मठ्ठा
उन्हाळ्यात थंड म्हणुन जसे ताक प्यायले तसा थंडगार मठ्ठा सुध्दा गारेगार करून
पोटाला आणि मनाला थंडावा देतो
पूर्वी लग्नाच्या जेवणात मठ्ठा आणि जिलेबी हे भन्नाट कॉम्बो असायचे
जे सगळ्यांना अतिशय आवडायचे 😋
गुगल सांगते की
ताकापासून मिळणारे सगळे फायदे मठ्ठा पिल्याने मिळतातच, त्याशिवायही मठ्ठा पिण्याचे अनेक फायदे होतात.
मठ्ठा प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
आलं आणि लसूण यांमुळे ज्याप्रमाणे पदार्थाला चांगला वास येतो त्याचप्रमाणे पचनशक्तीसाठीही या दोन्ही गोष्टी अतिशय उपयुक्त असतात.. कोथिंबीर ही कॅल्शियमयुक्त असल्याने आहारात कोथिंबीरीचा समावेश जास्तीत जास्त असणे केव्हाही चांगले.
. त्यामुळे प्लेन ताकापेक्षा त्याचा मठ्ठा केला तर तो चवीला चांगला तर लागतोच पण त्याचे आरोग्यासाठी जास्त चांगले फायदे होतात.
साहित्य
चार वाट्या पातळ ताक
दोन ते तीन चमचे साखर
चवीनुसार मीठ
दोन चमचे आले कीस
बारीक चिरलेली कोथिंबीर
भाजलेली जिरे पुड
कृती
ताकात आले कीस मीठ साखर कोथिंबीर घालून चांगले एकत्र करून घ्यायचे
ज्या ग्लास मध्ये प्यायचे आहे त्यात ओतून
वर भाजलेली जिरेपूड घालुन
गार करण्या साठी फ्रीज मघ्ये ठेवावा
ऐन वेळेस बाहेर काढून आस्वाद घ्यावा
(मला लसणाची उग्र चव या पदार्थात आवडत नाही म्हणुन वापरला नाही..आवडत असल्यास
यात ठेचलेला लसूण घालता येतो)