अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५० )
सकाळी दादा उठल्यावर ती पुन्हा त्याला बोलते...
वैष्णवी : दादा प्लीज... मला त्या माणसाशी लग्न नाही करायचं आहे. मी तुमच्या पाया पडते...🙏🏻
दादा : तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का...? आमचा निर्णय झालेला आहे. तुला हे लग्न करावच लागेल.
वैष्णवी : मी मरून जाईन पण अशा माणसाशी लग्न करणार नाही.
आई : बाय... असं नको ग बोलू...
वैष्णवी : मग काय करू...! तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही.
दादा : अजून किती त्रास देणार आहेस आम्हाला, झालं तेवढं पुरेसं नाही का..? अजुन काय बाकी आहे का...?
वैष्णवी : दादा फक्त यावेळी समजून घे प्लीज.
दादा : मग अजुन किती वर्ष थांबायचं...? लोकं आम्हाला बोलतात.
वैष्णवी : फक्त एवढं वर्ष जाऊ दे, माझ्यासाठी प्लीज....🙏🏻
दादा : हे बघ मला काय तुझे वाईट करायचे नाही. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच करतोय सर्व. आणि कधीतरी हे करावच लागणार आहे. आणि ठिक आहे, तुला जर हा मुलगा पसंत नसेल तर मी नाही म्हणून सांगतो त्यांना. पण हे शेवटचं...
वैष्णवी : चालेल... मला.
दादा : फक्त एवढं सांग की, नकार देण्याचं कारण एवढच आहे की, अजुन काही आहे. तसे असेल तर आत्ताच सांग.
* दादाच्या अशा बोलण्यावर तिला प्रेम बद्दल सर्व सांगावे का ? असा प्रश्न पडला... हिच वेळ आहे आणि कधीतरी सांगावं लागणारच आहे. मग आत्ताच सांगू... जे काही होईल ते होईल. असा विचार करून ती एक मोठा श्वास घेऊन बोलू लागते...
वैष्णवी : दादा...! रागावणार नसशील तर मी एक गोष्ट बोलू...!
दादा : म्हणजे आहे का काही बाहेर तुझे प्रकरण... जे झाले ते पुरेसं नव्हतं का...? कोण आहे मुलगा...? काय करतो...? कधीपासून चालले आहे हे...?
वैष्णवी : दादा...! तु जसा विचार करतोय तसे काही नाही, मी काय बोलतेय ते आधी ऐकुन तर घे. मग बोल जे काही बोलायचं ते.
दादा : बोल....!
वैष्णवी : माझ्या आधीच्या कंपनीत एक मुलगा होता. प्रेम देशमुख. नाव आहे त्याचे. कोल्हापूरचे आहेत. त्याने मला लग्नासाठी विचारलं होतं. पण मी तेव्हा नाही बोलले होते. खरं तर खुप चांगल्या फॅमिलीतून आहे. पण त्याची रूम वैगेरे नाही इथे. पण तो स्वभावाने खुप चांगला आहे. तुझ्या लग्नाच्या पूजेला आलेला तो गोरासा मुलगा होता तोच. हवं तर तु त्या मुलाबद्दल चौकशी करू शकतोस. नंतर तुला वाटलं तर त्याबद्दल विचार कर. आम्ही काही दिवस एकाच कंपनीत काम केले आहे. फक्त त्याची परिस्थिती थोडी बिकट आहे. सध्या तो त्याच्या बहिणीकडे राहतो. फक्त माझं एवढच म्हणणं आहे की, एकदा फक्त तु त्याला भेट, त्याच्याबद्दल हवी ती चौकशी कर, जर तुला योग्य वाटलं तरच पुढे जे काही होईल ते...
* पटापट एवढं बोलून ती सुटकेचा श्वास सोडते. पुढे दादा काय बोलणार, त्याची रिऍक्शन काय असेल याचा तिने विचार केला नव्हता...
दादा : आत्ता कुठे आहे तो मुलगा...? आणि तुमच्यामध्ये काही बोलणं झालं आहे का...?
वैष्णवी : तो आधीच्या कंपनीतच आहे. आणि मी त्याला तेव्हाच सर्व काही सांगितले होते. पुढे काही व्हायला नको म्हणुन मी तो जॉब सोडला होता. पण तुला रिक्वेस्ट आहे, इतर मुलांसारखा तो नाही, त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्याच्यावर. आणि मी त्याला नाही म्हटले होते तरी कोणत्याही प्रकारचा त्रास त्याने मला दिलेला नाही. त्यामुळे प्लीज जे इतर मुलांच्या बाबतीत तु केलं आहेस तसे काही करू नको. बाकी तुला हवी तशी त्याची चौकशी कर पण त्याला काही करू नको. मी हात जोडून सांगते तुला.... तुला नाही काही ठिक वाटलं तर मला सांग. पण त्याला काही करू नको....🙏🏻
दादा : ठिक आहे... मी बघतो काय ते...!
* असे बोलुन दादा बाहेर निघुन जातो... जाताना पण वैष्णवी त्याला बोलते.
वैष्णवी : तुला माझी शपथ आहे.... फक्त त्याला काही करू नको.
दादा : हा... ठिक आहे, काही नाही करणार.
* दादा जसा बाहेर गेला तशी तिच्या हृदयाची धडपड वाढत चालली होती. मी बोलून तर गेले सर्व पण पुढे काय होईल आता. प्रेमला याची कल्पनाही नाही. काय करू... त्याला सांगू का कॉल करून असं असं झालं आहे म्हणुन...
असा विचार करत ती मोबाईल शोधायला लागते. मोबाईल भेटल्यावर ती लगेच प्रेमला कॉल लावते. बाजूला आई होती हे देखील ती विसरून जाते. रिंग होत असते, पण प्रेम काही कॉल रिसिव्ह करत नाही, ती पुन्हा एकदा ट्राय करते. तरीही तो कॉल उचलत नव्हता. तिचे टेन्शन अजून वाढते.
मग ती आरवला कॉल करते... तो कॉल उचलतो... घरी घडलेला सर्व प्रकार ती त्याला सांगते. आरव समोरून तिला बोलतो...
आरव : हे बघ वैष्णवी...! तु आधी शांत हो...! आणि जे काही झालं ते चांगलच आहे. कधीतरी हे सांगावं लागणारच होते. आणि करू दे दादाला चौकशी प्रेम बद्दल. त्याला पण खात्री पटू दे की, प्रेम कसा मुलगा आहे.
वैष्णवी : अरे पण त्याने रागाच्या भरात त्याला काही केले तर... त्याची भीती वाटते.
आरव : त्याची काळजी तु नको करू. मी आहे ना... त्याला धक्का सुद्धा लागून देणार नाही कोणाचा, मग तो तुझा भाऊ असला तरी...
वैष्णवी : हो पण... तु किती प्रोटेक्ट करणार त्याला... ऑफिसला जाता येता. बाहेर कुठे असेल तेव्हा...?
आरव : तु घाबरू नको, मी त्याच्या सोबत असेल आजपासून नेहमी... मग तर झालं. तु रिलॅक्स हो, आणि काळजी करू नकोस. तु जसा विचार करतेय तसं काही होणार नाही. दादा फक्त त्याची चौकशी करेल. बाकी त्याला काही करणार नाही.
वैष्णवी : असं झालं तर खुप बरं होईल. पण तु आधी त्याला जाऊन भेट आताच, आणि हे सर्व सांग त्याला... मला तर सुचत नाही काही.
आरव : तुला बोललो ना...! काही होणार नाही. रिलॅक्स....! मी भेटतो त्याला जाऊन ओके...!
वैष्णवी : ठिक आहे...! मी नंतर कॉल करेन त्याला...! मी आता ठेवते फोन..बाय...!
आरव : ओके...! काळजी करू नको, आणि काहीही झालं तरी आधी मला कॉल कर.
वैष्णवी : हो... करेन...! बाय...!
* असं बोलून ती कॉल कट करते. बाजूला तिची आई तिचे हे बोलणे ऐकत होती. ती आईकडे पाहून तिला मिठी मारून रडायला लागते. आई तिला प्रेम बद्दल विचारते... ती आईला त्याच्याबद्दल सर्व काही सांगते.
तिची आई तिला धीर देत बोलते. " मुलगा चांगला असेल आणि तुला पसंत असेल तर मी बोलते तुझ्या दादाला... नको काळजी करू."
आईचे हे बोलणे तिला थोडीशी हिंमत देते.
इकडे प्रेमला या सर्व गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. तो सकाळी ऊठुन कामाला जायच्या तयारीत होता. त्याने वैष्णवीचा मिस कॉल पहिला होता. उशीर होत होता म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
सर्व आवरून टिफीन घेऊन तो बाहेर रोडवर येतो. तिथे आरव बाईक घेऊन उभा असतो.
त्याच्या बाईक वर बसुन ते दोघे एरियातून बाहेर पडतात. मधेच एका ठिकाणी झाडाखाली आरव बाईक थांबवतो. ते दोघेही उतरतात. अशी मधेच बाईक थांबल्याने प्रेमला थोडं टेन्शन येतं... बाईकवरून उतरताच तो आरवला विचारतो...
प्रेम : काय रे... काय झालं..? अशी मधेच बाईक का थांबवलीस.
आरव : थोडं बोलायचं होतं म्हणून...!
प्रेम : का रे...! काय झालं...?
आरव : तुला सकाळी वैष्णवीचा कॉल आला होता ना...?
प्रेम : हो...! आलेला पण मी अंघोळीला गेलो होतो आणि मोबाईल सायलेंट होता.
का...? काही प्रॉब्लेम झालाय का...? तुला कॉल केलेला का तिने...? काय झालं बोल...?
आरव : अरे हो...! एवढा पॅनिक होऊ नको, एवढं काही झालेलं नाही, मी सांगतो...
* असं बोलून त्याने सर्व काही प्रेमला सांगितलं. ते ऐकुन प्रेम अजुनच टेन्शन मधे आला. तो आरवला बोलला...!
प्रेम : आता काय करायचं...?
आरव : वाट बघायची...!
प्रेम : कसली...!🤔
आरव : तुझी चौकशी पुर्ण व्हायची. 😊
प्रेम : हसतोय काय....? नक्की काय चौकशी करणार आहे तो...?
आरव : रिलॅक्स...! करू दे त्याला हवी तशी चौकशी. तसंही तुझा रेकॉर्ड एरिया मधे एकदम छानच आहे. मग कशाला टेन्शन घेतो. होऊ दे त्याचं समाधान, उलट आपला पुढचा मार्ग मोकळा होईल त्यानंतर...!
प्रेम : म्हणजे...?🤔
आरव : अरे...! एकदा का त्याच्या मनाचं समाधान झालं. की मग आपण तिच्या घरी मागणी घालायला तयार...!😊
प्रेम : हो... पण, त्याच्या बाबतीत एवढं सर्व ऐकुन आहे....!
आरव : हे बघ...! तो भाई असेल त्याच्या एरियात. पण आत्ता तो त्याच्या बहिणीसाठी एक भाऊ म्हणुन विचार करेल असं मला वाटतं. करू दे त्याला हवं ते....
प्रेम : मला तर टेन्शन यायला लागलं आहे, होईल ना रे, सर्व नीट...?
आरव : होईल रे...! नको टेन्शन घेऊ. मी आहे ना इथे...! नाही बोलला तर पळवून आणू आणि तुमचं लग्न लाऊन देऊ हे लक्षात ठेव. त्यामुळे काळजी करू नको. रिलॅक्स रहा, तिचा कॉल आला तर, कॉन्फिडन्स ने बोल तिच्याशी... ओके.
चल आता तुला कंपनीत सोडतो. आणि दिवसभरात काही झालं तरी मला कॉल कर, आणि सुटल्यावर मी येईन न्यायला... ओके.
* प्रेम थोडा भाऊक होतो आणि आरवला मिठी मारतो.
आरव त्याला त्याच्या कंपनीत सोडतो. तो वैष्णवीला कॉल किंवा मेसेज करण्याचा विचार करत असतो. पण नाही करत, तो तिच्या कॉलची वाट बघत असतो.
दुपारी वैष्णवीचा कॉल येतो. ती सर्व काही त्याला बोलते. प्रेम पण तिला धीर देत तिच्याशी बोलतो. तिला व्यवस्थित समजावतो आणि तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ ते बोलतात. मग ती कॉल कट करते. त्याच्याशी बोलुन तिला थोडा धीर येतो पण, दादा जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तिच्या जीवात जीव नसतो. या टेन्शन मधे आज ती ऑफिसला पण गेली नव्हती.
दुपारी ती जेवत नव्हती, आईने थोडा आग्रह केल्यावर तिने थोडंसं जेवण केलं आणि आवरून दादाची वाट पहात बसली होती.
इकडे प्रेम कंपनीतून सुटल्यावर आरव त्याला घ्यायला आला होता. त्याने त्याला बाईक वरून घरी सोडले.
रात्रीचे आठ वाजुन गेले होते, दादा अजुन घरी आला नव्हता. आई आणि ती जेवायचे थांबले होते. काही वेळाने तिचा दादा घरी आला. तो कोणाशी काहीच बोलत नव्हता. सर्वजण शांत होते. रात्री जेवण वगैरे झाल्यावर तो बाहेर निघुन गेला.
वैष्णवीला काहीच सुचत नव्हतं. काय होईल पुढे... हाच विचार करत ती रात्री झोपुन गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आवरून ती ऑफिसला जायला निघाली. घराजवळून थोडी पुढे आल्यावर तिने प्रेमला कॉल केला. प्रेम तिला धीर देत होता. "सर्व काही ठीक होईल, काळजी करू नको" ऑफिसला पोहोचेपर्यंत ते दोघे बोलत होते.
दोघेही हे टेन्शन बाजुला ठेवून कामात व्यस्त होण्याचा प्रयत्न करतात. पण डोक्यात तेच विचार चालु होते. कसाबसा तो दिवस जातो. संध्याकाळी घरी जाताना पण ते दोघे बोलतात. सर्व काही ठिक होईल या आशेवर दोघेही घरी पोचतात.
तिच्या घरी रात्री जेवण वगैरे झाल्यावर तिचा दादा तिला बोलतो. त्या मुलाला सांग उद्या संध्याकाळी स्टेशनला मला भेटायला.
वैष्णवी हलक्याच आवाजात ' हो बोलते...
तिला थोडे टेन्शन आले होते पण कधीतरी त्या दोघांची भेट होणारच होती. असा विचार करून ती स्वतःची समजूत काढते.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना ती प्रेमला हे सांगते. प्रेम आरवला कॉल करून सांगतो. तोही त्याच्यासोबत येणार असल्याने प्रेम निर्धास्त होतो.
ठरल्याप्रमाणे प्रेम ऑफिसमधून सुटल्यावर आरव सोबत स्टेशनला पोचतो. तिथे गेल्यावर तो तिच्या दादाला कॉल करतो. तिथेच जवळच असलेल्या एका हॉटेलजवळ तो उभा असतो. प्रेम आणि आरव तिथे पोचतात. प्रेम आणि आरव दादाच्या समोर येताच त्याला हात मिळवतात. तिच्या दादाला असं समोर पाहून प्रेमची थोडी धडधड वाढली होती. पण सोबत आरव असल्यामुळे त्याने स्वतःला सावरले होते.
ते तिघेही आत हॉटेल मधे जाऊन बसतात.
दादा वेटरला तीन चहा आणायला सांगतो. तो लगेच चहा येतो, तिघेही चहा प्यायला सुरुवात करतात... काही वेळाने दादा प्रेम कडे पाहून बोलायला सुरुवात करतो...
दादा : काय नाव तुमचं...?
प्रेम : प्रेम देशमुख....!
दादा : हे कोण आहेत, भाऊ का...?
प्रेम : मित्र आहे... पण भाऊच समजा...!
दादा : बरं....! मी डायरेक्ट मुद्द्याचे बोलतो. तुम्ही दोघांनी ठरवलं आहे लग्न करायचं म्हणून....
प्रेम : हो...! तुमची तयारी असेल तर...!
दादा : आणि जर मी नाही बोललो तर...!
प्रेम : तर काय... ! तसा पुढचा विचार केला नाही आम्ही...! ती आधीच बोलली होती, घरातले तयार झाले तरच पुढे जाऊ.
दादा : तुम्हाला तिच्याबद्दल सर्व काही माहीत आहे असे समजू मी...!
प्रेम : म्हणजे तिने जवळपास सर्व काही सांगितले आहे तिच्याबद्दल....!
दादा : तिचे एकदा लग्न मोडले आहे हे सांगितले होते का तुम्हाला...?
प्रेम : हो....! सांगितले होते.
दादा : तुम्ही कारण नाही विचारले....!
प्रेम : नाही...! तशी गरज वाटली नाही.
दादा : पण माहीत असावं म्हणुन मी तुम्हाला सांगतो. तेव्हा पण तिच्या मर्जीने तिने मुलगा पसंत केला होता. पण काही दिवसात त्यांच्यात काही वाद झाले आणि ते लग्न मोडलं. मी तिचा मोठा भाऊ आहे, मलाही तिचे चांगलेच झालेले पहायचे आहे.
माझे इथे थोडे नाव खराब आहे, पण मी तिचा भाऊ आहे, तिच्याबद्दल चांगलाच विचार करत असेल हे तिला पटत नाही.
प्रेम : तसं काही नाही, ती तुम्हाला घाबरते पण, तुमचा आदरही तेवढाच करते. मला कितीतरी वेळा ती बोलली आहे, वडील लहानपणी गेले तेव्हापासून तुम्हीच तिच्यासाठी वडिलांच्या जागी आहात.
दादा : ते सगळं ठिक आहे. आम्हाला पण वाटतं ती कुठेही लग्न करून गेली तरी ती सुखात रहावी. जर खरच तुम्हाला तिच्यासोबत संसार करायचा असेल तर माझी काही हरकत नाही.
प्रेम : त्याआधी मी माझ्याबद्दल काही सांगु का...?
दादा : त्याची काही गरज नाही. तुमची सर्व माहिती माझ्यापर्यंत आधीच पोचली आहे.
फक्त माझी एकच अट आहे. जर तुम्ही ठरवलच आहे तर लग्न या दोन महिन्यात झाले पाहिजे.
प्रेम : पण एवढ्या घाईत मला कसे शक्य होईल ते...!
दादा : ते आता तुम्ही ठरवा...! कसं करायचं ते. पण हे फायनल आहे.
आरव : सॉरी दादा मी मधे बोलतोय पण, थोडी घाई होतेय असं वाटत नाही का...?
दादा : दोन महिने आहेत की, आणि तुम्ही आहातच की त्यांना मदत करायला.
आरव : हो...! ते तर आहेच, पण दोन महिन्यात सर्व मॅनेज करणे त्याला थोडे भारी पडेल. म्हणुन म्हटलं जरा त्याला वेळ दिलात तर बरं होईल.
दादा : सॉरी...! आता मी तयारी दाखवली आहे ना, आणि तुम्ही माझा पण प्रॉब्लेम समजुन घ्या.
आरव : दादा...! त्याची फायनान्शियल कंडीशन थोडी बिकट आहे सध्या, त्यात भाड्याची रूम पण बघायची आहे, गावावरून आई आणि भावाला पण इकडे घेऊन यायचं आहे त्याला. थोडं कठीण होईल.
दादा : हो....! म्हणूनच मी दोन महिने बोललो. बाकी लग्नाच्या खर्चाचे टेन्शन घेऊ नका तुम्ही, लग्न माझ्याकडेच होईल. माझी एकुलती एक बहिण आहे ती, साखरपुडा आणि लग्नाचा जो काही खर्च होईल तो मी करेन, बाकीचा तुमचा खर्च तुम्ही बघा. मग तर झालं.
आरव : ठिक आहे.... तुम्ही बोलाल तसं.
प्रेम : पण....!
आरव : तु गप्प बस...! दादा पुढे कसं करायचं ते सांगा.
दादा : तुमच्या ताईला वगैरे सांगा मग रीतसर पाहण्याचा कार्यक्रम वगैरे करून जा म्हणुन लवकरच.
आरव : ठिक आहे दादा, मी त्याबद्दल कळवतो तुम्हाला लवकरच. आणि खरं सांगायचं तर, आम्हाला खुप टेन्शन आले होते तुम्हाला भेटण्याआधी....!
दादा हसत आरवला हात मिळवत बोलतो...
दादा : अरे मी पण माणूसच आहे....! 😊 चला निघुया आता...! काही नाष्टा वैगेरे करताय का...!
प्रेम : नाही...! नको...! नंतर कधीतरी...!
ते तिघेही बाहेर पडत असतात तेवढ्यात खुप वेळ बाहेर वाट पहात असलेला राघव समोरून येतो. तो दादाला हात मिळवत बोलतो...
राघव : नमस्कार दादा...! मी राघव... प्रेमचा मित्र... इथे जवळच राहतो मी...!
दादा : अच्छा....! ये मग घरी आता कधीतरी...!😊
राघव : हो...! येईल नक्की...! 😊
दादा : बरं चला...! मी निघतो आता. भेटू लवकरच.
ते सर्वजण हॉटेल मधून बाहेर पडतात. दादा तिथून घरी निघून जातात.
प्रेम खुप खुश असतो. त्या खुशीमध्ये तो तिथेच आरवला मिठी मारतो. राघव पण त्या मिठीत सामील होतो.
राघव : अरे पण काय बोलणं झालं...! ते तरी सांगा...! दादा तयार झाला ना...!
आरव : तो तर होणारच होता...! मला खात्री होती त्याची.
राघव : चला म्हणजे फायनली ठरलं तर....!😊
ते तिघे मिळुन हा आनंद सेलिब्रेट करतात. ग्रुप मधील सर्वांना ही खबर पोचवली जाते. सर्वजण खुप खुश होतात. कारण ग्रुप मधे पाहिलं कोणाचं तरी लग्न ठरलं होतं.
तिथून निघुन तिघेही प्रेमच्या घरी जायला निघतात. आरव वाटेत एका ठिकाणी गाडी थांबवुन पेढे घेऊन येतो.
घरी पोचताच ती आनंदाची बातमी तो ताईला सांगतो. रमेश आणि साई पण त्यांच्यासोबत घरी येतात सर्वजण एकमेकांना पेढे भरवतात आणि हा आनंद साजरा करतात.
सर्वजण खुप खुप होते....! ताईने सर्वांना घरीच थांबवले. आणि जेवणाच्या तयारीला लागली. तोपर्यंत सर्व बाहेर हॉल मधे गप्पा मारत बसले होते. काही वेळातच जेवण तयार होते. जेवता जेवता सर्वजण पुढे कसं करायचं याचे प्लॅनिंग करतात.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️