अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३५... )
पुढचे काही दिवस ते दोघे अधुन मधुन भेटत असतात. एप्रिल महिन्यात प्रेम त्याच्या गावी जाऊन येतो. अंजली पण तिच्या मॉम सोबत तिच्या आज्जीकडे गोव्याला जाऊन येते.
तिचे आता बारावीचे वर्ष असते, जुन महिना चालु झाला होता. थोड्याच दिवसात तिचे कॉलेज चालू होणार होते. आणि प्रेमचा वाढदिवस पण जवळ आला होता.
त्या आधी ते दोघे एकदा भेटले....
प्रेम : अंजु...! तुझं हे वर्ष खुप महत्वाचं आहे. थोड्या दिवसांनी कॉलेज चालू होईल. 😊
अंजली : अच्छा....! म्हणजे नवीन नियम, अटी...! हो...ना...! 😔
प्रेम : अरे...! मी काय बोलतोय ते तरी आधी ऐकुन घे. 😊
अंजली : मला चांगलं माहीत आहे तू काय बोलणार आहेस ते....!😔
प्रेम : अच्छा...! हुशार आहेस...! म्हणजे यावेळी पुन्हा सांगायची गरज नाही... हो... ना...!😊
अंजली : बस् झालं तुझं...! मी यावेळी काहीही ऐकुन घेणार नाही. लास्ट टाईम झालं तेवढं पुरे झालं. आता नाही. 😔
प्रेम : अरे...! ऐक तरी, मी काय बोलतोय ते...!😊
अंजली : प्रेम...! मी बोलले ना तुला, मला काही ऐकायचं नाही. अजुन कॉलेज चालू पण नाही झालं, लगेच तुझं चालू झालं. माझा मी करते ना अभ्यास वेळेवर, मग कशाला ही बंधनं हवीत. माझा कोणी विचारच करत नाही. 😔
* प्रेम तिला जवळ घेत बोलतो....
प्रेम : अरे....! असं कोण बोललं...? आणि मी अजुन काहीच बोललो नाही. तुझं तूच बोलतेय सर्व...!😊
अंजली : हो...! कारण मला महितीय ना तु याशिवाय दुसरं काय बोलणार. 😔
प्रेम : अच्छा...! पण मी तर दुसरं काहीतरी बोलणार होतो...😊
अंजली : काय...?🤨
प्रेम : आय लव यू.... मेरी जान...!😊
* ते ऐकुन अंजली प्रेमला घट्ट मिठी मारते...
अंजली : मी नाही राहु शकत तु्झ्याशिवाय प्रेम...!😔
प्रेम : हो...! माहित आहे मला...! 😊
अंजली : माहित आहे ना...! मग... कशाला हे सर्व करायला हवं...? मी आता लहान आहे का...? मला पण कळतंय सर्व...! मी करेन मॅनेज सर्व नीट. तु नको काळजी करू. 😔
प्रेम : बरं... ओके...! तु बोलते तसं करू...! मग तर झालं. आता तरी जरा स्माइल कराल का...?😊
अंजली : हो....!😊
प्रेम : बघ...! आता किती गोड दिसतेय माझी परी. 😊
अंजली : हो...! फक्त आणि फक्त तुझी परी....!😘
* असं बोलुन ती प्रेमला गालावर किस करते...
प्रेम : बरं आता तु सांग कसं असेल शेड्युल...? 😊
अंजली : अच्छा...शेड्युल....काय....! 😊 सर्वात आधी तर तुमचा बर्थ डे मला छान सेलिब्रेट करायचा आहे. मग तिथून पुढे बाकी सर्व...😊
प्रेम : अरे....! तो तर दरवर्षी येतो. आणि दरवेळी तो आपण छानच सेलिब्रेट केलाय...! हो की... नाही ?😊
अंजली : हो...! पण मला तुझा येणारा प्रत्येक वाढदिवस हा अजुन छान सेलिब्रेट करायला आवडेल. 😊
प्रेम : बरं... ओके...! मग तिथून पुढे काय...?🤔
अंजली : ते आपण त्यानंतर ठरवू....,😋
प्रेम : अच्छा...! ठिक आहे मॅडम. 😊
* प्रेम चा वाढदिवस जवळ आलेला असतो. अंजली त्याच विचारात असते की, यावेळी वेगळं काय करता येईल की, त्याचा वाढदिवस स्पेशल होईल. खुप विचार करून सुद्धा तिला काही सुचत नाही. शेवटी ती एक प्लॅन करते. नेहमीप्रमाणे ती प्रेमला त्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगते. वाढदिवसाच्या आधीच ती त्याच्यासाठी खुप अशी शॉपिंग करते. शर्ट, टी शर्ट, जीन्स, शूज, परफ्यूम वगैरे वगैरे...
तिच्याकडून तो ते सर्व घेणार नाही म्हणुन ती ते सर्व गिफ्ट त्याच्यापर्यंत सिद कडून पोचवते.
अखेरीस तो दिवस येतो. सकाळी लवकर उठून, अंघोळ करून तो देवपूजा करतो. अंजलीने पाठवलेले कपडे घालुन छान परफ्यूम मारून तो तयार होतो. ताई त्याचे औक्षण करते. तिच्या पाया पडून, ताईला सांगून तो त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी अंजलीला भेटण्यासाठी पोचतो.
अंजली पण मॉम ला सांगुन घरातून निघते. प्रेम स्टेशन ला ठरलेल्या ठिकाणी तिची वाट पहात उभा असतो. अंजली जाताना एक छान गुलाबाचे फुल घेऊन गुपचूप तिथे पोचते. पाठीमागून त्याच्या खांद्यावर हळूच थाप मारते... तसा प्रेम मागे वळतो. त्याच्या हातात ते गुलाबाचे फुल देऊन त्याला आनंदाने मिठी मारत ती बोलते.
अंजली : हॅप्पी बर्थ डे जानु....😊 मेनी मेनी रिटर्न ऑफ द डे....,😊 आणि आय लव यू... सो मच...!😘
* असे बोलत ती त्याच्या गालावर किस करते.... प्रेम तिला समोर उभी करून बोलतो.
प्रेम : थॅन्क्स मेरी जान... फॉर धिस ब्युटीफूल गिफ्ट. 🌹
अंजली : अच्छा...! आवडलं...!😊
प्रेम : हो...! 😊
अंजली : तसं आज एकदम हिरो दिसताय मिस्टर प्रेम...👌🏻🥰
प्रेम : अच्छा...! खरच का...? 😊
अंजली : हो... तर ...! मी यायच्या आधी किती मुली घायाळ झाल्या असतील तुला पाहून....🥰
प्रेम : मी मोजल्या नाही....😋
अंजली : बरं झालं... नाही मोजल्या...,,नाहीतर ..!😊
प्रेम : नाहीतर काय.....? 🤔
अंजली : नाहीतर.... एखादी गळ्यात येऊन पडली असती. 😊
प्रेम : हो...! पडली ना..एक ! आताच...😋
अंजली : अच्छा....! म्हणजे मी ना...!,😊
प्रेम : मग अजुन कोण...? 😊
अंजली : मी तर कधीपासूनच पडलेय तुझ्या गळ्यात पण आणि तुझ्या प्रेमात पण....🥰
प्रेम : बरं...! आता बोला... काय प्लॅन आहे आज...?
अंजली : हो ना अरे...! काहीच सुचत नव्हतं. मग म्हटलं यावेळी तुला विचारून प्लॅन करू...😋 तू बोल काय करायला आवडेल तुला आज...! आज तु बोलशील तसं...! बर्थ डे बॉय...😊
प्रेम : तसं तर मी पण काहीच प्लॅन नाही केलं, पण चल आज छान दिवस आहे. बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करू... चालेल तुला...?😊
अंजली : का नाही चालणार...! आज तुला आवडेल तेच करायचं... मी ठरवलंय....! 😊
प्रेम : अच्छा....! चला मग... तिकीट काढू...😊
अंजली : चला....😊
* ते दोघे ट्रेन चे तिकीट काढून दादर ला पोचतात. स्टेशन वरून टॅक्सी करून सिद्धिविनायक मंदिरात येतात. तिथे एका स्टॉल मधे सँडल व शुज काढून पूजेचे ताट घेऊन दोघे दर्शनाच्या रांगेत उभे राहतात.
थोडीफार गर्दी होती पण तासाभरातच त्यांचे दर्शन होते. तिथून दोघेही बाप्पाच्या समोरच असलेल्या गॅलरी मधे येऊन बसतात.
प्रेम दोन्ही हात जोडुन बाप्पाकडे एकटक डोळे भरून पाहत असतो. मनातल्या मनात काहीतरी प्रार्थना करत असतो. अंजली त्याच्याकडे पाहून बापाकडे पहात मनोमन त्याला एकच प्रार्थना करते. " बाप्पा मला स्वतःला असं काही मागायचे नाही तुझ्याकडे, पण आज प्रेम जे काही तुझ्याकडे मागत असेल ते सर्व तु त्याला दे... अगदी माझं आयुष्य पण त्याला लाभु दे. आणि त्याला नेहमी असच आनंदी ठेव. एवढच माझे तुझ्याकडे मागणे आहे. "🙏🏻
थोडा वेळ तिथे थांबुन दोघे तिथून बाहेर पडतात. दुपारचे एक वाजलेले असतात. मग तिथेच जवळ असलेल्या एका हॉटेलमधे ते लंच करतात.
पुढे काय करायचं हे ठरवून ते दोघे तिथून टॅक्सी करून जुहू ला इस्कॉन मंदिरात येतात. अंजली पहिल्यांदाच या मंदिरात आली होती. राधा कृष्णाचे लोभस रूप पाहून ती भारावून गेली. तिला मंदिर खुप आवडले. दर्शन घेऊन ते दोघे तिथून जुहू बीचवर पोचले. संध्याकाळ पर्यंतचा वेळ त्यांनी तिथे एकमेकांच्या सहवासात घालवला.
अंधार पडायला लागताच ते दोघे तिथून पुन्हा घरी यायला निघाले.
इकडे सिद, मेघा आणि त्यांचे मित्र त्या दोघांची वाट पहात होते. अंजलीने सांगितल्या प्रमाणे सिद आणि मेघाने त्याच्या बर्थ डे सेलिब्रेशन ची पुर्व तयारी करून ठेवली होती.
एका छान हॉटेल मधे बर्थ डे सेलिब्रेशन सोबत डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. रात्रीचे आठ वाजलेले होते. अंजली प्रेम सोबत तिथे पोचते. जमलेले सर्वजण प्रेमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. थोड्या वेळात टेबलावर छान केक येतो. प्रेम तो केक कापून आधी अंजली मग इतर सर्वांना भरवतो. अंजली पण त्याला केक भरवते. सर्वांनी काही ना काही गिफ्ट आणलेले असते. प्रत्येक जण आपापले गिफ्ट देऊन प्रेमला शुभेच्छा देतात.
नेहमी प्रमाणे मेघा अंजलीला थोडी चिडवत असते,
मजा मस्ती चालू असते, तेवढ्यात एक वेटर ड्रिंक्स आणि स्नॅक्स घेऊन येतो. ते एन्जॉय करत सोबत डिनर करून ते सर्व तिथून निघतात.
हॉटेल चे बिल खूपच जास्त आले होते. प्रेम जवळ एवढे पैसे नव्हते हे अंजलीला माहित होते. तिने पटकन पर्स उघडून त्यातील पैसे काढून वेटर कडे दिले.
हॉटेल मधुन सर्व बाहेर पडतात आणि घरी जायला निघतात. प्रेमला पण उशीर झालेला असतो. इकडे आरव आणि त्याचे मित्र त्याची वाट पहात असतात.
तो तिथुनच सर्वांना बाय करून ऑटो ने घरी यायला निघतो. त्याला दिलेल्या गिफ्ट च्या बॅग त्याच्या हातात देत अंजली त्याला बोलते.
अंजली : सर्वांनी तुला गिफ्ट दिलं, मीच काही दिलं नाही. 😊
प्रेम : अच्छा...! अजुन काय द्यायला हवं...! 😊
अंजली : अजुन ना...हे...! 😘
* ऑटो मधे बसलेल्या प्रेमच्या गालावर किस करत ती त्याला बाय करून सिद आणि मेघा सोबत घरी निघुन जाते.
प्रेम घरी पोचतो. गिफ्ट च्या बॅग बेडवर ठेऊन तो फ्रेश होऊन थोडा वेळ बसलेला असतो, तेवढ्यात आरव आणि रमेश तिथे पोचतात. दोघेही त्याला विश करतात.
आरव : काय रे...! आज तरी लवकर घरी यायचं. कुठे गेला होता....?😊
प्रेम : अरे... ऑफिस मधील मित्रांसोबत छोटीशी पार्टी होती ना म्हणुन थोडा लेट झाला.
रमेश : बरं ते ठिक आहे, चल आपल्याला चायनीज ला जायचे आहे.
* ताईला सांगुन तो त्यांच्यासोबत बाहेर पडतो.
एका चायनीज हॉटेल मधे राघव आणि हितेश केक घेऊन पोचलेले असतात. सोबत बियर च्या बॉटल पण असतात.😋
आरव आणि हितेश प्रेमला बर्थ डे विश करतात. मग चायनीज ऑर्डर करून बीयर च्या बॉटल ओपन होतात. आणि मग हळू हळू मैफिल रंगते. रात्रीचे बारा वाजत आलेले असतात.
सर्व आवरून झाल्यावर प्रेम हॉटेल चे बिल पेड करून त्यांच्यासोबत निघतो. सर्वांची आइस्क्रीम खायची इच्छा होते. मग नेहमीच्या म्हणजेच कॉलेज जवळील तलावाच्या कॉर्नर वर असलेल्या आइस्क्रीम शॉप वर येतात. प्रेम सर्वांना आइस्क्रीम घेऊन देतो, ते खात खात पुन्हा कॉलेज च्या गप्पा मधे रंगतात. रात्रीचे एक वाजून गेलेले असतात.
थोडा वेळ तिथे गप्पा मारून घरी जायला निघतात.
प्रेम घरी आल्यावर फ्रेश होऊन लगेच झोपुन जातो.
अंजली मात्र आज दिवसभराच्या प्रेम सोबतच्या आठवणी मधे खुप वेळ जागी होती. पहाटे उशिरा तिची झोप लागते.
पुढील दोन दिवसातच अंजलीचे कॉलेज चालू झाले होते. अंजली प्रेम ने सांगितल्या प्रमाणे मन लाऊन अभ्यास करत होती.
अधुन मधुन ते दोघे थोड्या वेळासाठी भेटत होते. बाकी सर्व काही ठिक चालु होते. दोन महिने असेच निघुन जातात.
ऑगस्ट महिना चालु झाला होता. अंजलीचा वाढदिवस जवळ आला होता. पण यावेळी घरी मात्र तो अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. त्या दिवशी प्रेम तिला थोड्या वेळासाठी भेटला. तिला एक छान असा बॉलपेन त्याने गिफ्ट केला.
अंजली समजुतदार होती. तिला माहित होतं, हे वर्ष तिच्यासाठी किती महत्वाचं आहे ते, तिचे डॅड आधीच थोडेफार नाराज होते. त्यांच्या खुप साऱ्या अपेक्षा होत्या तिच्याकडून, त्यामुळे सर्व गोष्टी समजुन ती मन लाऊन अभ्यास करत होती. यादरम्यान ती कधीतरीच प्रेमला भेटत होती. आणि भेटले तरी फक्त अभ्यासाबद्दल बोलणे व्हायचे.
ते दिवस कधी सरले हे कळलच नाही. दिवाळी, ख्रिसमस च्या वेळी फक्त ते दोघे भेटले होते.
अखेरीस तिची एक्झाम चालु झाली. प्रेम ने तिला मनापासून शुभेच्छा दिल्या. तिने पण कोणाला नाराज न करता खुप अभ्यास करून सर्व पेपर चांगल्या प्रकारे सोडवले. तिला खात्री होती निदान नव्वद टक्के तरी मार्क्स मिळतील. हि गोष्ट तिने अगदी विश्वासाने घरी आणि प्रेमला सुद्धा सांगितली.
तिच्या या आत्मविश्वासाने डॅड पण खुश झाले. खरं तर ते तिला रिझल्ट लागल्यानंतर मोबाईल गिफ्ट करणार होते. पण त्यांनी आधीच तिला छानसा नोकिया चा लेटेस्ट मोबाईल गिफ्ट केला. ते पाहून ती अजुनच खुश झाली. सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा होता की, ती प्रेमला आता कधीही कॉल करू शकत होती.
मोबाईल चालु झाल्यावर तिने पाहिला कॉल प्रेमला केला.... दुपारची वेळ होती. प्रेम लंच करून त्याच्या ऑफिस मधे काम करत बसला होता. तेवढ्यात प्रेमच्या मोबाईल ची रिंग होते. बाहेर जाऊन तो कॉल रिसिव्ह करतो.
अंजली : हाय... मेरे जानु, कैसे हो....?🥰
प्रेम : अरे....तु! आणि कोणाचा नंबर आहे हा...?🤔
अंजली : कोणाचा काय...! माझा...!😊
प्रेम : अच्छा...! खरच का...? 😊
अंजली : अरे हो...! डॅड नी मला मोबाइल गिफ्ट केलाय.... खुप छान आहे. 🥰
प्रेम : अरे व्वा...! छानच....! अभिनंदन. 💐
अंजली : थॅन्क्स डियर...! 😊
प्रेम : पण ते तर रिझल्ट लागल्यानंतर देणार बोलले होते ना...!🤔
अंजली : हो...! मलाही तसच वाटलं होतं. पण त्यांनी मला सरप्राइज दिलं. 🥰
प्रेम : बघ अंजु...! तुझ्या मेहनतीचे फळ आहे हे, एवढे दिवस त्यांनी तुला मन लाऊन अभ्यास करताना पाहिलं असेल. आणि म्हणुनच त्यांनी तुला आत्ताच हे गिफ्ट दिलं.
अंजली : हो... कदाचित तसच काहीतरी असेल. बट आय एम वेरी हॅप्पी...!😊 आता मी तुला कधीही कॉल करू शकते. 🥰
प्रेम : अच्छा....! फ्री कॉलिंग आहे का त्याला, खुप जास्त पैसे लागतात मोबाईल वरून कॉल लावला तर कळलं. आणि जेव्हा बिल येतं तेव्हा कळतं सर्व. कोणाला कॉल केलाय, किती वेळ बोलले ते.
अंजली : अरे देवा...! मी तर पहिला कॉल तुलाच केला. 😊
प्रेम : मग आता कट कर, घरी आहेस ना, मग घरच्या फोन वरून कर.
अंजली : बरं...ओके...! 😊
* प्रेम तिचा कॉल कट करतो. थोड्याच वेळात पुन्हा त्याच्या मोबाईल ची रिंग होते.
प्रेम : आता बोला मॅडम...! 😊
अंजली : आय लव यू मेरे जानु...!🥰
प्रेम : ओय...! घरी आहेस ना...?🤔
अंजली : हो... राजा....! मॉम झोपली आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 😊
प्रेम : बरं ओके...! बोल...😊
अंजली : मी तर बोलली...! पण रिप्लाय काही मिळाला नाही मला हवा तसा...😊
प्रेम : अच्छा...! लव यू टू... मेरी जान. 🥰
अंजली : हाय...! मैं मर जावा...! 🥰 किती भारी वाटतं, तु असं काहीतरी बोलला की. 🥰
प्रेम : अच्छा...! किती भारी वाटतं बरं...?😊
अंजली : ते मी तुला असं सांगुच शकत नाही. 🥰
प्रेम : मग कसं सांगशील बर....?😊
अंजली : तु भेटतोय का आज...मग नक्की सांगेन.😊
प्रेम : अच्छा...! आज काय आहे ? 🤔
अंजली : आज काय म्हणजे...?🤔 एक्झाम संपलीय माझी...! आणि तेही तुमच्या नियम अटी पालन करून... कळलं. आणि आता मला काही कारण नकोय. न भेटण्यासाठी. 😏
प्रेम : हो... हो...! कळलं ते ! पण आजच भेटायचं आहे का ? उद्या नाही चालणार मॅडम. 😊
अंजली : प्रेम...! काय रे असं करतोय...! किती दिवस झालेत माहिती आहे का तुला, आपल्याला भेटून...? शेवटचं कधी भेटलो ते तरी आठवतं का तुला...? 😏
प्रेम : हो...! आठवतं ना...! १ जानेवारी ला... तुला न्यू इयर विश करायला आलेलो चर्च जवळ...😊
अंजली : नशीब माझं... तेवढं तरी आठवलं. 😊
प्रेम : मग... लक्षात आहे माझ्या...😋
अंजली : अच्छा...! मग हे पण माहित असावं की आता कोणता महिना चालु आहे. 😊
प्रेम : आत्ता...🤔 मार्च...! 😊
अंजली : हो... ना... ! मग...! 😊
प्रेम : मग काय....?🤔
अंजली : काय...! काय विचारतोय. तुला कळत नाही का, किती दिवस झालेत आपल्याला भेटून. 😔
प्रेम : अच्छा...! असं आहे का...! 😊
अंजली : प्रेम...! तुला नाही वाटत का आपण भेटलं पाहिजे म्हणुन...😔
प्रेम : अरे...! का नाही वाटणार ? मी तर वाट पहात होतो, कधी एकदा तुझी एक्झाम संपते ते. 😊
अंजली : खरंच...!😍 मग भेटूया ना आज...🥰
प्रेम : अरे...! आज संध्याकाळी थोडा उशीर होईल निघायला. आणि आज काम खुप आहे. मग खुप कमी वेळ मिळेल आपल्याला. म्हणुन मी आज नको बोलत होतो.
अंजली : बरं ओके...! मग उद्या तरी नक्की ?
प्रेम : हो... नक्की...!👍🏻
अंजली : खरंच...🥰 मग उद्या किती वाजता येऊ मी...?
प्रेम : कधीही येऊ शकते, कारण मी उद्या माझ्या जानु साठी सुट्टी घेतली आहे. 😊
अंजली : ओय...! तु खरं बोलतोय ना...? का मस्करी करतोय. प्लिज सांग...😊
प्रेम : अरे...! खरंच बोलतोय. उद्याचा दिवस आपला असणार आहे. आता तु ठरव उद्याचा प्लॅन. 😊
अंजली : ओह माय गॉड...🥰 थँक्यू सो मच...प्रेम.! आय येम् सो हॅप्पी...🥰
प्रेम : अच्छा...😊
अंजली : हो... ना...! आणि... आय लव यू,...आय लव यू,... आय लव यू,... आय लव यू,... सो मच...🥰😍😘
प्रेम : ओय...! 😊
अंजली : बरं ऐक...! मी उद्यासाठी काहीतरी प्लॅन करते. घरी काहीतरी सांगावं लागेल. ते मी बघते काय करायचं ते, पण फायनली आपण उद्या सकाळी १० वाजता स्टेशन ला भेटतोय हे नक्की.... ओके. 🥰
प्रेम : ओके मॅडम...👍🏻😊
अंजली : बरं... मी आता फोन ठेवते. बाय... आणि आय लव यू सोना....😘
प्रेम : लव यू टू... मेरी जान. 😊
* असं बोलुन ते फोन ठेऊन देतात. खुप दिवसांनी होणाऱ्या भेटीची आतुरता काही वेगळीच असते.
त्या दिवशी अंजली खुप खुश झाली होती. कधी एकदा रात्र संपुन उद्याचा दिवस येतोय असं तिला वाटत होते.
रात्री जेवण वगैरे झाल्यावर सर्व आवरून ती आपल्या नवीन फोन सोबत वेळ घालवत होती. मधेच प्रेमचा नंबर ओपन करून मनात विचार आणत होती, " करू का कॉल त्याला " पण स्वतःला आवर घालत उद्याच्या पहाटेची वाट पाहत ती झोपी जाते.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️