अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३९ )
दुसऱ्या दिवशी पहाटे दिदी सर्वांच्या आधी ऊठुन आवरून किचन मधे ब्रेकफास्ट ची तयारी करत असते. अंजली पण ऊठुन आवरायला लागते. तिची अंघोळ वैगेरे झाल्यावर ती मेघाला उठवते. मेघा अंघोळीला गेल्यावर ती प्रेम आणि सिद ला उठवायला जाते. गेस्ट रूम चे डोअर नॉक करते. आतुन सिद डोअर ओपन करतो. त्याला गुड मॉर्निंग करत ती आत येते. प्रेम अजुन शांत झोपलेला असतो. त्याला असं पाहून तिला आजीच्या घरातील प्रसंग आठवतो. ती गालात हसत त्याच्या जवळ जाते. सिद बाथरूम मधे गेलेला असल्यामुळे ती त्या संधीचा फायदा घेत. आपले ओले केस त्याच्या चेहऱ्यावरून फिरवते. तशी त्याला जाग येते. तो डोळे उघडतो तशी ती पटकन त्याच्या कपाळावर किस करत त्याच्या केसातुन हात फिरवत त्याला बोलते.
अंजली : गुड मॉर्निंग... जानु...!.🥰
प्रेम : स्वीट मॉर्निंग... मेरी जान...!🥰
अंजली : झोप झाली का....?😊
प्रेम : हो...! तुझी अंघोळ पण झाली....!😊
अंजली : हो...! उठा तुम्ही पण आता...!😊
* प्रेम बेडवरून ऊठुन बसतो. तेवढ्यात सिद तिथे येतो. तो त्यांना पाहून बोलतो...
सिद : मग...! आजची मॉर्निंग जरा जास्तच गुड झाली ना...!😊
अंजली : खरं सांगायचं तर... हो...! नक्कीच. 😊
सिद : छान...! बरं... आजचा काय प्लॅन आहे. कुठे बाहेर जायचं वगैरे नाही का...?
अंजली : एवढ्या उशिरा उठलात तर कसं कुठे जाता येईल.
* हे लोक बोलत असतात तेवढ्यात मेघाही तिथे येते.
आणि मग तिची बडबड चालु होते. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर प्रेम आणि सिद पण अंघोळ वगैरे करून तयार होतात. दिदिने आज नाष्ट्याला सर्वांसाठी ब्रेड आम्लेट बनवलेले असते. सर्वजण त्यावर ताव मारून बाहेर फिरायला जातात. बाहेर गर्मी खुप असल्यामुळे फिरताना थोडेसे त्रस्त होतात. मग लगेच परत घरी येतात.
दुपारचे जेवण वगैरे झाल्यावर थोडा वेळ आराम करून संध्याकाळी पुन्हा ते फिरायला बाहेर पडतात. मेघा चे जीजू सर्वांना त्यांच्या नवीन गोल्ड शॉप वर घेऊन जातात. दोन दिवसातच त्या शॉपचे ओपनिंग असल्यामुळे तिथे अजुन इंटेरियर चे काम चालू होते.
तिथे थोडा वेळ थांबुन रात्री येताना सर्वजण बाहेरच एका इंडियन रेस्टॉरंट मधे जेवण करून घरी येतात.
दुसऱ्या दिवशी ते लोक एका बीच रिसॉर्ट ला जातात. खुप सुंदर असं रिसॉर्ट होतं ते, आणि समोरच असणारा अथांग निळसर समुद्र. अगदी स्वच्छ असा बीच पाहून सर्वाँना कधी एकदा पाण्यात जातोय असं झालं होतं. कपडे वैगेरे चेंज करून सर्वजण समुद्रातील लाटांचा आनंद घेत असतात. अंजली प्रेम सोबत तिथे खुप एन्जॉय करते. खुप वेळ पाण्यामध्ये मस्ती करून झाल्यावर तिथून रिसॉर्ट मधे येऊन तिथल्या स्विमिंग पुल ची पण मजा घेतात.
दुपारचे जेवण वैगेरे करून तिथे थोडा वेळ आराम करून संध्याकाळी उशिराच घरी येतात.
आज जीजू त्यांच्या शॉप च्या कामात थोडे बिझी असल्यामुळे ते आले नव्हते. ते रात्री उशिराच घरी आले. सर्वांनी जेवण वैगेरे आवरून दुसऱ्या दिवशी असणाऱ्या शॉप च्या ओपनिंग ची तयारी करू लागतात.
आज शॉप चे ओपनिंग होते. सर्वजण छान तयार होऊन तिथे पोचतात. खुप सुंदर फुलांनी सजवलेल्या दुमजली शॉपच्या उद्घाटन समारंभासाठी खुप पाहुणे वैगेरे आलेले होते. प्रमुख पाहुणे म्हणुन एक अरब व्यक्ती आली होती, नंतर त्यांच्याबद्दल असं समजलं की, त्यांनीच मेघाच्या जिजुना हे शॉप ओपन करून दिलं होतं. कारण जिजुचे वडील खुप वर्ष त्यांच्या स्वतःच्या शॉप मधे कामाला होते. त्यांनी नंतर त्यांनी जिजुंना पण इकडे बोलवून घेतले. गेली काही वर्ष जिजु त्यांच्याच शॉप मधे काम करत होते. जिजुंना स्वतःचे घर घ्यायला मदत केली. आणि आता हे त्यांच्या स्वतःच्या मालकीचे गोल्ड शॉप ओपन करून दिले.
खरच भारी वाटलं... ते समजल्यावर. एका अरब व्यक्तीने त्यांच्यासाठी इतकं सर्व केलं होतं. उद्घाटनाच्या वेळी पण ते स्पष्ट हिंदी मधे बोलत होते.
ते जिजुंचे खुप कौतुक करत होते. त्यांना... हा माझा दुसरा मुलगाच आहे, असे बोलुन सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
खुप छान समारंभ चालु होता. खुप भारतीय गेस्ट येत होते. त्यांना बुके देऊन शुभेच्छा देत होते.
प्रेम, अंजली, सिद आणि मेघा या समारंभाचा आनंद घेत होते. थोड्या वेळाने ते चौघेही पुढे जाऊन जिजु आणि दिदी ला एक बुके आणि त्यांच्यासाठी इंडिया वरून आणलेली श्री. कृष्णाची फ्रेम देऊन त्यांना शुभेच्छा देतात. त्यांच्यासोबत काही फोटो काढतात. सिद पण त्याने आणलेल्या कॅमेऱ्यात काही फोटो क्लिक करून घेतो.
हळू हळू लोकांची गर्दी थोडी कमी होते. ते प्रमुख पाहुणे म्हणुन आलेले व्यक्ती पण जायला निघतात. मग जीजू एक एक करून या सर्वांची त्यांना ओळख करून देतात. ते निघताना बोलतात की, "कल शाम को, सब को डिनर पे लेकर आना घर पर, अपने शॉप की ओपनिंग पार्टी करेंगे"
जिजु त्यांना होकार देऊन त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला जातात. त्यांना सोडुन आल्यावर ते चौघांना पण शॉप च्या आत घेऊन जातात. तिथे ते प्रत्येकाच्या हाती एक एक गिफ्ट बॉक्स देतात. आणि त्यांचे आभार मानतात.
सर्व फंक्शन आवरून रात्री घरी येताना ते सर्व बाहेरच एका हॉटेल मधे जेऊन येतात. फ्रेश होऊन सर्व गेस्ट रूम मधे गप्पा मारत बसलेले असतात. मेघा त्यांना दिलेले गिफ्ट चे बॉक्स बॅग बाहेर काढून सर्वांना ओपन करायला देते. सर्वजण आपापले बॉक्स ओपन करतात. प्रत्येक बॉक्स मधे एक छोटीशी गोल्ड चैन असते. ते पाहुन सर्वच जीजुकडे रोख करतात...
अंजली त्यांना ते बॉक्स दाखवत बोलते....
अंजली : हे काय आहे जिजु....?
जिजु : हे तुम्हा सर्वांच रिटर्न गिफ्ट...!😊
अंजली : पण हे....! इतकं महागडं गिफ्ट...! याची काय गरज होती...?
* तेवढ्यात दिदी बोलते....
दिदी : अगं...! तुम्ही सर्वजण एवढ्या लांबुन इथेपर्यंत आला आहात आमच्यासाठी, मग... हे छोटसं गिफ्ट आमच्याकडून...😊
अंजली : अरे पण....!
दिदी : पण बिन काही नाही...! सर्वांनी घालुन बघा बरं, आणि आवडलं की नाही ते सांगा, कारण डिझाइन मी सिलेक्ट केलेत....😋
* सर्वजण आपापल्या गोल्ड चैन काढून गळ्यात घालतात. मेघा अंजुला त्यासाठी मदत करते.
जिजु आणि दिदीला सर्वजण थॅन्क्स बोलतात.
दिवसभरातील थकव्यामुळे सर्वच आज लवकर झोपी जातात.
दुसऱ्या दिवशी शॉपिंग चा प्लान असतो. सकाळी सर्व आवरून दिदी त्यांना एका भव्य अशा मॉल मधे घेऊन जाते. एका कपड्यांच्या शॉप मधे ते लोक जातात. प्रत्येकजण काही ना काही घेत असतो. प्रेम मात्र त्यांच्या किमती पाहून गप्प बसतो. तेवढ्यात अंजली तिथे एक जॅकेट घेऊन येते आणि त्याला दाखवत बोलते.
अंजली : छान आहे ना...?
प्रेम : हो...! पण तुला थोडं मोठे होईल. 😊
अंजली : अरे पागल...! मी तुझ्यासाठी बोलतेय.😊
प्रेम : मला....! नको...!
अंजली : असं काय करतोय प्रेम...! आपण नेहमी येणार आहोत का इकडे, इथली एक आठवण म्हणुन तरी घे. 😔
प्रेम : कितीला आहे ते...?🤔
अंजली : तु फक्त सांग की, तुला आवडलं ना..? हवं तर घालुन बघ. 😊
* असं बोलुन ती ते जॅकेट प्रेमला घालायला लावते. त्याच्याकडे पाहून ती बोलते...
अंजली : एकदम परफेक्ट... मेरे जानु,... आप तो एकदम डॅशिंग हिरो लग रहे हो...😊
* प्रेमला माहित होतं की, ती काही ऐकणार नव्हती, त्यामुळे तो जास्त काही न बोलता ते एक्सेप्ट करतो.
त्याच्या जॅकेट ला मॅच होईल असं एक लेडीज जॅकेट ती स्वतःसाठी पण घेते. त्यांना पाहून मग मेघा आणि सिद पण त्यांच्यासारखेच जॅकेट खरेदी करतात. सोबत अजूनही काही शॉपिंग चालू होती.
प्रेम त्या शॉप मधे फिरत असताना त्याची नजर एका शाल वर जाते. मग त्याला आठवतं की मॉम साठी काहीतरी घ्यायचं होतं. मग तो ती शाल खरेदी करतो.
सर्वांनी पैसे एक्सचेंज करून आणले होते. प्रत्येक जण आपापले पैसे देतात. अंजली त्यांच्यासाठी घेतलेल्या कपड्यांचे बिल पेड करते. शाल चे पैसे मात्र प्रेम स्वतःकडचे देतो.
सर्वांची शॉपिंग झाल्यावर, खुप वेळ मॉलमध्ये टाईमपास करतात, काही फोटो वगैरे काढून झाल्यावर मग थोडी पेटपूजा करून सर्व घरी येतात.
संध्याकाळी प्रेम कॉफीचा कप घेऊन बाल्कनी मधे उभा असतो. त्याला पाहून अंजली त्याच्याजवळ जाऊन बोलते.
अंजली : काय रे....! काय झालं...? असा एकटाच का इकडे येऊन उभा आहेस...?
प्रेम : काही नाही...! असच...!😊
अंजली : कसला विचार करतोय प्रेम....?
प्रेम : काही नाही गं...! कधी कधी आपण स्वप्नात पण जो विचार करत नाही, त्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात घडतात तेव्हा त्यावर विश्वास ठेवणं जरा अवघड जातं. 😊
अंजली : म्हणजे...! मला कळलं नाही...!
प्रेम : आता हेच बघ ना...! खरं तर माझ्यासोबत जे घडतंय त्याचा विचारच काय पण या गोष्टी मी कधी स्वप्नात पण पाहिल्या नव्हत्या. पण त्या खऱ्या आहेत. मी दुबई मधे एक उंच बिल्डिंगच्या एकविसाव्या मजल्यावर बाल्कनी मधे कॉफी पित आहे, ती पण माझ्या गर्लफ्रेंड सोबत....😋 हे पचायला जरा कठीण आहे ना...! आणि हे जर मी इंडियात जाऊन कोणाला बोललो तर... वेड्यात काढतील मला...😋
अंजली : प्रेम....! असं का बोलतोय तु...? का नको ते विचार तुझ्या डोक्यात येतात कळत नाही मला...! आणि हे बघ...! दुसऱ्याचं मला माहित नाही, पण हो मी हे क्षण तुझ्यासोबत खुप एन्जॉय करतेय. आणि तू ही ते एन्जॉय करावं असं मला वाटतं...! सो प्लीज...!😔
प्रेम : बरं... ओके. आय एम सॉरी...! लेट्स एंजॉय...😊
* असं बोलुन तो तिच्या हातातील कॉफीच्या कप ला आपला कप टच करून चिअर्स करतो. तिच्या खांद्यावर हात टाकून ते दोघं बाल्कनी मधुन दिसणारा संध्याकाळच्या दुबईचा नजारा पहात असतात.
हे सर्व चालु असताना त्यांच्या नकळत मेघा सिद ला बोलवून त्याला त्या दोघांचे बाल्कनी मधील ते क्षण कॅमेऱ्यात कैद करायला सांगते.
आज रात्री डिनर साठी त्या शेख साहेबांच्या घरी जायचं असतं. त्यासाठी सर्वांची तयारी चालु असते.
जिजु शॉप वरून डायरेक्ट तिकडे येणार होते. त्यामुळे सर्वजण कॅब करून त्यांच्या आलिशान बंगल्यावर पोचतात. खरं तर बंगला हा शब्द खुप छोटा होता त्या घरासाठी, कारण पिक्चर मधे दाखवतात तशी शानदार हवेली होती ती. कॅब गेट मधुन आत जाताच समोर दिसणारा नजाराच तसा होता.
ती एक व्हाईट कलर ची सुसज्ज हवेली. बाहेर पार्किंग मधे दोन महागड्या गाड्या उभ्या होत्या.
गाडीतून सर्वजण उतरतात तसे त्यांचे वेलकम करण्यासाठी ती अरब व्यक्ती स्वतः दरवाज्या मधे येऊन उभी होती. एवढी श्रीमंत व्यक्ती असुन त्यांना कोणताही गर्व नव्हता. पुढे येऊन त्यांनी दिदी च्या छोट्या मुलीला उचलुन कडेवर घेतले. ते पाहुन प्रेमला त्यांचा अजुनच आदर वाटू लागला होता.
सर्वजण त्यांच्या पाठोपाठ आत जातात. आतमधे जाताच ती सुंदर सुशोभित हवेली पाहून सर्व थक्क होऊन जातात. श्रीमंती काय असते याचं एक जित जागतं उदाहरण त्यांच्यासमोर होते. प्रत्येकजण स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालत त्या हवेलीच्या सुंदरतेला डोळ्यात साठवत होते.
मेन हॉल मधे मध्यभागी असलेल्या कोच वर सर्वजण बसतात. ते अरब गृहस्थ पण तिथेच त्यांच्यासोबत बेबीला घेऊन बसतात. तेवढ्यात त्यांचा एक नोकर सर्वांसाठी ट्रे मधे पाणी व काही ड्राय फ्रुट घेऊन येतो.
मध्यभागी असलेल्या काचेच्या टेबलवर ठेऊन तो निघुन जातो. प्रेम आणि सिद तो पाण्याचा ग्लास घेऊन थोडं पाणी पिऊन ग्लास पुन्हा टेबलवर ठेऊन देतात. ते गृहस्थ सर्वांना ड्रायफ्रुट खाण्यासाठी आग्रह करतात. म्हणुन सर्वजण थोडे थोडे बदाम हातात घेऊन एक एक करून खाऊ लागतात.
थोड्या वेळात त्यांच्या पत्नी व सून तिथे येतात. दिदी ला ते आधीपासून ओळखत असल्यामुळे दिदी या सर्वांची ओळख करून देते.
त्यांच्या शुद्ध हिंदी बोलण्यावरून व सर्वांची विचारपूस करण्यावरून ते खूपच साधे आणि मनमिळाऊ होते असे जाणवत होते. हळू हळू त्यांच्यासोबत सर्वजण गप्पा मारू लागले होते. मेघा त्यांना खुप प्रश्न विचारत होती. ते पण त्याची हसत हसत उत्तर देत होते. तासाभरात गप्पा अजुनच रंगल्या होत्या.
मग जीजू आणि त्यांचा मित्र म्हणजे त्या अरब व्यक्तीचा मुलगा दोघेही सोबतच घरी येतात.
जिजु त्यांच्याशी पण सर्वांची ओळख करून देतात.
डिनर ची तयारी वरती टेरेस वर चालु असते. सर्वजण तिथे पोचतात. खुप छान असं गार्डन टेरेस सजवलेलं होतं. एका टेबल वर छान असा केक ठेवला होता. पुढे एक डायनिंग टेबल होता त्यावर सर्व जेवण अगदी रेडी करून ठेवलं होतं. अगदी फाइव स्टार हॉटेल मधील फिलिंग येत होते.
सर्वात आधी जिजु आणि दिदी केक कटिंग करतात. सर्वजण टाळ्या वाजवत पुन्हा त्या दोघांचे अभिनंदन करतात. सिद तिथे सर्वांचे काही फोटो क्लिक करतो.
सर्वजण मग डिनर टेबल कडे जातात. त्यांचा एक नोकर ट्रे मधे वाईन चे ग्लास घेऊन येतो आणि सर्वांना ते घेण्यासाठी आग्रह करतो. सर्वजण ते ग्लास हातात घेऊन आनंदाने चिअर्स करतात.
डिनर साठी व्हेज नॉनव्हेज दोन्हीही होते. बिर्याणीसोबत नान, रोटी, ब्रेड , असं खुप काही असतं.
सर्वजण आपल्याला जे काही हवं ते काढून आपल्या ताटात घेत होते. प्रेम मात्र थोडा गोंधळलेल्या अवस्थेत होता. ते पाहुन अंजली त्याच्या ताटातील बाऊल मधे थोडे चिकन सुप वाढून घेते.
मधे मधे वाईन चा घोट पित ते चिकन सुप पित होता. नंतर थोडी तंदुरी फ्राय चे पिस घेऊन ते खाऊ लागला होता. ते थोडं तिखट असल्यामुळे त्याने पाण्याऐवजी समोरील वाइन चा ग्लास रिकामा केला होता. मग त्यांचा नोकर तो ग्लास पुन्हा भरत होता. तंदुरी खूपच टेस्टी लागत होती, म्हणुन त्याने पुन्हा काही पिस आपल्या ताटात घेतले आणि ते खाऊ लागला. मग थोडी रोटी, चिकन मसाला, बिर्याणी... आजचा डिनर म्हणजे एकदम सर्व हाऊस फुल झालं होतं.
सर्वजण एकदम ताव मारून जेवले होते. जेवणानंतर थोडा वेळ गप्पा मारून घरी जाताना.. "खुप छान डिनर झाला" असं बोलुन प्रेम ने त्या सर्वांचे आभार मानले. निघताना त्यांनी सर्वांना एक एक असे ड्रायफ्रुट चे गिफ्ट पॅक आणि सोबत काही चॉकलेट दिले. " पुन्हा कधी आलात दुबई मधे तर नक्की घरी या मला भेटायला, आणि तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटलं." असं हिंदीमध्ये बोलुन ते व्यक्त झाले.
त्या फॅमिली चा निरोप घेऊन ते सर्व घरी जायला निघाले. रात्र खुप झाली होती. जिजूंच्या गाडीमध्ये सर्वजण बसू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी ड्रायव्हर ला सांगुन त्यांची आलिशान मर्सिडिज गाडी पाठवली. सिद आणि प्रेम त्यांच्या त्या आलिशान गाडीतुन घरी आले. मेघा आणि अंजू जिजूंच्या गाडीमधून आले.
आजचं जेवण सर्वांनाच जरा जास्तच झालं होतं. सोबत वाईन होती, त्यामुळे सर्वांना सुस्ती आली होती.
वरती जाताना लिफ्ट मधे हाच विषय चालु होता.
घरी गेल्यावर सर्वजण आवरून लगेच झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी जिजुंनी शॉप मधुन सुट्टी घेतली होती. ते सर्वांना घेऊन लंच साठी दुबई मधील सर्वात मोठे हॉटेल बुर्ज अल अरब मधे येतात. समुद्रात आत मधे थोड्याशा अंतरावर असलेल्या या सेवन स्टार हॉटेल मधे जाण्याचं स्वप्न दुबईला जाणाऱ्या प्रत्येकाच असतं. पण नकळत प्रेम ते न पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात जगत होता.
हॉटेल च्या गेट मधुन आतमध्ये जाताच त्यांचे वेलकम ड्रिंक आणि स्नॅक्स म्हणजे ओली खजुर देऊन स्वागत केले जाते. त्याचा आस्वाद घेत समोरील वॉटर फाऊंटन पाहून सर्वांचे डोळ्यांचे पारणे फिटते. इतकं सुंदर होतं ते. आणि बाकीचे इंटेरियर तर,अगदी विचार करण्यापलीकडचे होते. कारण जिकडे पाहाल तिकडे सर्व गोल्ड दिसत होते. त्या सर्व गोष्टींचा आनंद घेत ते सर्व साईड च्या जिन्यावरुन वरती जातात.
ते सर्व हॉटेल फिरण्यातच चार तास निघुन जातात. तिथून ते जुमेराह बीच वर जाऊन तिथे खुप साऱ्या वॉटर अँक्टिव्हिटी करत एंजॉय करतात. रात्री बाहेरच डिनर करून उशिरा ते सर्व घरी येतात.
पुढील दोन दिवस पण ते सर्वजण दुबई फिरून एंजॉय करतात. आणि अखेरीस परतीच्या प्रवासाचा दिवस येतो.
दिदी आणि जिजुंचे आभार मानून ते एअरपोर्ट वर पोचतात. तिथल्या सर्व प्रोसेस पूर्ण करून फ्लाईट मधे आपापल्या सीट वर जाऊन बसतात.
गेले आठवडाभर सर्वांनी खुप एन्जॉय केला होता. अंजली साठी तर हे दिवस तिच्या आयुष्यातले खुप आनंदी क्षणांचे होते.
फ्लाईट दुबई वरून टेक ऑफ होते. प्रेम पुन्हा एकदा विमानातून दुबईला पहात होता. आणि मनात हाच विचार करत होता की, पुन्हा कदाचित हे दिवस, हे सुखद क्षण आयुष्यात येतील की नाही माहित नाही.
अंजली त्याच्या बाजुला त्याचा हात हातात घेऊन त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पहात होती.
हा प्रवास संपूच नये असं तिला मनोमन वाटत होतं.
पण वेळ कोणासाठी थांबत नाही. पुढील काही तासांतच फ्लाईट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर लँड होत होती.
मुंबई एअरपोर्ट वरील सर्व प्रोसेस पुर्ण करून, आपापल्या बॅग घेऊन सर्वजण बाहेर पडतात.
तिथून कॅब घेऊन ते घरी यायला निघतात. सिद पुढे ड्रायव्हर सोबत बसलेला असतो. हे तिघेजण मागे बसतात. वाटेत मेघाची बडबड चालु असते.
मेघा : फायनली आपली ट्रिप कंप्लीट झाली. आणि थॅन्क्स प्रेम तु आलास म्हणुन अजून मजा आली.
प्रेम : अरे...! थॅन्क्स तर मी तुम्हाला बोलायला हवं, कारण एक ड्रीम पूर्ण झाल्यासारखं वाटलं. तेही तुम्हा सर्वांमुळे.... म्हणुन थॅन्क्स टू यु... ऑल....😊
मेघा : अरे...! एवढं काय त्यात...! आपण पुन्हाही जाऊ कधीतरी असच एकत्र.... नक्की. 😊
प्रेम : हो... नक्कीच जाऊ...!👍🏻
* अंजली जास्त काही बोलत नव्हती पण त्याच्या बाजुला बसुन त्याचा सहवास पूर्णपणे ती एंजॉय करत होती.
तासाभरातच ते सर्व प्रेमच्या घराजवळ पोचतात. तो गाडीतुन उतरतो. त्याच्या पाठोपाठ अंजली पण बाहेर येत असते, पण तिला तिथे कोणी पाहू नये म्हणुन तो तिला बाहेर यायला नको बोलतो.
गाडीच्या डिकी मधून तो त्याची बॅग आणि सॅक काढून घेतो. सर्वांना हात मिळवून त्यांना बाय करतो.
गाडी टर्न मारून चालली होती. याप्रसंगी अंजलीला खुप वाईट होते. पण स्वतःची समजूत काढत, त्याच्याकडे पाहत त्याला बाय करते.
गाडी तिथून निघते आणि ते सर्व अंजलीच्या सोसायटी मधे पोचतात. तिथून मेघा आणि सिद आपापल्या घरी जातात. अंजली पण बॅग घेऊन लिफ्ट मधुन वरती येते. डोअर बेल वाजवते. मॉम दरवाजा ओपन करतात. तशी ती आत जाऊन मॉम ला मिठी मारत बोलते."आय मिस यू मॉम"....😔
थोडा वेळ तिला तसच मिठीत घेऊन मॉम तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला बोलतात.
"आय अल्वेज मिस यू बच्चा..."
मग तिची बॅग आत घेऊन दरवाजा बंद करतात.
अंजली सोफ्यावर जाऊन पाणी पित बसलेली असते.
तिच्या डोळ्यांसमोरून मागील आठवडाभरातील सर्व गोष्टी जात असतात. त्यामध्ये ती गुंग होऊन गेली होती.
मॉम तिच्याजवळ जाऊन तिला थोडं हलवून बोलतात.
मॉम : काय झालं...! अजुन तिकडेच आहात का...? 😊
* पाण्याची बॉटल टेबल वर ठेवत ती मॉम कडे बघून एक गोड स्माइल करते आणि बोलते....
अंजली : थॅन्क्स मॉम....!😊
मॉम : अच्छा....! कशाबद्दल....?🤔
अंजली : फॉर एव्हरिथींग....!😊
मॉम : बरं...! भावना पोचल्या...! उठा आता फ्रेश होऊन घ्या. मी ह्यांना कॉल करते तू घरी पोचली म्हणून....
* अंजली फ्रेश होऊन येते... आणि मग गेल्या आठवडाभरातील सर्व काही मॉम ला सांगत असते....
इकडे प्रेम घरी पोचलेला असतो. फ्रेश होऊन तो बॅग मधील कपडे व बाकी सर्व सामान बाहेर काढून ठेऊन देतो. त्यातील ड्रायफ्रुट आणि चॉकलेट ची बॅग काढून तो ताईला देतो. दीदीने दिलेली चैन चा बॉक्स आणि पासपोर्ट काढून तो कपाटात ठेवतो.
बॅग ला लावलेला एअरपोर्ट चा टॅग काढून तो बॅग रिकामी करून त्याच्या मित्राला परत करून येतो.
खुप दिवसांनी आज क्रिकेट खेळायला मिळणार म्हणून तो संध्याकाळी मैदानात जातो.
आज रात्री दोघांनाही लवकर झोप येत नव्हती. रात्रीचे अकरा वाजून गेलेले असतात.
प्रेमच्या मोबाईल वर अंजलीचा मॅसेज येतो....
अंजली : थॅन्क्स....! मेरे जानु....😊
प्रेम : अच्छा....! का बरं....?😊
अंजली : गेल्या आठवडाभरातील तु दिलेल्या त्या गोड क्षणांसाठी....😊
प्रेम : अच्छा....! मग सेम टू यु.....!😊
अंजली : असाच नेहमी सोबत राहशील ना.... आयुष्यातील माझ्या प्रत्येक प्रवासात....!😊
प्रेम : तुझी सोबत असेल आणि प्रवास इतका सुंदर असेल तर का नाही आवडणार मला तुझ्यासोबत त्या प्रवासाचा आनंद घ्यायला... मी नेहमी तुझ्यासोबत असेन.
* पुढील काही वेळ या रोमँटिक गप्पा चालु असतात. मग रात्री उशिरा दोघेही झोपुन जातात.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️