, बोलला आज तिने कॉल नाही केला. मला तिला भेटायचं आहे. तुम्ही असाल तसे निघुन या...! मग काय करणार, आम्हाला पण टेन्शन आलं, मग मित्रासाठी यावं लागलं ना...!😊
प्रेम : काय खोटं बोलतो रे...! मी नको नको बोलत असताना सुद्धा हा मला घेऊन आलाय इकडे.
वैष्णवी : अरे...! आता नक्की कोण खरं बोलतंय...?
आरव : मी....! हा खोटं बोलतोय, विचार हवं तर राघवला.
राघव : हो...हो... हाच बोलला, मला तिला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून.
प्रेम : किती नीच आहात रे साल्यांनो...! किती खोटं बोलाल. ते पण देवासमोर, त्या मंदिरातला देव पण बघतोय तुमच्याकडे.
वैष्णवी : बरं ते जाऊ दे, मी जास्त वेळ इथे अशी तुमच्याशी बोलत थांबू शकत नाही. आणि तुम्हाला घरी पण बोलवू शकत नाही. त्याबद्दल सॉरी. पण तुम्ही आता जा घरी...! इथे जास्त वेळ थांबू नका प्लीज. 🙏🏻
आरव : अरे हो...! एवढी काय घाबरतेय,,,, बरं आत्ता आम्ही निघतो पण लवकरच तुझ्या घरी येणार आणि तु आमचा पाहुणचार पण करणार हे फिक्स आहे. तयारीत रहा. निघतो आम्ही आता.
वैष्णवी : सॉरी यार...! मलाच कसतरी वाटतंय, प्लीज समजुन घ्या.
प्रेम : ठिक आहे...! तु पण जा घरी, आम्ही पण निघतोय. उद्या कॉल कर आठवणीने....!
आरव : आठवणीने कॉल कर... एवढं सांगायला तो आम्हाला इथे घेऊन आला होता..... चला बाय. 😋
* असं बोलुन तो गाडीला किक मारतो. दोघे त्याच्या गाडीवर बसून राघवच्या घरी येतात. आणि तिथे थोडा वेळ गप्पा मारतात. राघवची आई त्या दोघांचे पण जेवण बनवते. मग रात्री उशिरा जेऊन ते घरी येतात.
रात्री उशिरा प्रेमच्या मोबाईल वर एक एस एम एस येतो. " Good night " तो मेसेज पाहून प्रेम थोडा विचार करतो. हा नंबर तर सेव्ह नाही. मग कोणी केला असेल हा मेसेज. रिप्लाय देऊ की नको. चुकून कोणाकडून तरी सेंड झाला असेल जाऊ दे. असा विचार करून तो मोबाइल बाजूला ठेवून देतो.
थोड्या वेळाने पुन्हा एक मेसेज त्याच नंबर वरून येतो. प्रेम मोबाईल घेऊन तो मेसेज ओपन करून वाचतो " Zopala ka tu" ?
कोण असेल ही व्यक्ती, अशी एवढ्या रात्री का मेसेज करत असेल. वैष्णवीजवळ मोबाईल नव्हता हे त्याला माहीत होते त्यामुळे तो तिचा विचार करतच नव्हता. मग कोण असेल...? अंजली.....!
नाही...! हे शक्य नाही...! कारण एवढ्या दिवसात त्यांच्यापैकी कोणाशीही तो बोलला किंवा भेटला नव्हता. मग तिला माझा हा नंबर कसा काय मिळाला असेल....? कसं कळेल ही व्यक्ती कोण आहे ते...? रिप्लाय देऊन बघु का...! नको...! जर तीच असेल तर...? अजुन काही प्रॉब्लेम नको. असा विचार करून तो मोबाइल बाजूला ठेवून झोपुन जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऊठुन तो मोबाईल चेक करतो. पुन्हा त्याच नंबर वरून मेसेज आलेला होता. " Good morning "
आता मात्र त्याची बेचैनी वाढते. त्याला काय करावे ते सुचत नव्हते. तो त्या मेसेजला कोणताही रिप्लाय न देता आवरून ऑफिसला निघूुन येतो.
ऑफिसला पोचताच पुन्हा त्याला मेसेज येतो.
’पोचलात का ऑफिसला...?
आता मात्र त्याला टेन्शन येऊ लागले होते. पण या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून तो कामाला लागतो. दुपारी लंच टाइम होईपर्यंत तो मोबाईल हातात घेत नाही.
जेवण झाल्यावर तो मोबाईल हातात घेतो. अजुन एक मेसेज...' जेवलास...?
आता मात्र त्याला राहवत नाही...! तो त्या मेसेज ला रिप्लाय करतो...
'कोण आहात आपण...?
थोडा वेळ रिप्लाय ची वाट पाहतो, पण समोरून कोणताही रिप्लाय येत नव्हता. अजुन थोडा वेळ वाट पाहून पुन्हा तो मोबाईल बाजुला ठेवून कामाला लागतो.
मधे मधे त्याला वाटते... चेक करावा का मोबाईल...? रिप्लाय आला असेल का...?
पण स्वतःला कंट्रोल करत तो कामात व्यस्त होतो.
संध्याकाळी तो घरी जायला निघतो. या आशेने की, आता वैष्णवीचा कॉल येईल. पण तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. तो डिस्प्ले वरील नंबर बघतो. ज्या नंबर वरून त्याला मेसेज येत होते तो हाच नंबर होता.
तो काही विचार न करता कॉल रिसिव्ह करतो. समोरून काहीही आवाज येत नव्हता. तो खुप वेळा हॅलो हॅलो बोलत होता...
काही वेळाने समोरून आवाज आला...
हॅलो...!
तो वैष्णवीचा आवाज होता, हे तो लगेच ओळखतो. समोरून वैष्णवी बोलते...
वैष्णवी : सॉरी...! सरप्राइज झाला ना...! दादा ने मला मोबाईल घेऊन दिला काल, त्यावरूनच कॉल केलाय...!😊
प्रेम : अच्छा म्हणजे ते मेसेज वगैरे...! अरे निदान सांगायचं तरी... मला किती टेन्शन आलं होतं.
वैष्णवी : अच्छा...! कसलं टेन्शन...?
प्रेम : अरे...! असे अनोळखी नंबर वरून मेसेज आले तर कोणालाही टेन्शन येणारच ना...!
वैष्णवी : सॉरी...! मी थोडी मस्करी केली,
प्रेम : इट्स ओके...! आणि अभिनंदन... नवीन मोबाईल बद्दल...! पण मोबाईल वरून एवढा वेळ बोललीस तर खुप पैसे जातील, रिचार्ज संपून जाईल.
वैष्णवी : होऊ दे...! आजचा दिवस... उद्या करेन पीसीओ वरून...!
प्रेम : बरं एक काम कर...! तु कॉल कट कर, मी कॉल करतो तुला...!
वैष्णवी : बरं...!
* असे बोलुन ती कॉल कट करते. प्रेम तिला तिच्या मोबाईलवर कॉल करतो. ती कॉल रिसिव्ह करते.
प्रेम : हा... बोल आता...! असं अचानक मोबाईल घ्यायचं कसं ठरलं...?
वैष्णवी : खरं तर मी खुप दिवसांपासून दादाला बोलत होते. आणि काल त्याने मला मोबाईल घेऊन दिला.
प्रेम : छान...! खरं तर असायलाच हवा तुझ्याकडे मोबाईल...! तु जॉबला जातेस मग ते गरजेचं आहे. पण घरी जायच्या आधी हे कॉल लिस्ट मधुन डिलिट कर.. आणि ते मेसेज सुद्धा. उगाच घरी कोणी पाहिले तर प्रोब्लेम होईल.
वैष्णवी : हो...! करेन...! नको काळजी करू. आता तुझा बॅलन्स संपेल, ठेऊ का फोन मी....!😊
प्रेम : राहू दे...बोल...! 😊
* काही वेळ ते दोघे गप्पा मारत घरी जायच्या वाटेने चालू लागतात. काही वेळाने ती घराजवळ पोचते आणि त्याचा कॉल कट करते.
पुढे काही दिवस हे असेच चालु होते.
तिच्या भावाचे लग्न ठरले होते. त्यानिमित्ताने ती गावी गेली होती. परत आल्यावर ती लग्नाच्या पूजेचं आमंत्रण सर्वांना देते. प्रेम आणि आरव आणि राघव तिघेही गिफ्ट घेऊन पूजेला जातात. आज पहिल्यांदाच तो तिच्या घरी जाणार होता. या गोष्टीचे दडपण त्याला आले होते. पण सोबत आरव आणि राघव होते.
ते तिघे तिच्या घराजवळ पोचतात. वैष्णवी छान साडी वगैरे नेसली होती. ती खुप सुंदर दिसत होती. लांबूनच ती त्यांना पाहते आणि त्यांच्याजवळ येते. प्रेमला आणि त्या दोघांना घेऊन ती घरी येते. ती दादा वहिनी आणि आई सोबत ओळख करून देते. माझ्या ऑफिसमधील मित्र आहेत म्हणून. ते सर्व पूजेच्या पाया पडतात आणि दादा वहिनीला गिफ्ट देऊन तिथून बाहेर येतात.
चाळीमधील तिची रूम खूप छोटी असल्यामुळे बाजूच्या रूम मधे जेवणाची सोय केली होती. ती त्या तिघांनाही जेवायला आग्रह करते म्हणून ते जेवायला बसतात.
जेवण झाल्यावर ते जायला निघतात. वैष्णवी त्यांना सोडायला मेन रोडवर येते.
वैष्णवी : तुम्ही सर्वजण पहिल्यांदा माझ्या घरी आलात त्याबद्दल थॅन्क्स. खुप छान वाटलं.
आरव : आता काय येणं जाणं होणारच...😊
राघव : मग आताच विचारायचं ना, काय ते फायनल झालं असतं. 😊
प्रेम : झालं का तुमचं...! चला आता निघूया. असं बोलून ते सर्व जायला निघतात.
पुढे काही दिवस निघुन जातात.
एक दिवस आरव संध्याकाळी प्रेमच्या घरी येतो. दोघे मिळुन त्याच्या ताईला वैष्णवी बद्दल सर्व काही सांगतात.
ताईला पण ते ऐकुन आनंदच होतो. भावाने लग्नासाठी मुलगी पसंत केलीय एवढच तिच्यासाठी पुरेसं होतं. "आता पुढे काय करायचं ते मी बघते. आपण लवकरच तिच्या घरी जाऊ बोलणी करायला, बघु कसे तयार होत नाहीत ते, काय कमी आहे माझ्या भावात." ताई थोडी जोश मधे येते. तिला पाहून प्रेम बोलतो.
प्रेम : हो...हो... थांब जरा...धीर घे...!
ताई : आता कशाला थांबायचं...?
प्रेम : मी उद्या, परवा तिला घरी घेऊन येतो. तु आधी बोल तिच्याशी, बघ तुला कशी वाटते ती, मग बघू पुढचं...!
ताई : तु पसंत केलीय ना, मग चांगलीच असेल, आणि मी जरी नाही बोलले तर, तू काय लग्न करणार नाहीस का...?
* ते ऐकुन प्रेम गप्पच बसतो...
काही वेळ त्यांच्या गप्पा चालुच असतात. मग थोड्या वेळाने आरव तिथून घरी जायला निघतो.
दोन दिवसांनी प्रेम वैष्णवीला घरी घेऊन येतो. तिची ताईशी ओळख करून देतो. ताई तिला पाहून खुश होते. ते तिघे काही वेळ बोलत असतात तेवढ्यात आरव पण तिथे येतो. ते चौघे मिळुन पुढे कसं करायचं या संदर्भात बोलत असतात. वैष्णवी ताईला तिच्या घरातील सर्व काही परिस्थिती सांगते. ताई तिला पुढे काय करायचे ते नीट समजावते. " सर्व काही नीट होईल, नको काळजी करू."
काही वेळ बोलून ती जायला निघते. प्रेम आणि आरव तिला बस स्टॉप पर्यंत सोडायला जातात. थोड्याच वेळात बस येते, ती बस पकडून निघून जाते. प्रेम आणि आरव तिथून घरी निघून येतात.
काही दिवसांनी वैष्णवीच्या घरी अचानक तिला पहायला कोणीतरी पाहुणे येतात. त्यांना पाहून तिला थोडं टेन्शन आले होते पण ती शांत राहते. तिची वहिनी माहेरी गेलेली होती. त्यामुळे ती आईसोबत त्यांचे जेवण वगैरे बनवायला मदत करत असते. जेवण वगैरे झाल्यावर तिची आई तिला साडी नेसायला बाजूच्या रूम मधे पाठवते. साडी नेसताना तिची धडधड वाढत चालली होती. मनातल्या मनात ती स्वतःला धीर देत होती. ती साडी नेसून घरी येते आणि त्यांच्यासमोर उभी राहते.
आत्तापर्यंत तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते पण जेव्हा ती त्या मुलाकडे नीट पाहते. तेव्हा मात्र तिचं डोकं दुखायला लागतं. " हा मुलगा आहे का माणूस...! काळसर आणि फोड्यांनी भरलेला चेहरा, लाल झालेले डोळे जणू तिला वासनेने पहात त्याच्या गालात हसू उमटले होते. ते पाहून तिने त्याच्याकडे नजर फिरवली. सोबत जे लोक होते त्यांनी तिला काही प्रश्न विचारले. स्वतःला सावरत तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मग त्या बाईने तिची ओटी भरली. तो कार्यक्रम झाल्यानंतर ती बाजूच्या रूम मधे जाऊन रडायला लागली होती.
काही वेळाने ते पाहुणे निघून जातात. रात्री उशिरा तिच्या दादाला त्यांचा कॉल येतो. " आम्हाला मुलगी पसंत आहे " ही गोष्ट तो आईला आणि तिलाही सांगतो. आता मात्र ती शांत बसत नाही. ती बोलायला लागते.
वैष्णवी : मला हे लग्न करायचे नाही.
दादा : का...? काय झालं आता...?
वैष्णवी : तुम्हीच ठरवणार आहात का सगळं, निदान तो मुलगा तरी नीट बघायचा, त्याच्याकडे बघून तुम्ही तरी कसा विचार केला की, या मुलासोबत माझं लग्न लाऊन द्यायचं...!
दादा : काय वाईट नाही आहे एवढा, आणि घरचं सर्व चांगलं आहे, काही कमी पडणार नाही तुला तिथे....
वैष्णवी : नको आहे मला बाकी काही, फक्त एकदा विचारायचं तरी की, मला तो मुलगा पसंत आहे की नाही ते... तुमचं तुम्हीच ठरवणार असाल तर करा काय करायचे ते...
* असं बोलून ती बाजूला जाऊन रडत बसते. तिची आई तिच्याजवळ जाऊन तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसत तिला बोलते.
आई : आसं नको करू बाय... एकदा लग्न मोडलं आहे तुझं, तेव्हापासून स्थळ पण येत नाहीत. लोकं नको नको ते बोलतात मग. आता हे स्थळ समोरून चालून आलं आहे. मी हात जोडते तुला, नाय नको बोलू. सगळं चांगलं होईल बघ.
दादा : शेवटचं सांगतोय तुला, एकदा नाक कापलंय आमचं, आता काही तमाशा नको आहे मला घरात, गपगुमान लग्नाला तयार व्हायचं.
* दादाचे असे बोलणे ऐकुन ती त्याच्यासमोर हात जोडुन रडत रडत बोलते.
वैष्णवी : दादा नको ना मला त्या माणसाकडे बघूनच भीती वाटत होती. मला नाही करायचं हे लग्न. प्लीज ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. थोडे दिवस तरी थांबा माझ्यासाठी... फक्त यावेळी मला थोडा वेळ द्या...🙏🏻
* तिचे बोलणे ऐकुन दादा घरातून निघून जातो. वैष्णवी मात्र खुप वेळ रडत असते. तिची आई तिला शांत करण्यासाठी प्रयत्न करते....
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️