# साथ
# kavyotsav
आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करावे ,
अशी माझी खूप इच्छा होती .....
फक्त त्यासाठी मला तुझी साथ हवी होती .....
महिती नाही कमी कोण पडलं तू की मी ?
पण, आपल्याला एकमेकांची सोबत करताच आली नाही .....
माझ्या हळव्या मनाला कदाचित तू कधी समजूनच घेतलं नाही ,
किंवा
तुझं इतरांवरच प्रेम मला मान्यच झालं नाही
माहित नाही या परिस्थितीला जबाबदार कोण ...?
मीच चुकले असेल बहुतेक
तुला समजून घेण्यात ,
पडले असेल मीच कमी
तुला जाणून घेण्यात....
पण आता दुरूस्त करायच्या आहेत सगळ्या चुका...
आता नसेल तुझ्यावर माझ्या प्रेमाचे बंधन ,
हो पूर्वीसारखा पुन्हा एकदा तू स्वच्छंद ,
आज मी तुला तुझ एकट्याचं आयुष्य परत करते....
फक्त..
एक मैत्रीण म्हणून लक्षात ठेवशील एवढी आशा करते ....
- खंडागळे ऐश्वर्या