“पुस्तक “
तुला आणी तुझ्या विचारांना
वाचत असते मी एखाद्या “पुस्तका सारखे ..
पहिल्या काही पानात दिसतात रंग तुझ्या मनातले
समजते कायम ठेवशील तु हे अद्वैत मैत्रीतले
नंतरची पाने मी हळू हळू उलटते
आता तुझ्या मनातले “गुज “जाणुन घ्यायचे असते
पानापानात असतो स्नेहाचा ओलावा
आणी जाणवते एक आस ..कधीच येऊ नये “दुरावा “
आणखी काही पाने उलटताच सापडते एक मोरपीस “अलवार “
तुझ्या भावनांचाच स्पर्श जणु त्यात असतो “हळुवार ..!
नंतरची पाने उलटताना का कोण जाणे मन एकदम “तरल होवुन जाते
कारण एक सुकलेले गुलाबाचे फुल मला तिथेच सापडते
कोमेजलेले फुल असते ..तरीही त्याचा वास मात्र कायम असतो
पुस्तकाच्या पानांना त्याचा ..हलका रंग पण लागलेला असतो
मला च नकळत मला देण्यासाठी तु ठेवले असणार ते फुल
माझ्या प्रीतीची कदाचित माझ्या आधीच लागली असणार तुला “चाहूल
आता हे पुस्तक मला आणखीनच आवडीचे भासते
माझ्याच नकळत मी त्याला माझ्या हृदयाशी धरते ..!