⭐मिक्स डोसे⭐
⭐अर्धी वाटी तांदूळ
अर्धी वाटी राजगिरा पीठ
अर्धी वाटी ज्वारी पीठ
अर्धी वाटी बाजरी पीठ
अर्धी वाटी उडीद डाळ
चमचा भर मेथी
⭐दुपारी तांदुळ ,उडीद ,डाळ व मेथी एकत्र भिजवले
रात्री ते सरसरीत वाटून
त्यात बाजरी, ज्वारी व राजगिरा पीठ मिसळून
झाकून ठेवलें
सकाळी पीठ छान फुगले
चवी प्रमाणे मीठ घालून
तव्यावर डोसे घातले
छान कुरकुरीत झाले
⭐बटाटा उकडून नेहमीप्रमाणे कांदा घालून भाजी केली
चटणी
अर्धी वाटी खोबरे
अर्धी वाटी भाजके दाणे
मीठ, साखर ,चिंच, मिरची, जिरे, घालून
चटणी वाटली
#वृषालीच्या स्वयंपाकघरात
#चवदार_चविष्ट
#Vrishali