Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

दुधी हलवा..

एक अत्यंत चवदार प्रकार
दोन वाटया दुधीचा किस आजिबात पाणी पिळुन न काढता
ड्राय फ्रुटस काजू बदाम पिस्ते मनुके बेदाणे वगैरे
दोन वाटया साई सकट दुध
साखर पाऊण वाटी
दुध पावडर एक वाटी भर
तूप अर्धी वाटी

एका पॅन मध्ये तूप घालुन प्रथम ड्राय फ्रूट तुकडे चांगलें तळून घेणे
त्यातच दुधीचा किस परतून घ्यावा
साधारण आठ ते दहा मिनिटात तो थोडा मऊसर झाल्यावर त्यात साईसकट सर्व दुध घालावे व
शिजू द्यावें
या वेळेस पॅन वर झाकण आजिबात ठेवू नये
काही वेळाने दुध आटल्यावर साखर घालून
परत थोडा वेळ शिजवावे
साखरे मुळे याला थोडं पाणी सुटेल
आता आपण घेतलेली दुध पावडर
हळूहळू त्यात मिसळावी
गुठळी होऊ देऊ नये
आता आवडत असल्यास वेलदोडे पावडर मिसळावी
दुधी भोपळ्याचा एक वेगळा स्वाद असतो जो मला आवडतो त्यामुळे यात मी वेलदोडे केशर वगैरे टाळते
बाहेरच्या हलव्या मध्ये खवा असतो
हा घरचा खवा न वापरता सुद्धां हा हलवा स्वादिष्ट होतो
शिवाय दुधीची चव शाबूत रहाते

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112033531
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now