Anubandh Bandhanache - 45 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 45

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 45

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४५ )
       दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून प्रेम ऑफिसला जायला निघतो. वाटेत तो त्या बस स्टॉप वर थांबतो. दोन तीन बस निघुन जातात. पण एकाही बसमध्ये वैष्णवी नव्हती. 
ऑफिसची वेळ तर झाली होती. तरीही ती आली नव्हती. याचा अर्थ ती आज येणार नाही, असं समजून तो तिथून ऑफिस मधे येतो. 
तो आत जाऊन पाहतो तर तिथेही ती नसते. तिला कॉन्टॅक्ट पण करू शकत नव्हता. कारण तिच्याकडे मोबाईल तर नव्हताच पण घरचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिने कधी दिला नव्हता. 
"कालच्या सर्व प्रकारामुळे आज ती आली नाही...! तिने जॉब तर सोडला नाही ना...?" असा विचार त्याच्या डोक्यात येत होता. 
त्याला आता अजुन टेन्शन येऊ लागले होते. उगाच तिला प्रपोज केला, असं वाटू लागलं होतं. 
पण आता त्यावर विचार करून काहीच उपयोग नव्हता. जे घडायचं ते घडून गेलं होतं. 
आपण केलेल्या घाईमुळे एक चांगली मैत्रीण पण गमावून बसलो, असं त्याला वाटू लागलं होतं.
आज ऑफिस मधे बोलायला सोबत कोणी नव्हते. त्यामुळे आजचा पूर्ण दिवस त्याचा खुप बोरिंग जात होता, वेळ जाता जात नव्हता. 
कसाबसा दिवस भरून संध्याकाळी तो घरी निघुन येतो. रात्री जेवण वैगेरे झाल्यावर तो आरवकडे जातो.
दोघे मैदानात बसुन गप्पा मारत असतात. प्रेमचा पडलेला चेहरा पाहून आरव त्याला विचारतो...
आरव : काय रे...! काही झालयं का...? मुड का ऑफ आहे तुझा आज...?
प्रेम : काही नाही रे...?
आरव : तुला सांगायचं नसेल तर नको सांगु. कारण हल्ली तु खुप गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवतोय. हे लक्षात येतं आम्हाला...!
प्रेम : अरे...! मी काही लपवत नाही...! खरच एवढं काही झालेलं नाही. 
आरव : बरं...! मागचं जाऊ दे सर्व...! आज काय झालं आहे ते बोल...? आणि जर तुला खरच नसेल सांगायचं तर मी पुन्हा कधीच विचारणार नाही तुला.
प्रेम : अरे यार...! काय चाललंय तुझं....!
आरव : आधी तुझं काय चाललंय ते बघ...! पुन्हा एकदा विचारतोय...! काय झालं...?
प्रेम : बरं सांगतो...!
आरव : आता कसं....! बोल आता डोक्यात काय चाललंय ते...!😊
प्रेम : मी काल ऑफिस मधल्या एका मुलीला प्रपोज केला. ?
आरव : काय बोलतो....! खरच की काय...! काय झालं मग...! हो तर बोललीच असेल ती, कारण एवढ्या हँडसम मुलाने प्रपोज केल्यावर कोणती मुलगी नकार देईल....! 
प्रेम : असं काही नाही...! तिने नकार दिला मला. 
आरव : काय बोलतो...! तुझ्यासारख्या मुलाला कसं काय नकार देऊ शकतात मुली...?🤔 कॉलेज मधे तर लाईन लागायची मुलींची...! तिला सांगितलं नाहीस का तु हे...! 
प्रेम : मस्करी करू नकोस...! 
आरव : बरं ओके...! मला नीट सांग आता...! कोण मुलगी आहे ती...? नाव काय तिचं...? आणि कुठे राहते ती...?
प्रेम : वैष्णवी नाव आहे तिचे...! ऑफिस मधे अकाऊंट चे काम करते. राघव राहतो तिकडेच जवळपास कुठेतरी राहते. 
आरव : आणि हे कधीपासून चालू आहे तुझं...? आत्ता मी विचारलं म्हणुन सांगतोय ना...! 
प्रेम : अरे...! मी कालच तर विचारलं ना तिला...! 
आरव : असं अचानक तुला ती आवडायला लागली आणि तु लगेच तिला विचारलं...! असं कसं...?🤔
प्रेम : अरे यार...! एकत्र काम करतोय गेले काही महिने, थोडी मैत्री झाली...! मग वाटलं मला...! म्हणून विचारलं...!
आरव : अच्छा....! या आधी तर कधी बोलला नाहीस तिच्याबद्दल...?🤔
प्रेम : ते आधीचे जाऊ दे...! आत्ता बोलतोय ना...!
आरव : बरं ठिक आहे...! मला आता नीट सांग काल काय झालं ते...!
 * प्रेम त्याला काल घडलेलं सर्व काही सांगतो. त्याचे सर्व बोलणे ऐकून झाल्यावर आरव त्याला बोलतो...
आरव : तुला खात्री होती, ती तुला होकार देईल याची...?
प्रेम : मग उगाच तिला विचारलं का मी...?
आरव : अरे...! जर तुला तिला विचारायचं होतं तर, लगेच लग्नाचा विषय का काढलास...? एवढी काय घाई झाली आहे तुला...? ते सर्व नंतर पण बोलू शकला असता ना...!
प्रेम : अरे पण मला तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणूनच विचारलं ना...!
आरव : अरे... मुर्खा...! पण एवढी काय घाई झाली आहे तुला अचानक लग्नाची...?🤨
प्रेम : हो...! आहे घाई...! अजुन किती दिवस ताईकडे राहणार मी...? काही दिवसांनी मी आई आणि लहान भावाला गावावरून इकडे घेऊन येणार आहे. 
आरव : का रे...! असं अचानक ठरलं...! 
प्रेम : अचानक नाही...! मी आधीच विचार केला होता याचा...! त्यांना इकडे घेऊन यायचच होतं मला. त्यासाठी भाड्याने रूम पण बघतोय. 
आरव : भेटली का रूम मग...?
प्रेम : हो...! रमेश ला बोललो होतो, त्यांच्या चाळीत संजय दादा रहात होता ना, त्याची रूम रिकामी आहे. उद्या संध्याकाळी चावी मिळेल बोलला.
आरव : फास्ट काम आहे तुझं तर...! भाडे किती...? आणि डिपॉजीट चे काय...?
प्रेम : अरे...! दादा बोलला की, मला रूम द्यायची नव्हती भाड्याने...! पण तुला हवी आहे, म्हणुन मी देतोय, आणि डिपॉजीट वैगेरे नको बोलला. भाडे... तुला द्यायचे ते दे....! असं बोलला तो...
आरव : मग बाकीचं कसं मॅनेज करणार आहेस...? आई आणि भाऊ आल्यावर घरखर्च पण वाढेल, महिन्याला काहीतरी भाडे द्यावे लागेलच ना त्यांना...
प्रेम : हो...! ते तर आहेच, पण होईल मॅनेज...! सध्या तरी त्याला दोन हजारच देईन काही महिने, पुढे बघु मग.
आरव : बरं मला एक गोष्ट सांग...! त्यांना इकडे घेऊन येतोय हे खुप चांगलं आहे. पण यात तुला लग्नाची का घाई झालीय, ते काही मला कळलं नाही.
प्रेम : अरे...! आईला आता आधीसारखे घरातले काम नाही जमत. आणि इथल्या वातावरणाची तिला सवय नाही त्यामुळे तिला काही दिवस थोडा त्रास होणारच, एवढी वर्षे ती गावी राहिली आहे. आणि इथे आल्यावर तिघांचे जेवण, कपडे, घरातले काम तिला जमणार नाही. म्हणुन मी हा विचार करत होतो.
आरव : तुझ्या या निर्णयाचे मलाच आश्चर्य वाटत आहे. एवढ्या मुली मागे लागल्या होत्या त्यांना तु कधी भाव दिला नाहीस. आणि आता डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज केलास त्या मुलीला....!🤔 
प्रेम : मग काय करू....? कधीतरी लग्न करायचं आहे ना...! मग....!
आरव : बरं...! ओके...! मला आता एक गोष्ट सांग...! तुला खरच ती मुलगी मनापासून आवडली आहे का...? लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न आहे. तु असा घाईघाईत निर्णय घेतला आहेस, म्हणुन विचारतोय मी.
प्रेम : आरव...! मी जास्त काही विचार केलेला नाही, पण ती मुलगी गरीब घरातील आहे, स्वभाव चांगला आहे. मला वाटलं तिच्याकडे पाहून की, ती माझ्या या परिस्थितीत माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होईल. पण तिने नकार दिला. 
आरव : तु जर एवढं बोलत आहेस तिच्याबद्दल तर मला एकदा तिला भेटावच लागेल. 
प्रेम : मला नाही वाटत की, तिची पुन्हा भेट होईल...!
आरव : का...? असं का बोलतोय तु...?🤔
प्रेम : काल मी तिला प्रपोज केला, आणि आज ती ऑफिसला आली नाही. उद्यापासून ती येईल की नाही तेही सांगता येत नाही.
आरव : असं काही नसेल...! हा... तिला थोडं टेन्शन आलं असेल कालच्या प्रकारामुळे, म्हणुन ती आज आली नसेल. पण उद्या नक्की येईल ती ऑफिस ला. माझी खात्री आहे. 
प्रेम : कशावरून येईल ती...? 
आरव : माहित नाही पण मला तर मनापासून वाटतं ती येईल, फक्त तु पुन्हा काही कांड करू नको. तु फक्त एकदा मला तिची भेट घालुन दे. मग मी बघतो. 
प्रेम : अच्छा...! काय करणार आहेस तु असं...? 🤔
आरव : ते मी बघेन काय करायचं ते...! माझं प्रेम अधुरं राहिलं, निदान तुझ्यासाठी तरी मी नक्की प्रयत्न करेन. 
प्रेम : म्हणजे तु अजुन विसरला नाहीस तिला....!
आरव : नाही विसरता येत रे, एवढ्या सहज....!
प्रेम : जाऊदे....! आपण अखेरपर्यंत प्रयत्न केले तिला मिळवण्यासाठी. पण ती शेवटी नाही आली. मजबुर होती बिचारी, तु सांग तिच्या आईवडिलांनी तिला जर आम्ही आत्महत्या करु असं बोलुन ब्लॅकमेल केलं नसतं तर ती थांबली नसती. तु पण समजुन घे तिला. आणि आता तिचं लग्न झालंय, त्यामुळे तु पण जेवढ्या लवकर तिचा विचार डोक्यातून काढून टाकशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. आता ती पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. हेच सत्य आहे. आणि हे काही केल्या बदलणार नाही.
आरव : हो...! मला माहित आहे रे...! पण नाही विसरु शकत तिला, एवढ्या वर्षांचं रिलेशन होतं, नाही विसरता येत.
प्रेम : ठिक आहे ना...! पण सत्य पण स्वीकारावं लागेलच ना...! 
आरव : हो...! तेच करतोय सध्या, पण त्रास तर होतोच....! बरं ते जाऊदे....! तुझं बोल...! उद्या जर ती मुलगी आली ऑफिस ला तर तु फक्त नॉर्मल रहा. जास्त काही बोलू नको झालेल्या प्रकाराबद्दल. 
प्रेम : ठिक आहे ते...! पण आली तर पाहिजे ती...!
आरव : येईल ती...!
प्रेम : चल तु बोलतोय तसं....! मी नाही जास्त काही बोलणार तिला. जर आलीच तर...!
आरव : थोडे दिवस नॉर्मल रहा. पुढे बघु आपण काय करायचं ते. आणि असं तोंड पाडून बसू नको, मी आहे तुझ्यासोबत....😊
प्रेम : बरं...! मी निघतो आता...!
आरव : ठिक आहे...! उद्या भेट मला.... संध्याकाळी ऑफिस मधुन आल्यावर.
प्रेम : हो....!
 * असं बोलुन प्रेम तिथून घरी येतो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो ऑफिसला जायला निघतो. नेमका त्या दिवशी त्याला उशीर होतो. घाईघाईत तो ऑफिसला पोचतो. आतमध्ये एंट्री करताच त्याला वैष्णवी तिथे दिसते. तिला पाहून त्याचं टेन्शन थोडं हलकं होतं. 
तो आत येऊन टिफीन ठेऊन बाप्पाच्या फोटोला नमस्कार करतो. वैष्णवी तिचं काम करत असते. ती त्याच्याकडे पहातही नाही. त्याला तिच्याशी काय बोलावं ते सुचत नव्हतं. थोडा वेळ इकडे तिकडे करत शेवटी न राहवून तो तिच्या बाजुला जाऊन तिला बोलतो....
प्रेम : वैष्णवी....! परवा जे काही झालं त्याबद्दल खरच सॉरी, मला माझ्या मनात जे होतं ते तुला बोलायचं होतं. तुला त्याबद्दल वाईट वाटलं असेल तर पुन्हा एकदा मी माफी मागतो. माफ कर मला....🙏🏻
वैष्णवी : ठिक आहे....! जे झालं ते झालं...! पुन्हा तो विषय नकोय मला....!
प्रेम : म्हणजे तु मला माफ केलं...!🙂
वैष्णवी : हो...! असच समज...! पण पुन्हा पुन्हा ती चुक करू नको.
प्रेम : नाही करणार...! पण आपण आधीसारखे मित्र तर आहोतच ना....?
वैष्णवी : हो....! 
प्रेम : थँक गॉड....!🙏🏻
वैष्णवी : इट्स ओके., आता थोडं काम करूया...! कालचे पण काम पेंडिंग आहे माझे...!
प्रेम : बरं ओके....! पण एक विचारू....?
वैष्णवी : आता काय....? 🤨
प्रेम : काल का आली नाहीस....?
वैष्णवी : असच....! बरं वाटत नव्हतं जरा.
प्रेम : नक्की, हेच कारण होतं...?
वैष्णवी : हो....!
प्रेम : बरं ओके...! आता ठिक आहेस ना....?
वैष्णवी : हो....!
प्रेम : ओके....!
 * प्रेम पुढे तिच्याशी जास्त काही बोलत नाही. काही दिवस असेच निघुन जातात. वैष्णवी आता थोडी नॉर्मल झाली होती. ती आधीसारखी त्याच्याशी बोलू लागली होती. प्रेम ने पुन्हा कधी हा विषय तिच्यासमोर काढला नाही, त्यामुळे दोघेही आता नॉर्मल फ्रेंड म्हणुन एकमेकांशी बोलत होते.
काही दिवसांनी प्रेमचा वाढदिवस होता. त्याच्या दोन दिवस आधीच आरव प्रेमला भेटुन त्या दिवसासाठी एक प्लॅन करतो आणि प्रेमला सांगतो की तु तिला त्या दिवशी आपण सर्वांचे बर्थ डे सेलिब्रेट करतो त्याचं हॉटेल मधे बोलव. 
एक दिवस प्रेम तिला हे सर्व सांगतो. आधी ती नाही बोलते, पण थोडी रिक्वेस्ट केल्यावर ती यायला तयार होते. 
अखेरीस तो दिवस येतो. प्रेम ने त्या दिवशी सुट्टी घेतली होती. सकाळी ऊठुन अंघोळ वैगेरे झाल्यावर ताईने त्याचे औक्षण केले. त्यानंतर तो आरव सोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाऊन आला.
संध्याकाळी फ्रेश होऊन तो आरव सोबत त्या हॉटेल मधे पोचला. ठरल्याप्रमाणे सर्वजण एक एक करून येत होते आणि प्रेमला विश करत होते. हितेश, ताई, मम्मी, रमेश, राघव, शैला, सुचिता, ललिता हि सर्व गँग तिथे पोचली होती.
हॉटेलमधे फॅमिली रूम मधे सर्वजण गप्पा मारत बसले होते. वैष्णवी अजुन आली नव्हती. प्रेम तिचीच वाट पहात खिडकीतून बाहेर बघत होता. त्याच्याकडे पाहून आरव बोलतो.
आरव : अरे येईल ती... काळजी नको करू. 😊
मॉम : अरे...! कोण येणार आहे अजुन...! सर्वजण तर आलेत. 
आरव : अहो मम्मी...! तुमची होणारी पहिली सुन येणार आहे. तिचीच वाट बघत आहे तो...!
मॉम : काय बोलतोय...! खरच का रे प्रेम...? 
प्रेम : मॉम...! त्याचे काही ऐकु नका तुम्ही, ऑफिसमधील मैत्रीण आहे ती फक्त.
आरव : फक्त मैत्रीण....? मग प्रेपोज कोणी केलेला...?
ताई : काय बोलताय तुम्ही,.. नक्की काय प्रकार आहे हा...?
आरव : ताई...! मी सांगतो...! आता जी मुलगी इथे येणार आहे. ती प्रेमची फक्त मैत्रीण आहे. त्यामुळे तुम्ही काही वेगळा अर्थ काढू नका, असं त्याचं म्हणणं आहे....!😊
मम्मी : मग तू असं का बोलला मघाशी....?
आरव : ते असच जरा मस्करी केली त्याची...!
ताई : म्हणजे ती प्रेमची फ्रेंड आहे तर....! पण कधी येणार आहे ती...? तिला नीट सांगितलं आहे ना इथे यायला. 
आरव : अगं ताई....! माहित आहे तिला..., ती पण आपल्याच कॉलेज मधे..., म्हणजे आपण जेव्हा कॉलेज मधे होतो तेव्हा ती आपल्याच कॉलेज च्या स्कूल मधे शिकत होती. फक्त तेव्हा आपली आणि तिची ओळख नव्हती...., एवढच...!
मम्मी : अच्छा...! असं आहे का...! तरीही प्रेम तु जरा बाहेर बघुन ये बरं एकदा, बिचारी येऊन बाहेर वैगेरे थांबली असेल तर....
 * त्यांना हो बोलुन प्रेम बाहेर जायला निघतो तेवढ्यात सर्वजण त्याला चिडवायला लागतात. ते पाहून प्रेम परत येऊन सर्वांना बोलतो.
प्रेम : हे बघा...! माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, ती मुलगी पहिल्यांदा आपल्या ग्रुप मधे येतेय. आणि मी खोटी खोटी का होईना पण आपल्या ग्रुप मधील सर्वांचीच तिच्यासमोर खुप तारीफ केली आहे, त्यामुळे तिच्यासमोर मी तोंडावर पडेल असं काही वागू किंवा बोलू नका.... प्लिज. 🙏🏻
 * त्याचे बोलुन झाल्यावर सर्वजण पुन्हा एक सुरात बोलतात.....! " ओ.... हो.....! "
तो त्यांना इग्नोर करून हॉटेलच्या बाहेर येतो आणि तिथे थांबुन तिची वाट पाहतो.
तेवढ्यात इकडे हॉटेल मधे आरव सर्वांना त्यांच्याबाबतीत घडलेला सर्व प्रकार सांगतो. प्रेमला त्या मुलीशी लग्न करायचं आहे, पण तिने त्याला लग्नाला नकार दिला आहे, पण सध्या तरी ते दोघे फक्त मित्रच आहेत, पण आपणा सर्वांना तिला कनवेंन्स करायचे आहे, आणि जर ती त्याला लग्नासाठी हो बोलली तर, आपल्याकडून त्याच्या बर्थडे चे सर्वात मोठे गिफ्ट असेल. पण जरा सांभाळून बोला तिच्याशी, कारण तिचे आधी एक लग्न कोणत्यातरी कारणावरून मोडले होते. त्यामुळे तिच्यासाठी हा विषय जरा नाजूक आहे 
मॉम : अरे पण जे झालं ते झालं....! पण तिने माझ्या एवढ्या गोंडस मुलाला नकार कसा काय दिला...? तिला माहित नाही का..., कॉलेज मधे माझ्या मुलाच्या मागे कशी लाईन लागायची मुलींची ते....!
ताई : हो... ना...! मला पण आता बघायचच् आहे तिला, अशी कोण आहे ती...! याने तर डायरेक्ट लग्नासाठी विचारलं आहे तिला....! असं अचानक प्रेम ने लग्नाचा निर्णय का घेतला असावा बरं...! 
आरव : ते मी सांगेन नंतर.... पण आता जरा सांभाळून घ्या तिला सर्वजण, पहिल्यांदा आपल्या ग्रुप मधे ती सामील होतेय.
 * त्याच्या बोलण्याला सर्व प्रतिसाद देत असतात. तेवढ्यात प्रेमसोबत एक सुंदर गोरीपान मुलगी चालत त्यांच्या टेबलजवळ येत होती...
ग्रुप मधील सर्वजण त्या दोघांना पहातच राहतात. ते दोघेही टेबल जवळ येतात. प्रेम एक एक करून तिची सर्वांशी ओळख करून देत होता. सर्वात आधी मम्मीची ओळख करून देतो. मग बाकी सर्वांची......
वैष्णवी थोडीशी घाबरलेल्या अवस्थेत दिसत होती. म्हणुन मम्मीने तिला जवळ घेऊन तिच्या गालावरून तसेच डोक्यावरून हात फिरवत तिला आपल्या बाजुला बसवले. सर्वजण तिच्याकडे असे एकटक पहात होते, त्यामुळे तिला थोडं वेगळं वाटत होतं. ती मधेच समोर बसलेल्या प्रेमकडे पहात होती. तिला थोडं रिलॅक्स करण्यासाठी आरव बोलतो...
आरव : वैष्णवी....! तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटत आहे की, तु थोडीशी अनकंफर्टेबल फील करत आहेस. पण रिलॅक्स हो...! तु पहिल्यांदा आमच्या ग्रुप मधे आली आहेस. म्हणुन आम्हा सर्वांकडून तुझं आमच्या ग्रुप मधे अगदी मनापासून स्वागत आहे. सो... वेलकम. 😊
वैष्णवी : थॅन्क्स आरव...! 🙂
मम्मी : तुम्ही दोघे एकाच कंपनीत जॉब करताय ना...?
वैष्णवी : हो....!🙂
मम्मी : छान...! पण एक गोष्ट सांगु मी...!
वैष्णवी : बोला ना....! 
मम्मी : खुप सुंदर दिसत आहेस तु.....! अगदी दृष्ट लागण्यासारखी....! 😊
 * मम्मीचे ते शब्द ऐकून ती थोडी लाजून खाली बघते. त्यानंतर हळु हळु एक एक करून सर्वजण मिळुन तिच्यावर प्रश्नांचा वर्षाव करतात. त्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देत ती स्वतःबद्दल सर्व काही सांगत होती. त्या सर्वांशी बोलुन आता ती थोडी रिलॅक्स झाली होती. 
स्टार्टर स्नॅक्स टेबलवर आला होता. ते खात खात त्यांच्या गप्पा चालुच होत्या, थोड्या वेळाने आरव बाजुच्या टेबल वर ठेवलेला केक उचलुन त्यांच्या टेबल वर मधोमध ठेवतो.
केक चा बॉक्स ओपन करून आरव प्रेमला केक कापायला सांगतो. सर्वजण उभे राहतात. प्रेम केक कट करतो तसे सर्वजण टाळ्या वाजवत बोलतात...
हॅप्पी बर्थ डे टु यू....! 👏🏻
हॅप्पी बर्थ डे टु यू....!👏🏻
हॅप्पी बर्थ डे टु यू....! 👏🏻
डिअर प्रेम...!👏🏻
हॅप्पी बर्थ डे टु यू....!👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
प्रेम केक चा एक छोटा पिस कट करून मम्मीना भरवतो. मम्मी पण त्याला केक भरवतात. त्यानंतर एक एक करून सर्वजण त्याला केक भरवतात. सर्वात शेवटी वैष्णवी पुढे येऊन त्याला केक भरवते, आणि सोबत आणलेले गिफ्ट देऊन त्याला विश करते. बाकी सर्वजण पण आपले आपले गिफ्ट त्याला देतात. 
डिनर ची ऑर्डर दिलेली असते. त्यासाठी थोडा वेळ लागणार असतो. त्या वेळेत प्रेम सर्वांचे गिफ्ट बॉक्स ओपन करत असतो. त्यामध्ये कोणी शर्ट, टी शर्ट, परफ्यूम, शो पीस, असे वेगवेगळे गिफ्ट आलेले असतात. शेवटी तो वैष्णवी ने दिलेले गिफ्ट बॉक्स ओपन करतो. त्यामध्ये एक छान बाप्पाची मूर्ती होती. आणि त्यासोबत एक छान मॅसेज असलेले ग्रिटींग कार्ड होते. ते वाचुन झाल्यावर तिच्याकडे पाहून स्माईल करत तिला नजरेनेच थॅन्क्स बोलतो.
सर्व गिफ्ट पाहून झाल्यावर ते आवरून पुन्हा बॅग मधे ठेवले जात होते. 
मधेच आरव रमेश ला काही इशारा करतो. रमेश प्रेमला बोलतो...
रमेश : प्रेम...! चल जरा आपण बाहेर जाऊन येऊ...!
प्रेम : का...! काय झालं....!
रमेश : अरे...! मी तुला गिफ्ट घ्यायला गेलो होतो, पण मी जरा कंफ्युज होतो, तेच घ्यायचे आहे.
प्रेम : अरे...! राहु दे आता, एवढे सर्व गिफ्ट आलेत ना...! 
रमेश : पण त्यात माझे गिफ्ट नाही आहे...! तु चल, इथे बाजुलाच शॉप आहे, तिथेच जायचं आहे, लगेच येऊ.
 * रमेश काही ऐकत नाही हे पाहून प्रेम त्याच्यासोबत बाहेर जातो. रमेश त्याला थोड्या अंतरावर असलेल्या एका कपड्यांच्या शॉप मधे घेऊन जातो. त्याला त्याच्यासाठी टी शर्ट घ्यायचा असतो. 
तो दुकानदार खुप प्रकाराचे टी शर्ट काढून त्यांना दाखवतो. प्रेम त्याच्यातला एक पसंत करतो, पण रमेश मुद्दाम तो बरोबर नाही म्हणुन ठेऊन देतो. 
त्याला पुन्हा दुसऱ्या शॉप मधे घेऊन जातो. तिथे जाऊन पण रमेश थोडा टाईम पास करतो. 
कारण प्रेमला हॉटेल मधुन बाहेर घेऊन येणं हि सर्व आरव आणि रमेश ची प्लॅनिंग होती. कारण तो नसताना वैष्णवी सोबत बोलता यावं म्हणुन...
प्रेमला याची कल्पना नव्हती, पण तिला असं एकटीला सर्व ग्रुप मधे सोडुन तो एवढा वेळ बाहेर होता, त्यामुळे त्याला थोडं टेन्शन आलं होतं. पण रमेशला काही टी शर्ट पसंत पडत नव्हता. तो त्याला अजुन दुसऱ्या शॉप मधे घेऊन जात होता, आणि तिथेही त्याचा टाईम पास चालु होता. 
इकडे हॉटेल मधे मात्र वातावरण जरा गंभीर झाले होते. आरव ने वैष्णवी सोबत बोलायला सुरुवात केली होती......

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️