श्रावण महिना सण आला ग पंचमीचा
मला ध्यास लागे माहेराच्या वारुळाचा
पंचमीचा सण नका करू भाज्यांची कापणी
आजचा दिवशी हळदी कुंकवाला मागणी
पंचमीला नको करू तळण भाजन
नाग भाऊ राया तुला सुखाच मागणं
नागोबाच्या फनी वर निजले ग नारायण
फण उभारून धरती धरी सावरून
नागराजा श्रावणात तुझं पहिलं पाऊल
तुझ्या रे येण्याची मला लागली चाहूल
नागोबाच्या नैवेद्याला खीर पानोळे करते
नैवेद्याच्या पुढे रांगोळी नागाची काढते
आशीर्वाद दे रे भाऊ राया तू पाठीशी राहून
गणा गोत्याचा सावलीत संस्कृतीला धरून
✍️✍️Archu