#LoveYouMummy Marathi
प्रिय आईस...
आई, आज सगळं काही असूनसुद्धा तुझी पोकळी सतत मनाला सलत असते.
आज पहाटे पहाटे तुझ्या आवाजाचा भास झाला आणि मी खडबडून जागा झालो.
तो तुझा प्रेमळ स्पर्श, आपुलकी, जिव्हाळा आता कुठला आलाय...
आई सगळ काही केलीस गं माझ्यासाठी, माझ बालपण,शिक्षण,नोकरी या सगळ्यासाठी दिवस-रात्र स्वतःला वाहून घेत राहिलीस.प्रसंगी स्वतः उपाशी राहून राब-राब राबत राहिलीस...
तुझ म्हातारपणातल दुखन-खुपण,आजारपण याची मला जाणीव असुनही मला शिक्षणासाठी खूप दूर जाव लागल.त्यावेळी मी काहीच करू शकलो नाही. याचं गोष्टीच खूप दुख वाटतंय गं मला. माझ्या मनातली हीच सल मांडत असताना तू मला म्हणाली होतीस...
‘‘पोरा माझी काळजी करू नको,तू सुखी आनंदी रहा, शिक्षणाकडे लक्ष दे’’