मुली का पराठा
अर्थात मुळ्याचा परोठा..
माँ.. माँ...मुझे जोरोकी भुख लगी है
क्या बनाया है?
बेटा हाथ मुंह धो लो..
मैने तुम्हारे पसंद का मुली का पराठा और गाजर का हलवा बनाया है 😊
असे देव आनंद च्या चित्रपटातले हुकमी वाक्य असो...
किंवा
एखादी माँ एखाद्या चित्रपटात
बेटा कितने दिनो बाद घर वापस आये हो..
तुम्हारे आने की खुशी मे देखो मैने क्या बनाया है .
गाजर का हलवा और मुली का पराठा.😊
असे म्हणत असो..
एकंदर गाजर का हलवा आणि मुली का पराठा याचे प्रचंड गारूड हिंदी सिनेमावर आहे
मग आपण सिनेमाप्रेमी प्रेक्षक तरी कसे मागे राहणार ना 😃😃
आपणही अनेक प्रकारचा अनेक चवीचा रंगीत संगीत गाजर हलवा बनवतो 😊
मुली का पराठा भाजतो...
आणि पतिदेवाना मुला बाळाना खाऊ घालतो
हा मुळ्याचा पराठा मात्र खास माझ्या पद्धतीचा आहे,😊
साहित्य
एक मध्यम आकाराचा मुळा
एक बारीक चिरलेली मिरची
साखर,मीठ,लिंबू आपापल्या चवीनुसार
कोथींबीर
फोडणी साठी जिरे, हींग
तिखट हळद
पारी साठी
एक वाटी कणिक
अर्धी वाटी डाळीचे पीठ
मोहन साठी कडक तेल
थोडासा ओवा
कृती
प्रथम कणिक व डाळीच्या पिठात एक मोठा चमचा तिखट, एक चमचा हळद, ओवा व मीठ घालून कडक तेलाचे मोहन घालून कणिक घट्ट भिजवून घ्यावी व झाकुन ठेवावी.
सारणासाठी मुळा मोठया किसणीने किसून घ्यावा
त्याचे पाणी काढू नये
एका पॅन मधे तेल घालून
त्यात जिरे आणि हिंग घालुन फोडणी करावी
फोडणीत बारीक मिरची परतून घ्यावी
व मुळ्याचा कीस घालावा
झाकण न ठेवता चार पाच मिनिटे परतून घ्यावे म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी होईल
मुळा शिजून मऊ झाल्यावर त्यात मीठ साखर घालून आणि लिंबू पिळून परत चांगले एकत्र करावे
यावर झाकण बिलकुल ठेवू नये . (वाफेचे पाणी सारणात पडू नये म्हणून)
वरती बारीक कोथींबीर घालून गॅस बंद करावा
सारण गार झाल्यावर
भिजवलेल्या कणकीचे गोळे करून दोन गोळे लाटून त्याच्या मोठया पाऱ्या करून घ्याव्या
एका पारीमध्ये मुळ्याचे सारण हाताने पसरून घ्यावें
दुसरी पारी वर ठेवून हाताने दाबून घ्यावे
कडा बंद करून हलक्या हाताने पराठा लाटावा
फार जोरात लाटू नये
व जास्त मोठा पण करू नये
सारण बाहेर यायची शक्यता असते कारण हे सारण कोरडे नाहीं ओलसर आहे .
तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावा
या चविष्ट पराठया सोबत आवडीची चटणी अथवा सॉस घेऊ शकता
बाहेरून पिवळ्या रंगाचा आणि आतील सारण पांढरे असे मस्त रंगीत संगीत कॉम्बिनेशन या पराठ्याचे होते 😊
या रंगसंगती मध्ये आणखी भर घालण्यासाठी मी 🍅 टोमॅटो सॉस व घरचे पांढरे शुभ्र लोणी घेतलें आहे.