अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४१ )
अंजलीची झोप लागली असावी असं समजुन मॉम तिथून उठतात. तेवढ्यात त्यांची नजर टेबलवरील गोळ्यांच्या डब्याकडे जाते.
ते पाहुन त्यांच्या मनात शंका येते. घाबरून त्या पुन्हा अंजलीला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण अंजली पूर्णपणे बेशुद्ध पडली होती. ती कसलाच रिस्पॉन्स देत नव्हती. मॉम बॉटल मधील पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर मारून तिला जागं करण्याचा प्रयत्न करतात. पण अंजली उठत नव्हती. ते पाहुन मॉम रडायला लागतात. हा सर्व प्रकार पाहून सिद आणि मेघा पण घाबरून जातात. ते दोघेही तिला आवाज देऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करतात.
मॉम तिच्या मानेला पकडुन तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. अंजलीने मात्र पुर्ण अंग टाकून दिले होते.
रात्रीचे दहा वाजायला आलेले असतात. पण अजून तिचे डॅड घरी आलेले नसतात.
हा सर्व प्रकार पाहून घाबरून सिद लगेच कॉल करून अँब्युलन्स बोलवतो. थोड्याच वेळात एक अँब्युलन्स त्यांच्या सोसायटी मधे येते.
हॉस्पिटल चे दोन कर्मचारी धावत स्ट्रेचर घेऊन त्यांच्या घरी पोचतात. तिला स्ट्रेचर वर झोपवुन अँब्युलन्स मधे घेऊन जातात. तिच्यासोबत मॉम, सिद आणि मेघा तिघेही त्या अँब्युलन्स मधुन हॉस्पिटल मधे जातात.
थोड्याच वेळात ते एका मोठ्या हॉस्पिटल मधे पोचतात. अंजलीला अँब्युलन्स मधुन उतरवून डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मधे नेण्यात येतं.
मॉम डॉक्टरांना सांगतात की, कदाचित तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत. त्यांच्या सांगण्यावरून डॉक्टर तिची इमर्जेन्सी ट्रीटमेंट चालू करतात.
अंजलीच्या डॅड ना अजुनही काही कॉन्टॅक्ट होत नव्हते. म्हणुन मेघा तिच्या वडिलांना कॉल लावते, ते कॉल रिसिव्ह करतात. मेघा घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगते.
ते दोघे एकत्रच असल्यामुळे पुढच्या काही वेळातच ते दोघेही तिथे पोचतात. मॉम त्यांना सर्व काही सांगतात. ते ऐकुन अंजलीचे डॅड खुप घाबरून गेलेले असतात.
त्यांचं खरच खुप प्रेम होतं अंजलीवर हे त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी जाणवत होतं.
त्यांनी प्रेम सोबत जे काही केलं, ते कळल्यामुळे कदाचित अंजलीने हे पाऊल उचललं असावं. असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते आतुन स्वतःला दोष देत असतात.
सर्वजण ऑपरेशन थिएटर च्या बाहेर डॉक्टरांची वाट पहात होते. एकीकडे मेघा मॉम ला धीर होती. दुसरीकडे मेघाचे वडील तिच्या डॅड ची समजुत काढत होते.
थोड्या वेळात डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधुन बाहेर येतात. अंजूचे डॅड लगेच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना अंजलीबद्दल विचारतात. तेव्हा ते डॉक्टर बोलतात. " काळजी करू नका, ती आता बरी आहे"
त्यांच्या अशा बोलण्याने सर्वांच्याच जीवात जीव येतो.
थोड्या वेळाने तिला ऑपरेशन थिएटर मधुन आयसीयू मधे शिफ्ट करण्यात येतं. पण अजुन ती शुद्धीवर आली नव्हती. मॉम, मेघा आणि सिद तिघेही तिच्याजवळ असतात.
डॉक्टर तिच्या डॅड ना त्यांच्या केबिन मधे बोलवून घेतात. आणि त्यांच्याशी बोलतात.
डॉक्टर : हे बघा साहेब... तुम्ही वेळेत तिला हॉस्पिटल मधे घेऊन आलात म्हणुन आपण तिला वाचवू शकलो. कदाचित उशीर झाला असता तर काहीच करता आले नसते. कारण गोळ्यांचा खुप हेवी डोस घेतला होता तिने. बाय द वे, तिला गोळ्या कुठून मिळाल्या...? घरी कोण घेतात का झोपेच्या गोळ्या.
डॅड : हो सर...! मीच घेतो कधीतरी.... त्यामुळे आणून ठेवल्या होत्या.
डॉक्टर : अहो... पण मुलांपासून या गोष्टी जरा लांबच ठेवाव्यात. हल्ली असे प्रकार खुप वाढत चाललेत. आणि हे वय तरी आहे का तिचं हे सुसाईट करण्याचं.
रिजन काय....? प्रेम प्रकरण वगैरे...? की अजुन काही...?
डॅड : तसच काहीतरी पण थोडा गैरसमज झाला तिचा म्हणून झालं हे सर्व....
डॉक्टर : सॉरी साहेब पण... याला कुठेतरी पालक पण जबाबदार असतात. या वयातील मुलांना थोडं समजुन घ्यावं लागतं.
डॅड : हो सर... तुम्ही बोलताय तेही अगदी बरोबर आहे. पण आत्ताची मुलं पालकांचं काही ऐकतात का...?
डॉक्टर : त्यासाठीच बोलतोय मी, कधी कधी त्यांना त्यांच्या परीने समजुन घेणं महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या मुलीच्या बाबतीत नक्की काय झालंय ते तुम्हाला आणि तिलाच माहित. मी तुम्हाला फोर्स करू शकत नाही त्याबद्दल, पण डॉक्टर म्हणुन एक ॲडवाइज देतोय, देवाच्या कृपेने आत्ता आपण तिला वाचवू शकलो. पण या गोष्टी पुन्हा पुन्हा पण होऊ शकतात. आणि प्रत्येकवेळी दैव साथ देतच असं नाही. त्यामुळे काळजी घ्या.
डॅड : हो सर... नक्कीच, पण आता ती ओके आहे ना, काही घाबरण्याचे कारण नाही ना...?
डॉक्टर : तसं काही नाही, पण काळजी घ्या, ती शुद्धीवर आल्यावर बोलू मग आपण....
सर्वजण तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पहात असतात. मॉम थोड्या रागातच अंजू डॅड जवळ जाऊन त्यांना बोलतात...
मॉम : त्या मुलाचं काय केलं तुम्ही... कुठे आहे तो...?
डॅड : तु समजतेस तसं काही नाही केलंय, फक्त थोडी समजुत काढली त्याची, आणि जाऊ दिलं त्याला.
मॉम : खोटं बोलताय तुम्ही...! रात्री उशिरा पर्यंत तो त्याच्या घरी पोचला नव्हता. खरं सांगा कुठे आहे तो...? काय केलं तुम्ही त्याच्यासोबत...?😠
डॅड : खरच सांगतोय हवं तर याला विचार, हा पण माझ्यासोबत होता.
मॉम : भाऊजी... ! हे खरं बोलतायत का हो...?
मेघाचे वडील : हो वहिनी...! आम्ही फक्त त्याला थोडं समजावलं.... बाकी काही नाही.
मॉम : मग तो गेला कुठे...? तुमच्या या अशा वागण्यामुळे आज माझ्या मुलीवर हि वेळ आलीय. तिला काही झालं असतं ना... तर मी कधीच तुम्हाला माफ केलं नसतं.
मेघाचे वडील : वाहिनी... शांत व्हा. भेटेल तो मुलगा. आम्ही थोडं धमकावल्यामुळे कदाचित घाबरून गेला असेल. म्हणुन घरी गेला नसेल.
मॉम : पण ही कुठली पद्धत आहे समजवण्याची... मान्य आहे त्यांच्याकडून चुक झालीय. हे सर्व करण्यापेक्षा त्याला सरळ घरी बोलवून पण समजवता आलं असतं. हि वेळ तरी आली नसती. मागचा पुढचा विचार न करता काहीही पाऊल उचलता. तो मुलगा अजुन घरी नाही आलाय. घाबरून त्याने स्वतःचे काही बरे वाईट करून घेतलं असेल तर....
मेघाचे वडील : तसं काही झालं नसेल... वाहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी त्याची चौकशी करायला सांगतो पोलिस स्टेशन मधे...
मॉम : आता त्याच्या घरी पोलिस पाठवणार आहात का तुम्ही, म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांना पण टेन्शन....
मेघाचे वडील : घरी नाही पाठवत कोणाला... फक्त त्याच्या एरिया मधे चौकशी करायला सांगतो. म्हणजे कळेल तरी तो घरी आलाय की नाही ते...
मॉम : तुम्ही राहू द्या... मी सिद ला पाठवते.
* असं बोलुन मॉम सिद ला प्रेमची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी पाठवतात.
तो बाईक घेऊन प्रेमच्या घरी जातो. घरी गेल्यावर त्याला कळतं की, प्रेम अचानकपणे त्याच रात्री गावी जायला घरातुन निघुन गेलाय.
घरी आल्यावर प्रेम ने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकला होता. गावी काहीतरी अर्जंट काम आहे असं बोलुन तो घाईघाईतच घरातुन निघाला होता.
सिद हॉस्पिटल मधे परत येऊन सर्वांना ती बातमी देतो. तो सुखरूप आहे हे ऐकुन मॉम ला थोडं बरं वाटतं. त्या आयसीयू मधे अंजलीचा हात हातात घेऊन तिच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होत्या.
बऱ्याच वेळाने त्यांना अंजलीच्या हाताची हालचाल जाणवली. ती शुद्धीवर येत होती. मॉम स्वतःचे डोळे पुसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.
हलकेसे डोळे उघडत ती मॉमला विचारते....
अंजली : मॉम.... प्रेम....?
मॉम : तो ठिक आहे बाळा, तु काळजी नको करू. बरं वाटतंय ना तुला...?
अंजली : कुठे आहे तो...?
मॉम : घरी आहे त्याच्या... आणि त्याला काहीही झालं नाही. ओके..
अंजली : नक्की ना मॉम... तु खरं बोलतेय ना,...?
मॉम : हो बाळा... खरच बोलतेय मी, आत्ताच सिद त्याच्या घरी जाऊन आला.
अंजली : माझी शपथ घेऊन सांग मॉम... तो ठिक आहे हे...!
मॉम : तुझी शपथ... तो ठिक आहे. बस्....!
अंजली : मला बोलायचं आहे त्याच्याशी... तु कॉल कर ना त्याला....!
मॉम : हे बघ... बोलू आपण थोड्या वेळाने त्याच्याशी, तु जरा आता शांत हो बरं...!
अंजली : नाही....! मला आत्ताच बोलायचं आहे त्याच्याशी....!😔
मॉम : असा काय हट्टीपणा करतेय, बोलू ना नंतर, आणि मी मोबाईल पण घेऊन नाही आली.
* त्या दोघी बोलत असतात तेवढ्यात तिचे डॅड, मेघाचे वडील, मेघा आणि सिद सर्वजण आत येतात.
ती सर्वांना पहात असते.
डॅड तिच्याजवळ येताच तिची धडधड वाढते. ती त्यांच्या नजरेला नजर पण देत नव्हती. ते जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विचारतात...
डॅड : बरं वाटतंय ना बेटा....?
* ती फक्त मान हलवून होकार देते. तेवढ्यात डॉक्टर चेकअप साठी तिथे येतात आणि सर्वांना तिथे पाहून बोलतात... "कोणीतरी एकानेच इथे थांबा, बाकीचे थोडा वेळ बाहेर थांबा प्लीज"
त्यांच्या सांगण्यावरून सर्व बाहेर येतात. मॉम तिच्याजवळ थांबतात. तिचे चेकअप होते. मग डॉक्टर तिथून बाहेर जातात.
बाहेर डॉक्टर तिच्या डॅड सोबत बोलत असतात.
डॉक्टर : आत्ताच ती शुद्धीवर आली आहे, आणि चेकअप मधे सर्व काही नॉर्मल आहे, फक्त तिला आत्ता लगेच याबाबतील उलट सुलट प्रश्न विचारू नका. थोडं रिकवर होऊ दे तिला.
डॅड : ओके डॉक्टर साहेब... थॅन्क्स. 🙏🏻
* आत अंजली मॉम सोबत बोलत होती....
अंजली : मॉम.... सॉरी, तेव्हा मला काय करावं ते सुचत नव्हते, म्हणून मी हे सर्व केले.... सॉरी...😔
मॉम : ते जाऊदे आता... ! आपण त्याबद्दल नको बोलायला आता.
अंजली : पण डॅड....? ते तर आता अजुनच माझा राग करत असतील...😔
मॉम : काय बोलले मी....! रिलॅक्स हो जरा...!
* त्या दोघी बोलत असतात तेवढ्यात डॅड पुन्हा आत येतात, ते तिच्या बेड जवळ येताच अंजली थोडीशी घाबरून मॉम कडे बघते. मॉम तिला इशाऱ्यानेच शांत राहण्यास सांगतात. ती त्यांच्या नजरेला नजर सुद्धा देत नव्हती. थोडा वेळ ते तिच्याजवळ उभे राहतात. पुन्हा एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला बोलतात.
डॅड : युअर डॅड सो मच लवज यू बेटा.. यू आर द ड्रिम ऑफ अवर फ्युचर.... पुन्हा असं काही चुकीचं करू नको..... तुला काही झालं असतं तर....😌
* ते बोलताना त्यांचे डोळे भरून आले होते, त्यांना असं पाहून अंजली थोडी भाऊक होते आणि... डॅड चा हात हातात घेत बोलते.
अंजली : सॉरी डॅड....😔
डॅड : इट्स ओके बेटा... टेक केअर...🙂
* एवढं बोलुन ते डोळे पुसत बाहेर जातात....
अंजलीला आत्ता आपण घाईघाईत घेतलेला हा निर्णय खुप चुकीचा होता, याची जाणीव होत होती.
मग तिला पुन्हा प्रेमची आठवण झाली, ती मॉमला पुन्हा बोलू लागली....
अंजली : मॉम... प्लीज मला प्रेमशी बोलायचं आहे... थोडा वेळ फक्त.... प्लीज कॉल कर ना त्याला....! तू सिद किंवा मेघाच्या मोबाईल वरून कॉल कर ना त्याला...
मॉम : करू ना आपण थोड्या वेळाने, डॉक्टर आले तर ओरडतील उगाच, तो ठिक आहे, तू त्याची काळजी करू नको. तु आराम कर बघु आता. मी सिद आणि मेघाला पाठवते. खुप वेळ झाला ते बाहेर आहेत. घरी पण जायचं असेल ना त्यांना.... पण जास्त वेळ बोलू नका.
अंजली : ओके....!
* मॉम आयसीयू मधून बाहेर निघुन जातात. मेघा आणि सिद दोघेही तिला भेटायला आत येतात. त्यांना पाहून ती रडवेली होते. मेघा तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारते आणि बोलते....
मेघा : काय मूर्खपणा आहे हा....? तुला काही झालं असतं तर काय करणार होतो आम्ही....!😥
अंजली : सॉरी डिअर...,!😥
मेघा : आय लव यू मेरी जान....!😘
अंजली : प्रेम ठिक आहे ना नक्की, सिद तु भेटून आला ना त्याला... काही बोलणं झालं का त्याच्याशी..... तु त्याला सांगितलं नाही ना हे सर्व...?
सिद : रिलॅक्स अंजू.... ! तो ठिक आहे.... आणि मी काही नाही बोललोय त्याला, हे सर्व तू जे करून बसलीय त्याबद्दल....
अंजली : थॅन्क्स... बरं झालं सांगितलं नाहीस त्याला, नाहीतर उलट मलाच खूप काही ऐकावं लागलं असतं.😔
मेघा : तसंही तुला ऐकावं लागणारच आहे, फक्त जरा बरी हो यातून आणि घरी चल, मग बघते तुझ्याकडे...🤨
अंजली : सॉरी यार.... ! तेव्हा काही सुचले नाही, असं वाटलं सर्व संपलं आहे, मग जगुन तरी काय करायचं....😔
मेघा : जरा बाकीच्यांचा पण विचार करायचा ना...!
अंजली : सॉरी ना यार...! आता हेच ऐकावं लागणार आहे का इथून पुढे नेहमी....!
मेघा : हो...! चुक केलीय तर, ऐकावं लागणारच...!😏
अंजली : बरं बाई....! 😔
* ते लोक बोलत असतात तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात, त्या दोघांना बाहेर पाठवतात. तिचे चेकअप झाल्यावर थोड्या वेळाने मेघा आणि सिद तिला भेटून घरी जातात. त्या रात्री मॉम आणि डॅड हॉस्पिटल मधेच थांबणार होते, म्हणुन घरी जाताना मेघा अंजूच्या छोटया बहिणीला त्यांच्या शेजाऱ्यांकडून आपल्या घरी घेऊन जाते. मॉम डॅड रात्रभर हॉस्पिटल मधेच थांबले होते. आजचा दिवस डॉक्टरांनी अंजुला फक्त ज्यूस किंवा लिक्वीड फूड घेण्यास सांगितले होते. म्हणुन डॅड तिच्यासाठी बाहेरून ज्यूस आणण्यासाठी जातात. येताना त्यासोबत मॉमसाठी सँडविच पण आणतात.
त्या वेळेत तिला आता आयसीयू मधुन एका स्पेशल रूम मधे शिफ्ट केलं होतं. डॅड ते सर्व घेऊन तिथे पोचतात. ते ज्युस काढून मॉम कडे देतात.
मॉम तिला ते ज्युस प्यायला देतात. तिचे डॅड मॉम ना ते सँडविच खाण्याचा आग्रह करतात. पण मॉम ते खात नाहीत. थोड्या वेळाने अंजुची झोप लागते.
त्या रूम मधे फॅमिली साठी एक बेड होते. मॉम खुप वेळ अंजलीच्या बाजुलाच टेबलवर बसल्या होत्या. डॅड तिथेच बेडवर बसलेले होते. रात्रीचे बारा वाजुन गेलेले होते. डॅड पुन्हा एकदा मॉम ना ते सँडविच खाण्याचा आग्रह करतात, पण मॉम पुन्हा नकार देतात. मग ते मॉम ना थोडा वेळ झोप असं बोलुन तिथून उठवून स्वतः अंजुजवळ बसतात.
मॉम त्या बाजुच्या बेडवर जाऊन पडतात. त्यांची झोप तर लागत नव्हती, एका कुशीवर होऊन त्या बाप लेक दोघांना पहात होत्या. आज खुप दिवसांनी त्यांच्या डोळ्यांतील अंजूबद्दलचे प्रेम त्यांना दिसत होते. ते पाहुन त्याचं मन पण भरून आलं होतं.
काही वेळाने ते मेन लाइट बंद करतात. आणि नाईट लॅम्प चालु करतात. रात्री उशिरा मॉमची पण झोप लागते. डॅड तिच्या बाजुलाच टेबलवर बसुन तिथेच बेडवर डोके ठेवून अंजुचा हात पकडून झोपलेले असतात.
मध्यरात्री अंजुला जाग येते, ती डोळे उघडुन पाहते, तर डॅड तिचा हात पकडून तिथेच अवघडल्या अवस्थेत झोपले होते. बाजुच्या बेडवर मॉम झोपल्या होत्या. डॅड ना तसं पाहून तिला रडू येऊ लागलं होतं. मनात स्वतःचा राग पण येत होता. कारण काही तासांपूर्वी या व्यक्तीचा मनातुन ती किती तिरस्कार करत होती. तिला मनापासून वाटत होतं की, माझ्यामुळे त्यांची हि अवस्था झाली आहे. म्हणून आत्ताच त्यांना उठवून त्यांची माफी मागावी.
ती त्यांच्या हातातील आपला हात काढून घेण्याचा प्रयत्न करते, त्या हालचालीमुळे लगेच त्यांना जाग येते. ते ऊठुन अंजुकडे पाहतात आणि बोलतात...
डॅड : काय झालं बेटा...? बरं वाटतंय ना...?
अंजली : हो डॅड...! मी ठिक आहे. पण तुम्ही का थांबलात...? मॉम होती ना इथे...! तुम्ही जायचं ना घरी.
डॅड : तु इथे असताना घरी जाऊन तिथे माझी झोप लागली असती का बेटा....?
* त्यांचं ते शब्द ऐकुन अंजु अजुनच भाऊक झाली आणि रडत रडतच बोलली.
अंजली : सॉरी डॅड...! माझ्यामुळे हे सर्व...!😥
* तिला असं रडताना पाहून ते तिच्या जवळ जातात तिला उठवून बसवतात. आणि तिचे डोके आपल्या छातीशी कवटाळून घेत तिला बोलतात.
डॅड : ते जाऊ दे ना बेटा...! आमच्यासाठी तु सुखरूप आहेस ते महत्त्वाचं आहे. सो रिलॅक्स...अँड डोन्ट क्राय.... ओके, आणि हो... तुझ्यामुळे आम्ही आहोत.
आणि तु आमच्या जगण्याचं एकमेव कारण आहेस बेटा. वी लव यू सो मच....😥
* त्यांच्या या अशा बोलण्याने ती अजुनच रडायला लागते. ते तिला शांत करत असतात. आणि मॉम कधीच्या जाग्या होऊन बाजूच्या बेडवरून त्या दोघांना पहात असतात. हे सर्व पाहून त्यांचेही डोळे भरून आलेले असतात.
त्यांचा स्वभाव भलेही रागीट असला तरी, अंजलीवरच त्यांचं प्रेम आज अशा प्रकारे व्यक्त झालेलं त्या पाहत होत्या.
थोडा वेळ त्या दोघांना तसेच लांबुन पहात असतात. मग काही वेळाने त्या अंजुजवळ येतात. डॅड ना बेडवर जाऊन झोपायला सांगतात, आणि त्या स्वतः तिच्याजवळ बसतात.
रात्रीची नीरव शांतता असते. मॉम तिला थोडं पाणी प्यायला देतात आणि तिला खाली झोपवतात. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला झोपायला सांगतात. पण तिला झोप येत नसते. म्हणुन ती मॉमला एक गाणं बोलण्याचा आग्रह करते.
मॉम पण हळु आवाजात तिच्यासाठी एक गाणं गुणगुणतात....
" चंदा है तू, मेरा सूरज है तू,
ओ मेरी आँखों का तारा है तू,
चंदा है तू, मेरा सूरज है तू,
ओ मेरी आँखों का तारा है तू,
जीती हूँ मैं बस तुझे देखकर,
इस टूटे दिल का सहारा है तू,
चंदा है तू, मेरा सूरज है तू,
ओ मेरी आँखों का तारा है तू...."
* खुप दिवसांनी आज अंजु मॉम च्या आवाजातील हे गाणं ऐकत होती. ते ऐकता ऐकता तिला कधी झोप लागली हे कळलच नाही. तिची झोप लागलीय हे पाहून मॉम तिच्या अंगावरील चादर नीट करतात.
डॅड बेडवर झोपलेले असतात. त्यांच्या उशाला असलेली चादर त्यांच्या अंगावर पांघरतात. आणि पुन्हा येऊन अंजलीच्या बेडजवळ येऊन बसतात.
प्रेम आणि अंजली यांच्या नात्याचं आता पुढे काय होणार या विचाराने त्यांना झोप येत नव्हती.
अखेरीस पहाटे कधी त्यांचा डोळा लागला आणि त्या तिथेच बेडवर डोके ठेवून झोपुन गेल्या होत्या.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️