Anubandh Bandhanache (Part 22) in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 22

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 22

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २२ )


प्रेम बाहेर टीव्ही बघत बसलेला असतो. मस्त फिल्म लागलेली असते,' दिल तो पागल है... समोर टिव्हीवर माधुरी आणि शाहरुख खान चा एक रोमँटिक सीन चालु असतो.....


त्याच वेळी अंजली अंघोळ करून टॉवेल ने तिचे ओले केस पुसत तिथे येते. प्रेमचे लक्ष टीव्ही कडे असते. 
अंजली पाठीमागून त्याच्या जवळ येते. टॉवेल तिथेच बाजुला ठेऊन देते, आई तिथे नाही याची खात्री करून ती तिचे दोन्ही हात मानेवरून त्याच्या हनुवटी जवळ घेत, हळुवार त्याचे डोके कोच वर टेकवते. 
तिच्या ओल्या केसांनमधुन टपकणारे पाण्याचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. दोघांची नजरानजर होताच अलगद ती त्याच्या कपाळावर किस करते. आणि पटकन तिथून बाजुला होते. प्रेम मागे वळुन तिच्याकडे फक्त पहात असतो. 

तेवढ्यात आई तिला किचन मधुन आवाज देतात तशी ती आत निघुन जाते. परत येताना एका डिश मधून शिरा घेऊन येते. आणि चमच्यामध्ये थोडा घेऊन प्रेमला भरवायला जाते....

प्रेम : अरे... नको मला आता... खुप हेवी ब्रेकफास्ट झालाय माझा...😋

अंजली : अरे... जास्त नाही देत, फक्त एक घास खा... बघ मस्त बनवते आई... माझ्यासाठी स्पेशल असतो...😊

प्रेम : तुझ्यासाठी असतो ना... मग तुच खा...😊

अंजली : अरे... म्हणजे तसं नाही, मी आल्यावर ती बनवतेच शिरा... आणि मलाही खुप आवडतो तिच्या हातचा शिरा... बघ ना खाऊन थोडासा...😊

प्रेम : असं आहे का... मग तर टेस्ट करायला हवा... अंजली स्पेशल शिरा...😋

* अंजली त्याला एक घास भरवते आणि त्याच्या बाजुला खात खात टीव्ही बघत बसते.

अंजली : कसा आहे...? 😊

प्रेम : खरच ग... खूपच टेस्टी आहे. 😋

अंजली : मग... मी बोलले ना तुला...😊 अजुन भरवू....😊

प्रेम : नाही... नको... आता जागा नाही पोटात. 😊

* थोड्या वेळात आई पण तिथे येऊन प्रेम सोबत गप्पा मारत बसतात. त्या मॉम बद्दल सांगत असतात. त्यांची लव्ह स्टोरी मग पळून जाऊन लग्न वगैरे... दोघेही ते ऐकत असतात, मधेच मॉम चा कॉल येतो, मग अंजली मॉम सोबत बोलत असते....

आई त्याला विचारतात....

आई : तुला मच्छी आवडते ना रे... बनवु ना , आज रविवार आहे. म्हणुन म्हटलं...😊

प्रेम : हो आई... तुम्ही बनवलेलं काहीही चालेल पण जास्त नको. कारण सकाळचा नाष्टाच खुप जास्त झालाय...😊

आई : हो...का... आवडलं ना तुला... मग बस्. 😊

प्रेम : हो...आई... खुप टेस्टी होती जवल्याची भाजी आणि तांदळाची गरम भाकरी... म्हणुन तर दोन भाकरी खाल्ल्या मी...😋

आई : मग दुपारच्या जेवणात काय बनवायचं... मासे की चिकन... तु काय खाणार सांग ते बनवु....नाहीतर आपण तिघेच आहोत जेवायला आज. 😊

* तेवढ्यात अंजली तिथे येऊन बोलते. 

अंजली : आई... बोंबील चा रस्सा बनव ना मस्त...राईस सोबत मस्त लागतो. 😋

आई : बरं बाई... बनवते... 😊

अंजली : प्रेम... तु खाशील ना...अरे छानच बनवते... एकदा खाऊन बघ...पुन्हा येशील परत खायला ...😊

प्रेम : हो...का... मला चालेल काहीही...😊 पण जास्त नको. 😊

अंजली : आई... मग फायनल, आता बोंबिलचा रस्सा आणि राइस...😋👍🏻

प्रेम : हे बरं आहे ना तुझं... फक्त ऑर्डर सोडते. तु कधी बनवायला शिकणार. जा मदत कर आईला आणि शिकुन घे जरा... नाहीतर लग्न झाल्यावर नवऱ्याला पण उपाशी रहावं लागेल...😀

* आई आणि प्रेम तिच्याकडे पाहून हसायला लागतात...😀😀

अंजली : ये... गप रे तू... शिकेन मी हळु हळु, अजुन खुप वेळ आहे त्यासाठी...कळलं. 😏

प्रेम : आता कुठे वेळ आहे, दहावी तर झाली, कॉलेज झालं की, मग लग्नाची तयारी... हो ना आई...😊

* पुन्हा दोघे हसायला लागतात....😀😀

आई : हो...ना...आज लग्नाला गेली असती तर तिथेच कोणीतरी मागणी घातली असती बघ...😀

अंजली : आई... काय ग... तु पण... 😌

आई : अरे बाळा... गंमत केली जरा, एवढं काय झालं... ये.. ग.. माझी बाय ती...😊

* असं बोलुन आई तिला जवळ घेतात, तशी ती आईला मिठी मारते. नकळत तिचे डोळे भरून येतात. ती प्रेम कडे पहात असते. 😢

प्रेम : अरे... काय झालं... मस्करीत बोललो ना... राग आला का तुला... बरं सॉरी...😊

* अंजली आईच्या मिठीतुन बाहेर येऊन तिथेच सोफ्यावर बसते. आई आत निघुन जातात तशी ती प्रेमला बोलते...

अंजली : काही गरज नाही त्याची...😌

प्रेम : अरे यार... खरच सॉरी... हे बघ कान पकडले...😊

अंजली : तु नको ना सॉरी बोलू... ते मला असच जरा भरून आलं... आईने जवळ घेतल्यावर....😊

प्रेम : अच्छा... असं आहे का ते...😊

अंजली : हो... ना... छान पण वाटत आणि रडायला पण येतं. आणि तुला सांगु... आई पण आत रडत असेल बघ... मला माहित आहे तिची सवय...😌

* प्रेम थोडा तिच्या जवळ जातो आणि तिचा हात पकडत तिला जवळ घेतो...

प्रेम : रिलॅक्स...... होतं असं, भावना आहेत त्या, कधी कधी डोळ्यातून अश्रूंच्या रूपाने बाहेर पडतात....😔

अंजली : आईचा खुप जीव होता रे मॉम वर आणि आत्ताही आहे... मॉम नी दुसऱ्या काष्ट मधे लग्न केलं तेव्हा बाबांमुळे खुप वर्ष त्या दोघी बोलल्या नाहीत. पण तिला जेव्हा कळलं की, लग्नाला सात वर्ष होऊनही मॉमला मुल होत नव्हते. तेव्हा तिने बाबांच्या नकळत दोघांनाही इकडे बोलवून घेतले होते. आणि इथेच एक देवीचे मंदिर आहे. त्या देवीची पुजा करून तिला नवस बोलली होती. त्यानंतर दिड वर्षांनी माझा जन्म झाला. म्हणुन मला ती बोलते. नवसाची बाय माझी. मग त्यानंतर बाबांनी पण ते स्वीकारलं, आणि आम्ही इथे येऊ लागलो...
 पण चार वर्षांपूर्वी बाबा गेल्यानंतर ती एकटी पडलीय असं वाटतं, तशी मामा मामी खुप काळजी घेतात तिची...पण तरीही तिच्या मनातलं ऐकुन घ्यायला जवळचं असं कोणीतरी हवं असतं ना... म्हणुन मी तिला नेहमी कॉल करत असते. खुप गप्पा मारतो आम्ही... मैत्रिणी सारख्या... मी माझ्या सर्व गोष्टी तिला शेअर करते. 😊

प्रेम : अच्छा.... सर्व...म्हणजे सर्वच...🤔

अंजली : अरे वेड्या ... म्हणजे आपल्याबद्दल नाही. बाकी सर्व...😊

प्रेम : असं कसं... सर्व शेअर करते तर मग हे पण सांगायला हवं ना... तू अजुन नाही सांगितलं... 🤔 थांब मग मी सांगतो...😊

* असं बोलून तो तिथून ऊठुन आईंना आवाज देत आत जायला निघतो. तेवढ्यात अंजली त्याच्या हाताला पकडुन खाली बसवते...

अंजली : ओय... वेडा आहेस का तु जरा... काय करतोय... पागल...😊

* प्रेमच्या आवाजाने आई बाहेर येतात...

आई : काय झालं रे... हाक मारली का...?

प्रेम : हो... आई... अंजुला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला...😊

* अंजली डोळे मोठे करून प्रेम कडे पहाते...🙄

आई : काय ग... सोनू... काय झालं बोल...?

प्रेम : आई..... हिचं सोनू पण नाव आहे...मस्तच... सोनू....😊👌🏻

अंजली : अगं आई काही नाही बोलायचं आहे, हा उगाच काहीतरी बोलतोय...😏

प्रेम : आत्ताच तर बोलली तु...सोनू..... आईला काहीतरी सांगायचं आहे म्हणून....😊

अंजली : ओय... सोनू फक्त आईसाठी आहे कळलं....😌

प्रेम : अरे...पण छान नाव आहे...👌🏻😊 आता मी पण बोलणार...सोनू...😊

अंजली : आजिबात नाही...😏

प्रेम : तरीही बोलणार...सोनू...😋

अंजली : ते जाऊ दे... 😏

प्रेम : बरं... काय सांगायचं होतं आईला... सांग आता मग... सोनू...😋

अंजली : पण मी कुठे असं काही बोलली.🤔

प्रेम : लगेच पलटी मारते...ही तुमची सोनू...😊 पण आई... खरच ही बोलली...😊

आई : सोनु... काय झालं... बरं वाटत नाही का तुला...?

अंजली : अगं आई...काही नाही झालंय मला, मी बरी आहे... याचं काय ऐकते...😏

प्रेम : म्हणजे मी खोटं बोलतोय का...सोनू 😊

अंजली : तु गप्प रे...आणि काय सारखं सोनू सोनू लावलं आहेस...😏

आई : अगं बोलू दे ना मग त्याला, त्यात काय एवढं...😊

अंजली : आई... तु..जा... वेडा आहे हा...😏

आई : बरं बाई... जाते, चालु द्या तुमचं...😊

* असं बोलुन आई आत निघुन जातात... अंजली सोफ्यावरील उशी घेऊन प्रेमला मारायला जाते. प्रेम उठून धावायला लागतो. अंजली त्याच्या मागे धावते.
तिथे एक राऊंड मारून झाल्यावर तो तसाच आईंना परत आवाज देत किचन मधे जातो. 

प्रेम : आई... बघा ना तुमची सोनू मारतेय मला...😊

* अंजली हातातील उशी मागे लपवते...

आई : का...ग... मारते त्याला...😊

अंजली : मी कुठे मारतेय...😏

प्रेम : मग हातात काय आहे दाखव...मागे काय लपवलं आहेस...😊

अंजली : कुठे काय... ही उशी आहे...😊

प्रेम : कशाला घेऊन आलीय मग माझ्या मागे...धावत...😊

अंजली : ती..... मी घेऊन बसलेली हातात, तशीच घेऊन आले...😏

प्रेम : किती खोटं बोलतेय... आई..... खरच मला मारायला घेऊन आलीय...ती...

अंजली : हो... आता तर तु मारच खाणार आहेस माझा....😠

प्रेम : बघा... आई... मी बोललो होतो ना, आता तर धमकी देतेय...😋

आई : काय लहान मुलासारखे भांडताय दोघे... बाय बरोबर बोलत होती... उदिर मांजर आहेत दोघे... आजिबात पटत नाही दोघांचं...😊

प्रेम : हो... ना... पांढरी मांजर...🐁😊

अंजली : आणि तु काळा उंदीर...🐀😠

प्रेम : आई....... काळा उंदीर बोलली मला. 😔 काळा आहे का मी...?🤔

आई : नाही रे... एवढा गोरा गोंडस आहेस...😊 

अंजली : पण उंदीर आहेस ना....😠

प्रेम : आणि तु मांजर....😋

अंजली : थांब तुला आता बघतेच.... आई तु बाजूला हो....😠

* असं बोलुन ती पुन्हा त्याला मारायला येते. प्रेम पुन्हा तिथून पळ काढतो.

आई : काय चाललंय या पोरांचं... काही कळत नाही... एवढे मोठे झालेत, तरी लहान मुलांसारखे भांडतायत..😊

* प्रेम तसाच धावत परत बाहेर येतो, आणि अंजली उशी घेऊन त्याच्या मागे धावत येते. बाहेर गोल फिरून तो बाजुच्या रूम मधे जातो. आणि दाराच्या पाठी लपतो.
अंजली त्याला पाठी आत येते तशी तिला पाठीमागून कमरेभोवती मिठी मारतो...

प्रेम : आता मार... हवं तेवढं...😊

* अंजली दोन्ही हातात उशी घेऊन उलट्या हाताने त्याच्या डोक्यात उशी मारते...

अंजली : ओय... सोड... काय करतोय... आई येईल...😊

* प्रेम तिच्या मानेवर हलकासा किस करतो...

अंजली : प्रेम..... नको ना... प्लिज...😊

* प्रेम पुन्हा तिच्या कानाला किस करतो... अंजली हातातील उशी दोन्ही हाताने घट्ट पकडुन ठेवते.

प्रेम : खरच नको..... बरं... ओके...😊

* असं बोलुन तिच्या कमरेभोवतीची मिठी सैल करून हात मागे घेतो. अंजली डोळे झाकुन तशीच उभी असते. त्याने मिठीतुन सोडल्यावर ती हातातील उशी बाजुला टाकून देते आणि त्याच्याकडे फिरत त्याचे दोन्ही हात पकडुन स्वतःच्या कमरेमागे घेऊन जाते. आणि मग आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकत बोलते....

अंजली : झालं तुझं....😊

प्रेम : हो..... तुच बोलली ना... नको म्हणुन. 😊

अंजली : हो...का... मग मी हे पण बोलली नव्हती की किस कर म्हणुन तरीही केला ना...😊

प्रेम : अच्छा... ते... झालं... आपोआप... सॉरी.....😔

अंजली : अच्छा... सॉरी... क्या बात है...😊

प्रेम : हो...ना... तुला न विचारता केलं म्हणुन...😔

अंजली : हो... का... मग मी पण बिग सॉरी...😔

प्रेम : तु.... का...बरं... तु काय केलं...🤔

अंजली : मी....! मी तर प्रेम केलं तुझ्यावर, तुला न विचारता... मग....त्यासाठी सॉरी...😊 

* असं बोलुन ती मान खाली घेते. प्रेम तिचा चेहरा वरती करत बोलतो.....

प्रेम : पागल..... खरच वेडी आहेस तु...😊 

* अंजली त्याच्या डोळ्यात डोळे घालून थोडी इमोशनल होऊन बोलते....

अंजली : हो...ना... मी आहेच पागल जरा,आणि खुप वेडी पण आहे, तुझ्या प्रेमात... नाही जगु शकणार रे मी तुझ्याशिवाय😔

* बोलता बोलता तिचे डोळे भरून येतात. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. प्रेम ते अश्रू दोन्ही हातांनी अलगद पुसत बोलतो...

प्रेम : बस् झालं... पुरे आता... जास्त इमोशनल नको होऊ... कळलं मला. 😊

अंजली : प्रेम मी खरच बोलतेय... तुझ्याशिवाय मी माझ्या जगण्याची कल्पना सुध्दा करू शकत नाही. तु नसशील ना माझ्या आयुष्यात तर मरून जाईन मी....😢

प्रेम : अरे... मी आहे ना इथेच तुझ्या समोर तुझ्या मिठीत...😊

अंजली : असाच राहशील ना माझ्यासोबत नेहमी... मला कधीच सोडुन जाणार नाहीस ना...😔

प्रेम :अंजु.... काय बोलतेय तु... वेड्यासारखं 🤔

अंजली : नाही रे... कधी कधी भीती वाटते. तु दुर असला की.....😔

प्रेम : हे... बघ... तुच बोलली होती ना, पुढे काय होईल ते होईल, आत्ता आपण सोबत आहोत ना... मग हे क्षण वाया नको जायला, ते मनमुराद जगुया ना... हो की नाही...😊

अंजली : हो... अगदी बरोबर... मला पण नाही वाया घालवायचे आहेत हे क्षण. तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्पेशल आहेत आणि यापुढेही असणार आहेत. 😊

प्रेम : हो... आणि माझ्यासाठीही...😊

अंजली : अच्छा... मग आता मी सॉरी 
... कारण मला खरच हे क्षण जगायचे आहेत...😘

* असं बोलुन अंजली त्याच्या ओठांवर ओठ ठेवते. प्रेम पण तिला अजुन घट्ट मिठीत घेत तिला प्रतिसाद देतो. खुप वेळ ते दोघे तसेच त्या धुंदीत मग्न होऊन जातात. आत्तापर्यंतच्या भेटीत पहिल्यांदा ते एवढ्या जवळ आले होते.

हे सर्व चालु असताना आई किचन मधुन अंजलीला आवाज देत असतात. पण तिच्या कानावर आईचे शब्द पडत नाहीत. मग आई बाहेर येऊन पुन्हा तिला आवाज देतात तसे दोघेही भानावर येतात. 

दोघेही थोडे घाबरतात, अंजली स्वतःला सावरते आणि, आई तिथे येतील म्हणुन त्याच रूम च्या मागच्या दरवाज्यातून मधुन प्रेमच्या हाताला पकडुन त्याला बाहेर घेऊन जाते....

मागे खुप मोठी मोकळी जागा असते. तिथे खुप सारी गुलाबाची व इतर फुलझाडे लावली होती. तिथेच एका बाकावर पेपर पडलेला असतो. प्रेम पटकन तो उचलतो आणि आई तिथे येतील म्हणुन तो पेपर वाचत बसण्याचे नाटक करतो. अंजली पण थोडे अंतर ठेऊन तिथे बसते. 😊

अंजलीला प्रेमला पाहून हसायला येतं....😊 त्याच्याकडे पाहून ती बोलते...

अंजली : काय झालं... घाबरलास का...😊

प्रेम : अरे... मग काय...आई तिथे आल्या असत्या आणि पाहिलं असतं आपल्याला अशा अवस्थेत तर काय झालं असतं...🤔

अंजली : ओय... रिलॅक्स असं काही झालं नसतं... उगाच टेन्शन घेऊ नको. 😊

प्रेम : हो...का... तुला नाही भीती वाटली का...🤔

अंजली : हो... वाटली...पण थोडीशी, पण तुझ्या एवढी नाही... घाबरट कुठला...😀

प्रेम : कशी मुलगी आहेस तु... 🤨

अंजली : कशी आहे बरं तुच सांगु शकतो आता खरं खरं... 😊

प्रेम : ओय... 😊

अंजली : मग सांग बरं कशी आहे, गोड, तिखट, आंबट, खारट... 😋

प्रेम : तु ना... खरच खुप गोड आहेस, अशीही आणि तशीही... 😋

अंजली : अशी आणि तशी म्हणजे... नक्की कशी बरं...🤔😊

प्रेम : ते नाही सांगु शकत असं.....😊

अंजली : हो... का... मग कसं सांगशील, आणि कधी...🤔😋

प्रेम : अरे... खुप बोलतेय असं नाही वाटत का तुला...😊

अंजली : बिलकुल नाही वाटत असं...😊

प्रेम : हो... का...मग एक काम कर...😊

अंजली : काम... आणि आत्ता... बरं सांग...😊

प्रेम : आत जा... आणि स्वतःला एकदा आरशात निरखुन बघ.....😊

अंजली : अच्छा... का... काय झालंय का...?🤔

प्रेम : हो... झालंय ना... खुप काही...😋

अंजली : अरे... नीट सांग ना... काही लागलं वगैरे आहे का चेहऱ्यावर...🤔

प्रेम : काही लागलं वगैरे काही नाही, पण तुझ्या ओठांवर एक लाली पसरलीय असं वाटतं पिंक लिपस्टीक लावली आहेस, एवढे गुलाबी दिसतायत. आणि चेहरा तर जरा जास्तच ग्लो करतोय....😍

अंजली : अच्छा असं आहे का ते... मला वाटलं अजुन काही...😊

प्रेम : अजुन काय असणार या क्षणी...😊

अंजली : हा... ओठांवर गुलाबी लाली तर आलीय.... पण ती तुझ्या प्रेमाची, आणि ही लाली अशीच मला आयुष्यभर माझ्या ओठांवर येत राहो.... म्हणजे मला कधी लिपस्टिक लावायची गरज भासणार नाही. 😋 आणि जेव्हा तु समोर असतो तेव्हा हा चेहरा असाच ग्लो करणार...नेहमीच...🥰

प्रेम : खरच का...😊 

अंजली : मग काय... खरं तर आता तु पण खुप वेगळा आणि एखाद्या रोमँटिक हिरो सारखा दिसतोय... म्हणजे तु पण खुप ग्लो करतोय. तुझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळी नशा दिसतेय. 😍

प्रेम : खुपच तारीफ होतेय ना... बस बस...😊

अंजली : अरे नाही... खरच बोलतेय... तुझी शपथ... हवं तर तु जावून बघ आरशात स्वतःला...🥰

प्रेम : नको... त्याची काही गरज नाही. 😊

* दोघे गप्पा मारत असतात तेवढ्यात त्यांना शोधत आई तिथे येतात....

आई : इथे आहात तुम्ही दोघे... मी सर्विकडे शोधुन आले, इकडे कधी आलात दोघे...🤔

अंजली : अगं... मघाशीच आलो. आत बसुन कंटाळा आला म्हणुन...😊

आई : अच्छा..... ते मला दिसला नाहीत ना येताना म्हणुन...😊

अंजली : अगं पलिकडच्या दरवाज्यातून आलो. म्हटलं याला तुझी फुलबाग दाखवू, म्हणून घेऊन आले. 😊

आई : अच्छा... मग आवडली का आमची छोटीशी फुलांची बाग...🌺🌼🌹🥀🌿🌱

प्रेम : हो... आई... खरच खुप छान आहे. खुप छान छान फुलं आहेत. 👌🏻😊 

* ते तिघेही तिथे थोडा वेळ गप्पा मारत बसतात. मग थोड्या वेळाने जेवायला घरात येतात. आईने मस्त बोंबील चा रस्सा आणि भात बनवलेला असतो. 
ते जेवायला बसतात. अंजली पण त्याच्या बाजुला बसते. तिच्यासाठी आईने थोडी जवला भाकरी ठेवलेली असते. ती तिला वाढते. 
प्रेम मस्त रस्सा आणि भात पोटभर म्हणजे जरा जास्तच खातो.😋 आणि बाहेर येऊन बसतो. आई आणि अंजली आत अजुन जेवत असतात. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️