Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माझ्या आईची आणखी एक ख़ास पाककृती ..
गोळ्या चे सांबार

एक वाटी हरभरा डाळ असेल तर अर्धी वाटी उडीद डाळ व पाव वाटी मसूर डाळ रात्री भिजत घालणे.
सकाळी अत्यंत कमी पाण्यात ही डाळ थोड़े जीरे ,कड़ीपत्ता व मिर्ची घालून वाटुन घेणे
आता या मिश्रणात आपल्या आवडी प्रमाणे तिखट ,मीठ ,गरम मसाला ,हळद,
कोथिम्बिर ,थोड़ी बडीशेप घालुन चांगले एकत्र करावे .
आता फोडणी साठी कढ़ई ठेवणे .
त्यात हिंग मोहरी हळद घालुन फोडणी झाल्यावर त्यात चार ते पाच भांडी पाणी घालावे .या पाण्यात थोड़ी हळद,तिखट व मीठ,आमसूल घालावे
पाणी चांगले उकळले की ग्यास बारीक करावा .
आता ड़ाळ मिश्रणाचे हातावर घेवुन छोटे छोटे गोळे करून त्या या पाण्यात हलकेच सोडत राहावे
गोळे शिजले कि आपोआप वर येतात व हळू हळू रस्सा पण घट्ट होऊ लागतो .
सर्व गोळे वर आले की पाच मिनिटे झाकून ठेवावे
नंतर कोथिंबीर व खोबरे घालून सजवावे .
भाकरी पोळी अथवा भात कशा बरोबर ही हे सांबार मस्त लागते .
नुसते गोळे पण खूपच चविष्ट लागतात .
कधी भाजी नसेल तर हा पर्याय उत्तम आहे .
काही वेळाने सदर सांबार घट्ट होते त्यामुळे प्रथमच आपल्या आवडी नुसार एक दोन वाट्या जास्त पाणी घातले तरी चालते.
(मिश्रण वाटताना जास्त पाणी घातले तर गोळे फुटतील त्यामुळे कमी पाण्यात घट्ट वाटण जरुरी आहे . )

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112032319
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now