#Kavyotsav  
पदरात...
पदरात झाकुन घे 
हृदयाशी बिलगुन घे 
सोनेरी केसांचा तुझा झुबका 
माझ्या गालावर पसरुन घे 
गो-या तुझ्या गालावर 
ओठ थोड लावुन घे 
गरम श्वास माझा 
तुझ्या श्वासात घे 
नजरेत माझ्या तु डोळे 
भरुन पाहुन घे 
अबोल नयनातल बोल 
थोड जाणुन घे 
तुझा सुगंध माझ्या देहावर 
पसरुन घे 
अपुर्ण अस काही माझ्यातल 
भरुन घे
                   - परशुराम माळी